ध्यान..
डोळे मिटावे, स्वतःला पुसावे..
तू आहेस की फक्त करतोस दावे?
जरासे बघावे, स्थिरचित्तभावें...
मिळतात का जीवनाचे पुरावे !?
मन हे खरे की झरे कल्पनांचे?
देहात लय की प्रलय वासनांचे?
दिसतील काही भयाधीन गावे..
तरी आत जावे, न मागे फिरावे !
अनिवार्य आहे असा वार होणे !!
तुझे ठार होणे, निराकार होणे !
अवघे जळावे, पुरे कोसळावे..
अखेरीस तू कणभरीही नूरावे !
जेव्हा खऱ्या अर्थी तू संपशील..
तेव्हाच रे जीवना स्पर्शशील..
गांभीर्यसौंदर्य हे ओळखावे..
शून्यात सामावूनी एक व्हावे !
.........................