संयुक्त कुटुंब अन् विभक्त कुटुंबपद्धती यात फायदे- तोटे समसमान आहेत की कमी-जास्त???????
कोणती योग्य? तिही कोणत्या परीस्थितीत वाटू शकते?अन् कुठल्या मानसिकतेत?
काही कल्पना,अनुभव,वा ऐकीव,वाचून माहिती झालेले(वाचिक),पाहिलेले (जवळून/लांबून) प्रसंग असतील, सांगावे वाटत असतील तर उत्साहाने सांगून व्यक्तीगत बदलणारी मते होऊ द्या व्हायरल!!!!!!!!!!
याच महिन्यात मि. चा वाढदिवस आहे तरी काय गिफ्ट द्यावे यावर्षी हे सुचत नाही, कोणी सांगेल का एक बायको आपल्या नवय्राला देवून देवून काय गिफ्ट देवू शकते??????
काही आयडिया असेल तर बिनधास्त ( इच्छा असेल तर) सुचवण्याचे कष्ट घ्यावेत,ही विनंती!!!!!
___________ शांतपणे जाहिर सूचना__________
(खास फालतू"पालतू श्रद्धेसह"सल्ला/ प्रतिसाद देऊ पाहणाय्रांसाठी)
काल "मिटक्वान इ स्कूल" चे उद्घाटनप्रसंगी आलेले राजकीय (आमदार वगैरे...) इंडस्ट्रियल मान्यवर (अर्थात सर्व पुरुष) महिला सक्षमीकरण वर जास्त भर देत होते.जे ते सर्व ऐकून ऐकून गुळगुळीत झालेले शब्द,वाक्य पुन्हा आपल्या तोंडून प्रेक्षकांच्या कानाला ऐकवत होते, खरंतर मला अशा औपचारिक कार्यक्रमांत सहभागी व्हायला फारसं मनाला रूचत नाही,पण नाईलाजाने का होईना मी हजेरी लावल्याने हे सारे माझ्या कानात शिरत होते, अन् प्रश्र्नांची मालिका सुरू झाली.त्यातलाच हा एक प्रश्र्न तसा तोही जुनाच पुन्हा नव्याने माझ्या मनातून बाहेर डोकावून पाहू लागलाय बघाss बाहेर---"महिला सक्षमीकरण म्हणजे काय बरे???????"
ती व्यक्ती म्हणजे स्त्री, बाई, महिला,नारी,मादा,स्त्रीलिंगी
तो व्यक्ती म्हणजे पुरुष, बाबा,गडी,नर,पुल्लिंगी
तर "ती व्यक्ती"- सामान्यतः माणूस, मानवप्राणी मधील स्त्रीलिंगी मानली जाते---- व्याकरणदृष्ट्या,विज्ञानानुसार,अध्यात्मानुसार, सामाजिक मानसिकतेनुसार!
निसर्गाने तिला निर्माण केले,असे विज्ञान सांगते.
ब्रम्हदेवाने/परमात्म्याने/ईश्वराने तिला निर्माण केले असे अध्यात्म सांगते.
मला सांगा देव म्हणजे नक्की काय असतो?
मला सांगा महिला म्हणजे नक्की काय असते?
मला सांगा मंदीर प्रवेश म्हणजे नक्की काय असतो?
मला सांगा हे सारे वाद म्हणजे नक्की काय असतात?
?????????????????????????????????????
मला सांगा ईश्वर म्हणजे नक्की काय असतो?
मला सांगा स्त्री म्हणजे नक्की काय असते?
मला सांगा देवळात जाणे म्हणजे नक्की काय असते?
मला सांगा ही सारी भांडण म्हणजे नक्की काय असते?
???????????????????????????????????
मला सांगा परमेश्वर म्हणजे नक्की काय असतो?
मला सांगा बाई म्हणजे नक्की काय असते?
संक्रांत आली
दिवाळ निघालं
दसरा काढला
शिमगा केला
लगेच समोर दत्त म्हणून हजर
या आणि अशा अनेक म्हणी प्रचलित आहेत----
पण ही सारी विडंबनात्मक म्हणी आहेत.
संक्रांत, दिवाळी, दसरा ही सणासुदीची दिवस अशी विडंबनात्मक म्हणीच्या स्वरूपात का वापरली जाऊ लागली????
कुणी सांगू शकाल का?
कारण आता लवकरच संक्रांत येत आहे त्यामुळे हा प्रश्न सहजच पंख पसरू लागलाय------
मी टू !
आज सुमतीला सकाळी उठायला उशीरच झाला. पिंटुचे घाईघाईत आवरुन देत होती ती. तरी बरे,आज पिंटुची शाळा लवकर सुटणार म्हणून त्याला डब्यात घरातलाच चिवडा दिला होता तीने. तीचा स्वयंपाक राहिला होता ना अजून ! अन पिंटुची स्वारीही खुश ! डब्यात चिवडा म्हणून. त्याला चिवडा तर इतका आवडतो की त्याचे बाबा त्याला लाडाने चिवडेश्वरच म्हणतात.पिंटुला बाय केले आणि सुमती घरातील कामांकडे वळली.
स्नान लवकरच आटोपले.कुकर लावला. कुकर होईपर्यंत कणिक मळणे आणि भाजी चिरुन फोडणी टाकणे एवढे होतेच ! सवयीने सारे भराभर उरकत होते.
सावल्या पार पायाखाली आल्या होत्या.सूर्य डोक्यावर आला होता तरी गारठा कमी होत नव्हता.वारा गारा घेऊन भणाभणा वाहत होता.हळूहळू सारी माणसं पांगत चालली होती.भरलेले घर रिकामं होऊ लागलं होतं.समोर दादाचा फोटो होता खूर्चीवर हार घातलेला.शायनासरीत आताचं उठून बोलतेलं असा.फुटू पाहीला की नुसता पोटात जाळ उठायचा.तेव्ह जाळ काळीज जाळीत पारवर डोक्यापर्यंत जायचा.हुंदका नुसता नरडयातचं आडकून बसायचा.वरचा श्वास वर. खालचा श्वास खाली व्हायचा.आता डोळं नाही पाझरतं.डोळयातलं पाणीच आटून गेलं आसलं. धा-बारा दिसं झालं की दादानी फाशी घेतलेली. कव्हरं डोळ तरी वाहतेल ?
सावल्या पार पायाखाली आल्या होत्या.सूर्य डोक्यावर आला होता तरी गारठा कमी होत नव्हता.वारा गारा घेऊन भणाभणा वाहत होता.हळूहळू सारी माणसं पांगत चालली होती.भरलेले घर रिकामं होऊ लागलं होतं.समोर दादाचा फोटो होता खूर्चीवर हार घातलेला.शायनासरीत आताचं उठून बोलतेलं असा.फुटू पाहीला की नुसता पोटात जाळ उठायचा.तेव्ह जाळ काळीज जाळीत पारवर डोक्यापर्यंत जायचा.हुंदका नुसता नरडयातचं आडकून बसायचा.वरचा श्वास वर. खालचा श्वास खाली व्हायचा.आता डोळं नाही पाझरतं.डोळयातलं पाणीच आटून गेलं आसलं. धा-बारा दिसं झालं की दादानी फाशी घेतलेली. कव्हरं डोळ तरी वाहतेल ?