तत्त्वज्ञान

ओळख वेदांची - भाग ३ (सामवेद)

Submitted by शीतल उवाच on 5 March, 2021 - 20:39

मागील दोन भागात आपण ऋग्वेद आणि यजुर्वेदाची माहिती करून घेतली. वेद परिवारातले तिसरे भावंड म्हणजे ‘सामवेद’. मुर्ती लहान पण किर्ती महान असे हे बालक आहे. प्रत्यक्ष भगवंताने गीतेतील विभूतियोगात “वेदानां सामवेदोऽस्मि”१ असं म्हणून सामवेदाचं महत्व अधोरेखित केलं आहे. शतपथ ब्राह्मण२, बृहद्देवता३ असे अनेक ग्रंथ सामवेदाचा गौरव करतात. मुख्यतः भारतीय संगीताचा उगम म्हणून सामवेदाकडे पाहिले जाते.

एकाग्रता (Concentration)

Submitted by मिरिंडा on 5 March, 2021 - 00:31

एकाग्रता आयुष्यात सारखी लागतच असते. आजूबाजूचे लोक सारखे सांगताना दिसतात. " अरे चित्त एकाग्र करा. Concentrate on the subject. किंवा Focus करा. " फोकस हा आधुनिक शब्द. पण अर्थ एकच. मात्र हे कोणीही सांगत नाही. एकाग्रता करा म्हणजे नक्की काय करा.

ओळख वेदांची - भाग २

Submitted by शीतल उवाच on 28 February, 2021 - 01:19

ऋग्वेदाची ओळख मागील भागात आपण करून घेतली. पहिला वेद म्हणून त्यातल्या त्यात ऋग्वेद आपल्याला माहिती असतो. यजुर्वेदाच्या नशीबात ते नाही. देशस्थ कोकणस्थ वादाशिवाय यजुर्वेद किंवा यजुर्वेदी वगैरे शब्दच कानी पडत नाहीत! वास्तविक सर्वांगीण जीवनाचे दर्शन घडवणारा जीवनवेदच म्हणावा इतकं यजुर्वेदाचं महात्म्य आहे. ते शब्दात मांडायचा प्रयत्न करु यात.

ओळख वेदांची - भाग १

Submitted by शीतल उवाच on 24 February, 2021 - 06:36

वेद म्हटलं की प्रत्येक भारतीयाचे हात जोडले जातात. यातले श्रद्धेने जितके असतात तितकेच अज्ञानाने! वेद हे काहीतरी अतिशय अवघड आणि गुंतागुंतीचे प्रकरण असून त्याच्या वाटेला न जाणे बरे! ते काम विद्वान, अभ्यासक आणि पुरोहीत इत्यादिंवर सोपवून त्यानी सांगितले की हात जोडायचे इतकंच काम अनेकजण करतात. एकदा वेदात सांगितलंय म्हटलं की झालं मग कोणी त्याच्या वाटेला जाणार नाही!!

अंतरंग - भगवद्गीता भाग ८

Submitted by शीतल उवाच on 21 February, 2021 - 14:36

अन्नमयादन्नमयमथवा, चैतन्यमेव चैतान्यात्| द्विजवर दूरीकर्तुम् वान्छसि, किम् ब्रूहि गच्छ गच्छेति।।

प्रजातंत्रका कर्ज

Submitted by चिडकू on 26 January, 2021 - 01:00

राष्ट्र म्हणजे त्याच्या लोकांच्या मनात असलेल्या चांगल्या जीवनासाठी काय योग्य आणि काय अयोग्य याची जाणीव. देश त्यांच्या लोकांनी घेतलेल्या प्रत्येक योग्य आणि अयोग्य निर्णयांनी उन्नती व अवनती करतात. एखाद्या देशात होणाऱ्या प्रत्येक गोष्टीला योग्य आणि अयोग्य दोन्ही मार्ग आहे. आपण सगळे चुका करतो. अज्ञानातून किंवा समाजघातक स्वार्थातून अयोग्य मार्ग घेतला जातो. प्रत्येक अयोग्य निर्णय त्या देशाच्या प्रजातंत्रावर कर्ज चढवतो. हे कर्ज त्या अयोग्य निर्णयाला एकतर दुरुस्त करून आणि निर्णय घेणाऱ्यांचे अज्ञान असेल तर शिक्षित करून आणि समाजघातक स्वार्थ असेल तर शिक्षा करूनच परत फेडू शकतो.

