आज अज्ञातवासीने टाकलेला मेल!!
'हाय राणी..
हा मेल बहुतेक माझ्या आयुष्यातला तुला टाकलेला शेवटचा मेल आहे.
मला तुझा रिप्लाय लवकर अपेक्षित आहे प्लीज? मला बोलणं अपेक्षित आहे आपल्या दोघांमध्ये. अगदी शांतपणे... संवाद अपेक्षित आहे... प्लीज???
आशा निराशेच्या हिंदोळ्यावर झुलत बसण्यापेक्षा एक निर्णय घेऊन मोकळं व्हायचं आहे.
अगदी स्पष्ट लिहितोय. कारण मला आता practical विचार करावा लागेल... मला देखील आता life पार्टनर शोधावा लागेल. मला देखील life सुरू करावी लागेल.
काही घटनाक्रम मी मांडतो.
१. आपण दीड वर्षापूर्वी मे महिन्यात बोलायला सुरुवात केली. आणि तेव्हा मी आजारी होतो. त्याआधी पासूनच मी आजारी होतो... अज्ञातवासी लिहिताना बऱ्याचदा मी प्रतिसादात हे लिहिलं आहे.
२. आपलं बोलणं सुरु झालं. सुरुवातीला मैत्री असणारी, मी तर तुझ्या प्रेमात आधीपासून होतो. तू माझा चेहरा देखील बघितला होतास, आणि तुदेखिल माझ्या प्रेमात पडलीस.
३. तू माझ्यावर प्रेम करण्याचं कारण होतं, माझं लिखाण, माझं बोलणं, माझा पेशंस, माझं तुझ्यावर आणि राघववर असलेलं निस्सीम प्रेम. माझी तुला आहे तशी स्वीकारण्याची तयारी. त्यात अजून एक म्हणजे माझं वजन वाढलं आहे, हे तुला आधीदेखील मी खूप वेळा सांगितलं, तरीही तुझी तयारी होती मला सहा महिने देण्याची. आणि भेटून डिसिजन घेण्याची...तुला माझ्यात आवडलं होतं, की मी भारत फिरतो. मी जग फिरतो. माझी हाईट सहा फूट आहे. गोरा रंग आहे. तुला आवडलं होतं की हा मुलगा स्वप्नाच्या मागे धावतो. स्टाईल मध्ये बोलतो, राहतो. प्रेम करतो जीवापाड तुझ्यावर... आणि तुझ्या मुलावर देखील.
याच्याकडे सगळं आहे. नावावर नाशिक मध्ये चार घरे आहेत. शेती आहे. वडील खूप प्रतिष्ठित जमीनदार आणि बिजनेसमन आहेत... स्वतःचा चांगला जॉब आहे, महिन्याला छान कमावतो. एक SUV आहे. बाईकस आहेत. हे तुला का सांगतोय, कारण काही स्वप्ने फक्त पैशांनी पूर्ण होतात.
Sexual life विषयी आपण दोघे खूप compatible होतो. आपल्यासाठी फक्त आपल्या दोघांच्या erotica लिहिल्या, कारण आपलं आयुष्य असच होणार होतं.... मी दिवस रात्र फक्त तुझा होतो, तुझ्यावर प्रेम करणार होतो...आणि तू माझी. तिच्यासाठी तो लिहिणार होता, तिला लिहितं करणार होता, अगदी स्टार कपल सारखं आयुष्य दोघेही जगणार होते. सोबत जग फिरणार होते, अगदी हाय क्लास हाय प्रोफाईल कपल जगतात तसं. जादुई दुनिया निर्माण करणार होते, तिचं आणि त्याचं प्रत्येक स्वप्न पूर्ण करणार होते.
४. अज्ञातवासी का तुझ्या प्रेमात पडला? एकतर तुझा चेहरा सुंदर आहे. अगदी बोलका, आणि निष्पाप. दुसरं तू होतीस अगदी अवखळ, अल्लड, सगळं मनातलं सांगणारी... खूप वाईट वाटायचं, अरे ही का त्या जागी राहतेय, मरमर काम करतेय? काय वय आहे हीचं? काय दुर्दशा करून घेतली आहे स्वतःची? सगळे शारीरिक मानसिक आजार लावून घेतलं आहे? हिच्या साठी जीव द्यायला कुणीही तयार असेल, आणि ही राबतेय फक्त. जॉब करत नाही, शिक्षण वेगळं घेतलं, का असा वेडेपणा करतेय ही?
