चिकवा धाग्यावर गोल्डफिशबद्दल अस्मिता, स्वाती आणि माधव यांच्या पोस्ट्स वाचल्या. मी मुळातच सिनेमा खूप कमी बघते, पण तरी या मंडळींच्या पोस्ट्सनी माझ्या बाबतीत, संथ पाण्यात लहानसा दगड पडून लहरी उठाव्यात, असं काहीतरी झालं. विस्मरण, स्मृतिभ्रंश, डिमेन्शिआ, अल्झायमर... एकाच कुटुंबातले आजार म्हणायचे, जे माणसाचं अस्तित्त्वच उलटंपालटं करून टाकतात. मी इथे सिनेमाबद्दल लिहिणार नाहिये, कारण तो मी अजून पूर्ण बघितला नाहिये, पहिला अर्धा तासच बघितलाय. डोळे भरून येतात असं काही बघताना, त्यामुळे एका बैठकीत तो पूर्ण होणार नाहीच. पण माझ्या घरातलं काहीतरी इथे शेअर करावंसं मात्र नक्की वाटलं मला.
आज अज्ञातवासीने टाकलेला मेल!!
'हाय राणी..
हा मेल बहुतेक माझ्या आयुष्यातला तुला टाकलेला शेवटचा मेल आहे.
मला तुझा रिप्लाय लवकर अपेक्षित आहे प्लीज? मला बोलणं अपेक्षित आहे आपल्या दोघांमध्ये. अगदी शांतपणे... संवाद अपेक्षित आहे... प्लीज???
आशा निराशेच्या हिंदोळ्यावर झुलत बसण्यापेक्षा एक निर्णय घेऊन मोकळं व्हायचं आहे.
अगदी स्पष्ट लिहितोय. कारण मला आता practical विचार करावा लागेल... मला देखील आता life पार्टनर शोधावा लागेल. मला देखील life सुरू करावी लागेल.
काही घटनाक्रम मी मांडतो.
तिन्हीसांज होता दिवेलागण झाली,
तुझ्या आठवणींचे तेव्हा हळूच येणे झाले ।
दबक्या पावलांनी आले चंद्र तारे ,
श्वास अडकायला सखे हेच बहाणे झाले ।
गुंतला जिव उंबऱ्यात ,
पण ना तुझे येणे झाले ।
मी लावली सांजवात ,
पण ना मला गाणे आले।
दूर कुठूनसा आला आवाज कानी ।
वाटले मला जणू तुझी चाहूल आली ।
पायातल्या पैंजनांचे तेव्हा कानी पडसाद आले ।
श्वास अडकायला सखे हेच बहाणे झाले ।
चंद्र खिडकीतून पार डोईवर आला ।
बघता बघताच अचानक ढगांआड गेला ।
वारा आला आंगचटीला पडद्याचे उडणे झाले ।
एक कुटुंब ..
वडिलांना वाटणारी अपराधी पणाची भावना... आईला हि क्षणासाठी काही न उमगणे आणि दुसऱ्या क्षणी दोन लेकरांची जबाबदारी... समाजाचा ताण .... आणि वेळेचे कधीही न थांबणारे काटे....
हे असेच असते प्रत्येकाच्या जीवनात ... कमी अधिक प्रमाणात ...
आजचाच किस्सा ..
पावसामुळे घर्षण कमी झालेला रस्ता ...
दोन चाकीवर ना पेलवणारा संसार ..... मुलांना शाळेत वेळेत पोहचवण्याची सर्कस ..... आणि रस्त्यावरची आमच्या सारख्यांची गर्दी ........
मग काय झाली स्लिप गाडी ... बराच प्रयत्न केला बापाने तोल सांभाळायचा .. पण नाही झेपला त्याला.