सजल जलद मोही रुप या राघवाचे

Submitted by पुरंदरे शशांक on 25 January, 2021 - 02:38

झळकत कटि शोभे पीत वस्त्रे जयास
कनक किरिट माथी उज्वले नीलभास

शर धरि कर स्कंधे सज्ज कोदंड दंडा
असुरगण गळाठे हर्ष भक्ता उदंडा

मृदुल स्मित खुणावी ना भी संसारदुःखा
कर तरि नित पाठी धीर देई प्रभूचा

सजल जलद मोही रुप या राघवाचे
निशिदिनि मनी ध्याता मूळ तुटे भवाचे

अवतरण जयाचे भाविका उद्धराया
निजजन हित वाहे देऊनी नामछाया

असे आगळा राम आदर्शमूर्ती

Submitted by पुरंदरे शशांक on 20 January, 2021 - 05:23

असे आगळा राम आदर्शमूर्ती

जना दावूनी श्रेष्ठ कर्तव्यपूर्ती
वरी भाविका देतसे दिव्य भक्ती
अशा राघवासी स्मरावे भजावे
किती रामदासे जना बोधवावे

असे आगळा राम आदर्शमूर्ती
तया टाळूनी वाउगेची पूजीती
भ्रमा वाढवोनी रती आत्मघाती
अभक्ते स्वये देशही नासविती

बहु भक्त झाले इथे राघवाचे
पुढे गोडवे दिव्य ते सद्गुणाचे
तया पाहता कीव ये दुर्जनाचे
रवी तेज ते येई का काजव्याचे

जना उद्धराया स्वये राम येई
तया सांडूनी नष्ट ते दुष्ट ध्यायी
भ्रमाने भ्रमाते जगी वाढवीती
जनासी तरी व्यर्थचि घोळविती

धोके आणि जोखीम

Submitted by प्रजननविरोधी on 9 January, 2021 - 00:41

भंडारा इस्पितळात आगीने होरपळून जळालेल्या १० नवजात बालकांच्या बातमीने महाराष्ट्र आज हादरला. १७ पैकी ७ बालके वाचू शकली, उरलेली १० जिवंत जळाल्याची बातमी प्रसारमाध्यमांत आहे. गृहमंत्री, चौकशी, मृतांच्या प्रजनकांना आर्थिक मदत वगैरे नेहेमीचे सोपोस्कारही सुरु झाले. संडासात बसून किंवा चहा पितापिता मोबाईलवर बातम्या वाचून किंवा उथळ अतिरंजित वृत्तवाहिन्यांचे अतिभावनिक वृत्तांत पाहून बऱ्याच जणांची दिवसाची "हळहळ व्यक्त" करण्याची भूकही आत्तापार्येंत शमली असेल.

शिवी 'गाळ'

Submitted by निमिष_सोनार on 23 December, 2020 - 11:44

लेखाच्या सुरुवातीला काही प्रसंग सांगणे आवश्यक आहेत. खालील प्रसंगातील नावे बदलली आहेत. जिथे जिथे ××× आहे, तिथे तिथे त्याऐवजी तुम्ही एखाद्या शिवीची कल्पना करा.

प्रसंग1:

खासगी कंपनी. अमोल लॅपटॉपवर काम करत आहे. खूप वर्क लोड आहे. तो आपला सहकारी विनितशी एका ऑफिसच्या कामासंदर्भात चॅट करतोय. तेवढ्यात चॅट विंडोवर सिनियर कस्टमरपैकी एक असलेला हरमित त्याला मेसेज पाठवतो.

"काल सांगितलेला रिपोर्ट पाठवला नाही का अजून? कालच रात्री पाठवायला सांगितला होता ना? उशीर का झाला?"

Pages

Subscribe to RSS - तत्त्वज्ञान