नशीबासाठी!
एखाद्या ठिकाणी नशीब
विकत मिळाले तर
विकत घ्यायला
जरूर आवडेल...
भंगलेल्या स्वप्नांच्या
कुरूप सांगाडाच्या
पुनरूज्जीवनासाठी!
रक्तमांसाचा चिखल
तुडवता यावा म्हणून...
परकेपणाने शत्रुत्व पत्करले;
स्वामित्वासाठी-स्वातंत्र्यासाठी,
भेदरून आता-
संकटाशी त्वेषाने लढताना
हळूहळू हरलेली लढाईच
लढतो आहे खजिल होऊन...
जन्मजात कणखरपणा हरवलेला;
सार्या माणूस जातीने
तो हरवलेला,
ती जागा भरून काढण्यासाठी
कुटिलपणा आहे जारी
इथल्या बकाल दुनियेत;
सुशिक्षित होण्यासाठी
सुशिक्षित होण्याच्या नादात
माणूस
आपले सर्वस्व गमावून बसलाय,
सुशिक्षित झाला; पण
सुसंस्कृत झाला काय?
ज्या मुलूखात त्याला
राहावे लागते,
तिथे त्याचा होतो चेंदामेंदा!
असंख्य सवाल असतात
हल्ला करण्याच्या तयारीत...
मात्र, त्याची तयारी नसते
प्रश्नांचा मुकाबला करण्याची-
कारण,
ती तातडीची गरज नसते
त्यामुळे तो चक्रव्यूहात नाही शिरत
म्हणूनच तर
गुंडी नेमकी इथेच अडकते
सुशिक्षित झाल्यानंतरची!
वचर्स्व नसते, तसे सर्वस्व हरते
माझा जीव अडकतो एका गावरान भाषेतील मराठी पुस्तकात,
खिशाला काही परवड नाही आणि हिसकावून घ्यायला जमत नाही..
माझा जीव अडकतो एका स्वैर वाहणाऱ्या वाऱ्याच्या झुळुकेत,
पकडायला काही जमत नाही आणि बंदिस्त तर मुळीच करता येत नाही..
माझा जीव अडकतो एका संथ वाहणाऱ्या नदीच्या गोड पाण्यात,
थोड्याने पोट भारत नाही एव्हडया मोठया पाण्याला अडवण्याची ताकद माझ्यात नाही ..
आणि ,
माझा जीव अडकतो प्रचंड गडगडाट करून बरसणाऱ्या सारीं मध्ये ,
बघून मन भारत नाही मिठीत त्या क्षणभररही टिकत नाही ....
पण वेड मन अडकायचे काही थांबत नाही ....
‘सप्टेंबर’ महिन्यामध्ये जन्म झालेल्या व्यक्ती ह्या बहिर्मुख, कार्यतत्पर, मित्रप्रेमी आणि परिपूर्णतेचा ध्यास घेणाऱ्या असतात असे मानले जाते. चालू ‘सप्टेंबर’ महिन्यामध्ये जन्मलेल्या आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ठसा उमटवलेल्या अश्याच काही प्रमुख जागतिक क्रिकेटवीरांवर तसेच, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपले नाव नोंदवलेल्या लक्षणीय भारतीय / मराठी क्रिकेटपटूंवर दृष्टिक्षेप टाकूया.
वाईट सवई.
1:किती ते प्रगल्भ लिहिणे. किती तो गाढ अभ्यास. किती तो आत्मविश्वास. किती तो सेल्फ कंट्रोल. कसे जमते ?
2:जमते बाबा आपले असेच. मनाची इच्छा असेल आणि करायला काही नसेल तर आपोआपच वळतात हात पुस्तकांकडे
1: मी तर आपले झोपण्याचे काम करेल त्यापेक्षा. पण पुस्तक नाही हातात घेणार.
2: जन्मजात वैराग्य पत्करलेले आम्ही . काय करणार सारखे झोपून . कधी कधी झोपेचाही कंटाळा येतो आम्हाला. मग थोडे झोपेलाच कंटाळतो आम्ही आणि लागतात अश्या वाईट सवई ... पुस्तके वाचण्याच्या. काय करणार.
काय खरे, आणि काय खोटे समजत नाही.....
काय बरोबर आणि काय चुकीचे समजत नाही .....
काय करावे आणि काय नाही करावे समजत नाही ....
मनाचे एकावे कि डोक्याने चालावे समजत नाही ....
मन मारून जगावे कि मनाप्रमाणे जगावे समजत नाही ....
म्हणूनच भय इथले संपत नाही .
मनाप्रमाणे जगणे मस्तच ...... पण डोक्याने जगल्यावर बाकी सगळे खुश. (बाकी सगळे म्हणजे जी चार लोक , जी आपल्याला नाव ठेवत राहतात ती खुश.)
ती चार लोक आपल्याला फक्त नाव ठेवतात.
मायबोलीवर कुणीही येऊन कुठल्याही विषयावर छोट्या छोट्या पोस्टी लिहू शकण्यासाठी अर्थात मनमोकळे पणाने व्यक्त होण्यासाठी हा वाहता धागा...
मित्रांनो, Personality Development साठी खास लेख लिहीत आहे. जरूर वाचा. जर काही शंका असेल तर जरूर विचारा. कौतुक करण्यास अजिबात संकोच बाळगू नका. काही चुकभूल झाल्यास मात्र प्रेमाने कान पिळण्यासही विसरू नका.