जोगीण
तुझ्यासवेे सदैव हासते भास तुझ्या जगण्याचे
तुझ्या खांद्यावरी रुदते पाश तुझ्या नसण्याचे
आठवांचे ठरते चांदणे अश्रू डोहात अजूनही
उशाशी थिजते रात्र न मालवते दीप चूकूनही
हृदय फुलांचे गुंंफतो गजरा परंतु सुवास कोरा
जूनी उसवते वीण, नाही तुझ्यापास सुई दोरा
विसरणे विसरुनी गेले जखडलेली प्रीत बेडी
स्नेहगुणाची न मूर्ती होते ठाऊक नव्हत्या रुढी
ना भेटते नित्य दिवसापरी पाहते तुला आरश्यात
पानात सुर्य डोकावतो परी तू हरवला कवडश्यात
शेल्याचा ना धरिला शेव चूकलासे वाट आपसूक
तान्ह्या बाळासम दिल्या हाका अखेर झाले मूक
नव्या रचलेल्या घड्यांच्या उतरंडीत कोणत्या चीजवस्तू ठेवल्या आहेत हे काही दिवसांनी विस्मृतीत जाते तसेच त्याचे झाले होते. काहीच महिन्यांपूर्वी यंत्रवत झालेले जगणे तो पुर्णपणे विसरुन गेला होता. जणू त्याच्या प्रखर बुध्दीला मृदुल व रेशमी अश्या रसिकतेचा स्पर्श झाला होता. त्याच्यातील हे स्थित्यंतर अगदी नकळत्या क्षणाला झाले होते. ज्यापासून तो स्वतःही अनभिज्ञ होता. मनगटावर पुसल्या गेलेल्या सुवासाचा स्पर्श जसा अत्तराला कळत नाही तितकेच हे सहज त्याच्या जगण्यात घडून गेले होते. त्याच्या आयुष्याच्या चौकटीच्या उंबरयावरचे माप तिने ओलांडल्यापासून त्याच्या मनात तिचे प्रेम घर करुन बसले होते.
‘फादर्स डे’ आहे म्हणे आज. नेटकऱ्यांना वडिलांचा पुळका येण्याचा खास दिवस! एरवी वडिलांच्या सावलीला देखील उभे न राहणारे वडिलांना खेटून उभे असतानाचे फोटो टाकतायत. हे एक बरंय, आजकाल कुठला ‘special day’ आहे हे सकाळ झाल्या बरोबर कळतं. नेटकऱ्यांनी फोटो टाकलेत, स्टेटस ठेवलंय. काहींचा उत्साह अगदी काल रात्री पासूनच दांडगा आहे. ‘फादर्स’ पण आजकाल ‘social’ वर आल्यामुळे त्यांनाही कळतंय की आज आपला कौतुकाचा दिवस आहे!! असो.
१९९० च्या दशकाची सुरुवात. स्कॉटलंडची राजधानी ग्लासगो. १५-१६ वर्षांचा एक मुलगा, शगी, कॉट-बेसिसवर एकटाच राहतोय. एका सुपरमार्केटच्या स्नॅक्स काऊंटरवर जेमतेम नोकरी करतोय. त्याच्या अवतीभोवती स्थानिक गरीब नाहीतर स्थलांतरित माणसं. अभावग्रस्त जीवन. शगीला हेअरड्रेसर व्हायचंय. पण आधी रोज येणार्या दिवसाला एकट्याने तोंड द्यायचंय.
रोज येणार्या दिवसाला काहीही करून तोंड देणे हे त्याच्या पाचवीला पुजलेलं आहे. कसं? कोण आहे हा शगी?
त्याची गोष्ट सांगण्यासाठी कादंबरी आपल्याला ११ वर्षं मागे नेते.
"स्वत:चे ठेवायचं झाकून अन दुसर्याच बघायचं वाकून"ही म्हण आपल्याला माहित आहे. यात आपल्या त्रुटी/चुका/विसंगती झाकून ठेवायच्या व दुसर्याच्या चुका/ त्रुटी/विसंगती याबद्दलच फक्त बोलायच असाही एक अर्थ अभिप्रेत आहे.