आयुष्याचा प्रवास , अध्यात्म इत्यादी
दोन इंटरेस्टिंग कथा आहेत .. खऱ्या खोट्या देव जाणे पण अध्यात्मिक वाटचाल करू इच्छिणाऱ्यांसाठी मार्गदर्शक आहेत.
दोन इंटरेस्टिंग कथा आहेत .. खऱ्या खोट्या देव जाणे पण अध्यात्मिक वाटचाल करू इच्छिणाऱ्यांसाठी मार्गदर्शक आहेत.
लाखो स्वप्ने वसतिल इतके काळिज देवा विशाल दे.
आव्हानांचे असंख्य काटे मार्गावरती खुशाल दे.
ध्येयपथावर प्रवास करता कष्ट भलेही अपार दे.
विश्वासाची अथांग शक्ती, धैर्याचे बळ अफाट दे.
काळोखाने काजळलेले मेघ कितीही नभात दे.
त्या मेघांना उजळवणारी उन्मेशाची प्रभात दे.
पदरामध्ये पराभवाचे दान भले तू भरून दे.
परि आशेचे मृगजळ थोडे थकल्यानंतर मनास दे.
पंखांवरती तुफान झेलू इतकी शक्ती अम्हास दे.
उंच भरारी नभात भरता आस धरेची मनास दे.
- समीर
जीवना रे काय सुंदर हा विरोधाभास आहे!
मोजके हे श्वास उरले, पण तुझी रे आस आहे.
शोधुनी बागेत साऱ्या, गंध काही सापडेना.
बोचऱ्या काट्यात आणी त्या फुलांचा वास आहे.
श्वास पुरते कोंडलेले, पण मिठी का सोडवेना?
तेच म्हणती थांब थोडे, हा सुखाचा भास आहे.
घालुनी जग पालथे हे सौख्य कोणा सापडे का?
काय वेड्या त्या मृगाला कस्तुरीचा ध्यास आहे!
रंग सारे गुंफुनीया शुभ्र वर्णी रंगलेले.
संपवी जो द्वैत सारे रंग तो ही खास आहे.
- समीर जिरांकलगीकर
मुख्य पानावर (maayboli.com)जे धागे असतात त्यांचा निकष काय आहे. सध्या तिथे चार पाच लेख दिसत आहेत.
लेख पहिल्या पानावर येण्यासाठी काय करावे लागते?
हा विरंगुळा धागा नाहीय.
निर्गुणी भजन - राम निरंजन न्यारा रे
कबीरांचं नावं सुद्धा लावायची गरज वाटली नाही कारण राम आणि कबीर एकच ना.. ..आधी वाटलं की शीर्षकात पुढे काही अर्थ , अन्वय , विवेचन द्यावे का पण नाही ते ह्या निरंजन रामाला लागलेले अंजन- किल्मिष वाटलं मलाच .... मी कोण अर्थ लावणारी जे कबीराला ऐकताना झिरपलं आणि विशुद्ध भाव फक्त उरला तो व्यक्त करायला ह्या काळ्या चिन्हांचा आधार...अक्षरांची केविलवाणी धडपड. जे मुक्त आहे अव्यक्त आहे ते व्यक्त करायला पुन्हा त्याला बंधनात टाकावं लागलं... विरोधाभासच नाही का!
बळे पेलि कोदंड रक्षार्थ धर्म
जनी सज्जनी आज आनंद मोठा
अयोध्यापुरी सोहळे थोर होता
स्वये श्रीप्रभू येउनी मंदिरी या
प्रतिष्ठापिली धर्मकिर्ती ध्वजा या
बळे पेली कोदंड रक्षार्थ धर्म
झणी निर्दळी दुष्टशक्ती कुकर्म
अति प्रेमभावे स्वभक्ता सहाया
पदी राघवाच्या मनोबुद्धी काया
जनी मानसी आज संतोष मोठा
अयोध्यापुरी व्यापूनि भक्तीलाटा
जनी दावितो नित्य कर्तव्यनिष्ठा
स्मरुया गुणा राघवाच्या तदर्था
सदा अंतरी सर्वदा रामराया
जरी भाविता तोचि येतो सहाया
मुखी नाम येणे कृपा ही तयाची
समाधान हे साक्षचि जाण त्याची
श्रीहरी स्तोत्रम् ऐकून आलेली विचारमौक्तिकं ललितामध्ये ओवण्याचा प्रयत्न केला आहे.
तुम्ही या जगात काही पण करू शकता बस तुम्हाला त्या गोष्टी बद्दल विचार करता आला पाहिजे आणि ती गोष्ट रोज जगता आली पाहिजे,
त्या दिवसा साठी जगा ज्या दिवशी तुमचे सर्व स्वप्ने पूर्ण होतील आणि त्या दिवशी तुमच्या चेहऱ्यावर जगातली सर्वात जबरदस्त Smile असेल
मेहनत केल्यावर जी Smile येती ना त्यापूढे तर पूर्ण जगाची सुंदरता पण कमी पडते बर का !
कोणत्याही कृतीचे, विचाराचे किंवा विचारसरणीचे तर्कसंगत विश्लेषण करणे, हे एका विवेकी समाजाचं लक्षण आहे. कोणताही विचार आणि त्याच्या बाजूने किंवा विरोधात मत व्यक्त करण्याची मुभा समृद्ध सामाजिक व्यवस्थेसाठी आवश्यक असते. असं असूनही अनेक विषय आपल्याकडे अजूनही वर्ज्य आहेत. साधारणतः शाळा, शिक्षण, नोकरी/व्यवसाय, लग्न, मुलं, त्यांचे शिक्षण, त्यांची लग्ने, नातवंड, जमलेच तर पंत्वंड आणि शेवटी मृत्यू अश्या धोपट मार्गाव्यतिरिक्त काही पर्याय सुचवणाऱ्या विषयांना धार्मिक मुलामा दिल्याशिवाय उघडपणे चर्चेला सहसा मान्यता मिळत नाही. प्रजननाबाबतही ह्याच प्रकारची वृत्ती दिसून येते.
सम्राट अकबर आपल्या दरबारात बसून मोठ्या उत्कंठेने तानसेनाचे गाणे ऐकत असतो. केवळ आपल्या सुरांच्या मायेने दरबाराला मोहून टाकणा-या तानसेनाच्या गाण्याचे त्याला नेहमीच नवल वाटत असते. त्याला अचानक असा प्रश्न पडतो की हेच गायन जर अद्भूत आणि अद्वितीय वाटते तर तानसेनाला ते शिकविणा-या गुरुंचे गायन कसे असेल? अकबराच्या या प्रश्नावर तानसेन म्हणतो की माझे गायन माझ्या गुरुंच्या पासंगालाही पुरणारे नाही. केवळ विनयाने आपण हे म्हणत नसून आपण त्याच्या अनुभव प्रत्यक्ष घेतलेला आहे. अकबरालाही या अनुभवाची आस लागते. परंतु आपले गुरुवर्य संन्यस्त आणि वानप्रस्थ जीवन व्यतीत करतात.