तुम्ही या जगात काही पण करू शकता बस तुम्हाला त्या गोष्टी बद्दल विचार करता आला पाहिजे आणि ती गोष्ट रोज जगता आली पाहिजे,
त्या दिवसा साठी जगा ज्या दिवशी तुमचे सर्व स्वप्ने पूर्ण होतील आणि त्या दिवशी तुमच्या चेहऱ्यावर जगातली सर्वात जबरदस्त Smile असेल
मेहनत केल्यावर जी Smile येती ना त्यापूढे तर पूर्ण जगाची सुंदरता पण कमी पडते बर का !
गेल्या तीन वर्षातील वास्तव्यामुळे दिल्ली आणि चंडीगढ ह्या परिसराशी चांगलीच ओळख झाली. महाराष्ट्रात असताना दिल्लीच्या खाद्यसंस्कृती विषयी असलेले काही गैरसमज दूर झाले तर काही समज दृढ झाले. देहली बेलीचाही अनुभव घेवून झाला. नवर्याला बाहेर जेवण्याची प्रचंड आवड असल्याने जवळ जवळ संपूर्ण दिल्ली पालथी घालून झालीये. त्यापैकी काही ठिकाणांची माहिती देते आहे.
हे आहे माझ्या पुढच्या आठवड्याचे आहार नियोजन. हे नियोजन खालील गृहितकांवर आधारित आहे
काही गृहीतके :
1. मी दिल्लीला राहते. पालक, मेथी, शेपू अश्या गुणी पालेभाज्या येथे फक्त हिवाळ्यात मिळतात. बाकीचे 8 महीने केवळ फळभाज्य आणि पनीर, राजमा, छोले, डाळी यांच्या आधारे काढावी लागतात.
2. मी सकाळी 9 वाजता घरातून निघते आणि संध्याकाली 7 वाजता घरी परतते.
3. मी अत्यंत आळशी आहे. लग्नाआधी इकडची काडी तिकडे सुद्धा केलेली नाही. 
4. दिल्लीत फक्त मी आणि माझा नवरा असे दोघच राहतो. आणि तो बराच समजूतदार असल्याने जेवण बनवण्याबाबत फारसा आग्रही नसतो.