.
विवेक अग्निहोत्री या चित्रपट दिग्दर्शकाने एका मुलाखतीत उच्चारलेल्या इतक्यात भागाचा उल्लेख करून त्यांची बरिच हेटाळणी केलेली वाचायला मिळते. देशभक्त या युट्यूब वाहिनीचे अभिषेक बॅनर्जी तर हे वाक्य आणि त्याचबरोबर अग्निहोत्रींचा अनक वेळा उद्दार करायला अजिबात विसरत नाहीत. तुमच्या सारख्या लोकांकडून सांगितली जाणारी तथ्ये ही तथ्ये नसतातच असे ते पूर्ण वाक्य होते असा खुलासा पण वाचायला मिळाला.
.
दार्शनिक नित्शे यांनी लिहिलेले आहे की ‘तथ्ये नसतातच फक्त निष्कर्ष असतात’ यातही त्यांचा निर्देश तथ्यांच्या सापेक्षपणा कडेच असावा.
.
विचारधारांच्या दोन ध्रृवीय शाळा
तुम्ही कोणत्या शाळेत जाता?
टिम अर्बन यांनी ‘व्हॉट्स अवर प्राबलम’ नावाचे एक वैचारिक पुस्तक लिहिलेले आहे. त्यात त्यांनी दोन प्रकारच्या समुदायांचा उल्लेख केलेला आहे. एकाला ते साईंटिफिक लेबॉरेटेरी म्हणतात त्याला आपण मुक्तप्रयोगशाळा म्हणुया आणि दुसऱ्याला ते इको चेंबर म्हणतात त्याला आपण प्रतिध्वनीशाळा म्हणुया.
MTG म्हणजे Manipulative, Toxic आणि Gaslighters या प्रकारचे लोक! हे लोक कधीही स्वतःची जबाबदारी स्वीकारत नाहीत, दोन्ही बाजूंनी बोलून संभ्रम निर्माण करतात आणि कायम इतरांना दोष देतात, आणि स्वतःचा फायदा करवून घेतात. हे तिन्ही लोक कसेही करून स्वतःचा स्वार्थ साधण्यात पटाईत असतात. हे तिन्ही प्रकार एकमेकांशी संबंधित असले तरी त्यामध्ये काही महत्त्वाचे फरक आहेत. हे लोक इतरांवर नियंत्रण मिळवण्यासाठी वेगवेगळ्या पद्धती वापरतात.
मॅनिप्युलेटिव्ह लोक – तुम्हाला भावनिकरित्या दोषी वाटायला लावतात आणि तुमच्याकडून हवं ते करून घेतात.
डोळे नसले तरी स्वप्ने पाहता येतात
पाय नसले तरी ध्येये गाढता येतात
हात नसले तरी आधार देता येतो
माझ्याजवळ तर सगळेच आहे....
भाषा नसली तरी प्रार्थना करता येते
सरगम नसली तरी गाणे गाता येते
रत्ने नसली तरी श्रृंगार करता येतो
माझ्याजवळ तर सगळेच आहे....
मी कशाला काय नाही हेच पाहत बसतो
एक दार बंद झाले तरी
नवे दार पुन्हा मिळणार आहे
जमीन संपली असे वाटले तरी
डोक्यावरती आकाश अपार आहे
खरंच आकाश माझी सीमा नाहीच
ते तर आव्हान देणारे नक्षत्रांचे दार आहे
तुष्की नागपुरी
गमतीदार उदाहरण आहे पण रानात एकट्या पडलेल्या कोल्ह्याला आकाशाकडे बघून कोल्हेकुई करताना आणि रानातून सर्व बाजूंनी त्याला उत्तरादाखल इतर कोल्ह्यांचे कोल्हेकुई चे सूर त्याच्या सुरात शामिल होताना अनेक चित्रपटांमधे पाहिले आहे. त्या बिचाऱ्या एकट्या कोल्हयाच्या पिल्लाला कुणाला शोधणे सोपे नसेल कदाचित पण ते कुठे आहे त्याची जाणीव सर्व रानाला करून देणे त्याला उपजत येत असते. त्याच्या स्वतःच्या अस्तित्वाला प्रसारित करणे कळते आणि तितके इतर रानाला ते पुरेसे असते.
