चोरी
शेबटी काकींनि मनाचा हिय्या केला. वेगवेगळ्या आकाराच्या चार जड चांदीच्या वाट्या ओच्यात बांधल्या. नेसण घट्ट केली. कपाटाच्या किल्ल्या जागेवर ठेवल्या. मदत करणाऱ्या मुलीचे लक्ष नसल्याचे पाहून त्या पिशवी घेउन निघाल्या.
शेबटी काकींनि मनाचा हिय्या केला. वेगवेगळ्या आकाराच्या चार जड चांदीच्या वाट्या ओच्यात बांधल्या. नेसण घट्ट केली. कपाटाच्या किल्ल्या जागेवर ठेवल्या. मदत करणाऱ्या मुलीचे लक्ष नसल्याचे पाहून त्या पिशवी घेउन निघाल्या.
आई उधे ग अंबाबाई,आई उधे ग अंबाबाई,उधे ,उधे उधे धृ
आई तू मांडिला सार्या जगताचा गोंधळ
गोंधळात तुझिया मी वाजवितो संबळ ...........धृ
रावणादिक राक्षस तू मायेने भुलविले
रामे निर्दाळुनी तयांना यमसदनी धाडिले.....धृ...आई उधे ग अंबाबाई ...||
महिषासुर चेचिला तूचि शुंभ निशुंभ जाळिले
दिव्य तुझी करणी सकळ विश्वासी पाळिले
रक्तबीज सुकवुनी कितिक दैत्यांसी नासले
मोहिनी रुपे तुवा असुरा भस्मिभूत केले.....धृ. आई उधे ग अंबाबाई ||
चारिवेद सहाशास्त्रे पढुनी वाद जरी घातले
अज्ञानी राहुनी मानव जगरहाटी अडकले
१९७२/७३ साल असेल. मी चिंचवडला एका कंपनीत कामाला होतो. तेव्हा मी एकवीस वर्षांचा होतो.ही नोकरी स्वीकारल्यावर वडील म्हणाले होते. " अरे लोकं लांबून लांबून नोकरी साठी मुंबईला येतात. तूच एक वेगळा आहेस. मुंबई सोडून पुण्याला चालंलायस". मला त्यांचं बोलणं आवडलं नाही.पण जुना जमाना. वडलांपुढे बोलणार कोण? मी चुपचाप कंपनीत जॉईन झालो. सुरवातीला मी पुण्याला लॉजमधे राहायचो. महिना चाळीस रुपये. दोघांची रुम. चिंचवडला जायला इंजिन लोकल होती. संध्याकाळी काहीच काम नसल्याने भटकंती हाच टाइमपास. असेच एकदा आम्ही चोघेपाच जण हनुमान हिल (ज्यांना पुण्याची माहिती आहे त्यांनाच कळेल)खाली असलेल्या दीपाली हॉटेल मधे जेवत होतो.
सुरक्षित चौकटीत
जगणारा माझा चेहरा
वेल फेड वेल पेड
दिसणारा माझा
तजेलदार चेहरा
मला आणि माझ्या
चौकटीतले बांधवांना
आवडतो
त्याला चौकट सुरक्षितता देते
संरक्षण देते
आणि मी शिकतो
चौकटीतले शिक्षण
करतो चौकटीतलं
लग्न ,...
पण चौकटीचा तुरुंग
मला जाणवत नाही
माझ्या कुटुंबाला
कारण मी
माझ्या कुटुंबासहित
चौकटीबाहेर
कधीच उडत नाही
माझे मराठीचे मास्तर
माझ्या मराठीच्या बाई
माझ्या तोंडाला कोरड पडू लागली. कोरड्या तोंडानेच मी ओरडलो, " क्...क्... कोण आहे तिकडे......." पण माझा आवाज दोन फुटांपर्यंतही गेला नसावा. माझ्या खिशात अजूनही मेन फ्यूज होते. मोबाईलही जवळ नव्हता. अतिशय थंड शांततेत पावसाचा तेवढा लागलेला एकसूर भयाण शांततेचा भंग करीत होता. खिडक्या सगळ्याच बंद असल्याने बाहेरची हवा आत येत नव्हती. हॉलमधलं डायनिंग टेबलही बरंच दूर होतं. तिथे पाणी असलं तर......? आत पुन्हा कोणाच्यातरी फिरण्याची खसफस ऐकू आली. मला भीती वाटू लागली. मला स्वत:च्या नेभळटपणाचा राग आला. जरा बरं वाटलं. रागाने भितीवर नियंत्रण आणलं. तात्पुरत्या निर्माण झालेल्या बळावर मी भराभर पावले टाकली.
तुम्ही या जगात काही पण करू शकता बस तुम्हाला त्या गोष्टी बद्दल विचार करता आला पाहिजे आणि ती गोष्ट रोज जगता आली पाहिजे,
त्या दिवसा साठी जगा ज्या दिवशी तुमचे सर्व स्वप्ने पूर्ण होतील आणि त्या दिवशी तुमच्या चेहऱ्यावर जगातली सर्वात जबरदस्त Smile असेल
मेहनत केल्यावर जी Smile येती ना त्यापूढे तर पूर्ण जगाची सुंदरता पण कमी पडते बर का !
कितीशी असते अशी
एखाद्या विहिरीची जागा
एका वर्तुळा भोवती
सारा खोलीचा त्रागा
उन्मादत असते पाणी
खोल खोल डोहात
काढणारा मात्र असतो
आपल्याच उंचीच्या ओघात
मस्त सिमेंट काँक्रीटवर
हात जखडून ठेवतो
मान अर्धी खोलात
विस्कटणारे प्रतिबिंब बघतो
एवढ्या पाषाणी दगडात
ओलावा असेल तरी कसा
पडणारी एक एक भेग
जसा ओलावा देईल तसा
इतके अंदाज सारे
वरूनच कसे बांधायचे
स्पर्शविना इतके सारे
असेच कसे बोलायचे
उगा तुझ्याशी भांडतो मी
वेदना तुझ्या मांडतो मी
**
लपवू नकोस आसवांना
चांदणे बघ सांडतो मी
**
अबोल तू होवू नकोस
शब्दांस कसा तांडतो मी
**
केस कर मोकळे तूझे
मोगरा कसा माळतो मी
**
होवू नको निराश तू
वंचना तुझ्या कांडतो मी
**
कोण होतो काल मी अन् कोण आहे आज मी?
मी, मला अन् माझ्यामधे गुंतलो माझाच मी.
कधी होतो कुणाच्या जीवनाचा भाग मी,
कधी होतो कुणाच्या आसवांचा थेंब मी.
कधी होतो कुणाची पेटणारी चूल मी,
कधी होतो कुणाच्या भाकरीचा घास मी.
पाऊसवेड्या या मृदेचा बहरणारा गंध मी,
कधी होतो मृदेला भिजवणारा पाऊस मी.
काल होतो हा जसा मी, आज कोठे आहे असा मी?
'मी'च जाळून 'मी'पणाला, उरलो आता राखेत मी.
----------मयुरेश परांजपे-----------