कभी किसी को मुकम्मल जहाँ नहीं मिलता
कहीं जमीं तो कहीं आसमाँ नहीं मिलता
या शेरात आलेला आशय आपल्या आयुष्यात क्षणा क्षणाला आपली सत्यता पटवत असतो. ते सगळे काही एकाच व्यक्तीत मिळवायचा अट्टहास जर आपण सोडू शकलो तर आपल्या आयुष्यात अनेक जागांपासून सुखाची आनंदाची तिरिप शिरू लागते.
आंतरजालाच्या संपर्कात आल्यापासून आपण एका वैश्विक गावाचे नागरिक झालेलो आहोत आणि या गावात असे काही धागे जुळण्याच्या अनेक शक्यता आपल्याला खुल्या होतात.
एक कविता जशी आठवतेय तशी मांडतो आहे:
दुःख चिरंतन
सुखाचे काहीच क्षण
पण..
गडद अंधाराला मोहक करून जाते
तारकांची अंधुक पखरण
~ प्रसन्न शेंबेकर
या कवितेत अंधार अंधार आणि त्याचा काही भाग उजळून मिळालेली मोहकता यांचा काव्यात्मक उल्लेख आहे पण मी व्यवसायिक जगात येणाऱ्या एका अनुभवाबद्दल काही विचार मांडणार आहे.
https://xkcd.com/386/

एक्सकेसिडी नावाचे एक प्रचलित संकेत स्थळ आहे तिथे अंकीय जगावर आणि एकूणच समकालीन मुद्यांवर मार्मिक टीका असणारे कार्टून असतात. त्यातलेच एक गमतीदार पण मार्मिक चित्र हे आहे ज्यात दाम्पत्यामधले एकजण दुसऱ्याला ते आंतरजालावरचे काम थांबवून झोपायला बोलावते आहे त्याला उत्तर देतांना ती व्यक्ती म्हणतेय थांब हे खूप महत्वाचे आहे, आंतरजालावर कुणीतरी चुकीचे बोलतेय किंवा चुकतेय.
मध्यंतरी मुलीशी बोलताना वर्गातल्या मैत्रीणींमधे होणाऱ्या कुत्सित टोमण्यांबद्दल आणि हेतूपूर्वक केलेल्या हेटाळणीबद्दल गोष्टी निघाल्या. असे वागणे अशी वर्तणूक सुद्धा छळ (बुलीइंग) मानल्या जायला हवे, मात्र बरेचदा ती इतका आडून आणि चतुराईने काळजीपूर्वक केलेली असतो की आपल्याला ते सिद्ध करता येत नाही. अश्या गोष्टीची तक्रार करता यायला त्याला सिद्ध करता यावे लागते हे पण एक मुकाट्याने तो छळ सहन करत राहण्याचे कारण होते.
कृष्णार्पण
गरगर फिरवी ऐहिक पाही
मला तुझा आधार हवा रे
असो नसो वा पुण्य गाठीशी
मोरपीसही फिरवून जा रे
व्याकुळ ह्रदयी बरसत जा रे
थेंब सावळा एक पुरे रे
मेघ कृपेचा तूच आसरा
चातक आर्ती पुरवी अता रे
नसे पात्रता ज्ञान योग हो
यम दम सारे अवघड की रे
हाक मारता रुद्ध कंठ तो
कसे बोलवू जाणत ना रे
अशीच राधा व्याकुळ होता
तन्मय पाही ह्रदी तुला रे
हाच दिलासा मला एकला
संशय ते ही फिटले सारे
नुरो देह हा नुरो जाणिवा
बंधन काही नको नको रे
आर्त एकचि हृदी रहावी
कृष्णार्पण ते सारे सारे