माझं स्वप्न होतं, तू आणि मी सोबत जिम ला जावं, आणि तुला पुन्हा कॉलेजची तरुणी बनवाव, जे तुझं स्वप्न होतं.
५. आपण बोलायला लागलो, आणि मी आधी काही गोष्टी घेतल्या.
१. ७५ इंची टीव्ही.
२. एक आय९ प्रोसेसर असलेला लॅपटॉप
३. एक वॉशिंग मशीन.
४. मार्शल चे हेडफोन.
का?
कारण तुला वेब सिरीज बघायला आवडतात, म्हणून. तू कपडे धुवून थकते म्हणून. तुला जॉब करायचा आहे, तर लॅपटॉप हवा म्हणून... हेडफोन का? तर तुला गाणी ऐकायला आवडतात म्हणून. इतका तुझ्यात जीव गुंतला होता.
६. काही मुलांना मुली टाईम पास साठी हव्या असतात. काही मुलींना मुलं देखील. मी कधीही तुला टाईम पास म्हणून बघितलं नाही. आपली मैत्री तर बेस्ट होती, पण तुला हाक मारताना आज पर्यंत फक्त राणी आणि बायको, या दोनच नावांनी हाक मारली आहे. आयुष्यात फक्त दोनदा प्रेम केलं, जीवापाड केलं...माझ्या कॉलेजचा बेस्ट आऊटगोइंग स्टुडंट होतो मी, आणि माझी एक्स मिस नाशिक. चार वर्ष तिच्यावर प्रेम केलं, आणि
आता गुंतलो तुझ्यात...आता याला तीन वर्षे होतील.
७. मी घरच्यांशी बोललो तुझ्या विषयी? हो आधीच बोलून ठेवलं. आधी त्यांनी थयथयाट केलाच as usual. पण नंतर हो म्हटले. मी त्यांना हेही सांगितलं की जेव्हा आम्ही सात फेरे घेऊ, तेव्हा राघव माझ्या कड्यावर असेल. आणि आमचा लग्नाचा पहिला फोटो तिघांचा असेल.
तू मला विचारलं होतं, की तू राघवला स्विकारशील? माझं उत्तर होतं तुझ्याही आधी तो हवाय. मी घरच्यांना हेही सांगितलं होतं की तुमचा नातू फक्त आणि फक्त राघव असेल. कारण नंतर तू आणि मी एकही मुल जन्माला घालणार नाहीत.
८. असो. नंतर तुला फक्त एकच गोष्ट आवडली नाही, आणि तू आमूलाग्र बदललीस. मला खोटं ठरवत होतीस. आणि मी बडबड करून करून करून स्वतःला प्रूव करत होतो... पण शेवटी सगळं संपलं.
९. मी तेव्हा तुला हवं ते मान्य केलं. असं नव्हतं ग की मला कणाच नाही, असं नव्हतं ग की मी खोटारडा आहे म्हणून इतकं ट्राय करतोय, असं नव्हतं ग की मी रडूबाई आहे...एकच कारण होतं... माझं तुझ्यावर इतकं प्रेम होतं की मला तुला अजिबात दुखवायच नव्हतं. आयुष्यात तेव्हा कधीही इतकं असहाय वाटलं नव्हतं.
१०. तू गेलीस. कॉन्टॅक्ट बंद झाला. तू म्हटली होतीस टेलिग्रम वर अनलॉक राहशील, ते तर तू डिलिट केलं.
११. तू गेल्यानंतर पहिला महिना माझी सायकॉलॉजीस्टची ट्रीटमेंट चालली. खूप त्रास झाला दोन महिने... कारण प्रेमच तितकं होतं. ..
१२. मी बेंगलोरला शिफ्ट झालो. हो एक वर्ष मी बेंगलोर ला काढलं, कारण नाशिकला तुझ्या आठवणी कायम असायच्या. तिथेच जिम जॉईन केली. मला माहिती होतं, काय करायचं आहे... पण डिप्रेशन होतं सोबतीला, म्हणून उशीर झाला, पण अचिव केलं.
१३. मी सहा महिन्यापूर्वी नाशिकला आलो.
१४. आताशा मी दररोज १३ किलोमिटर चालतो जिम मध्ये. ३० किलो वजनाचे डांबेल घेऊन चेस्ट करतो. २१० किलो वजन घेऊन लेग्ज करतो. मी साखर नाही खात. मी मीठ नाही खात. कारण मी आता जरी परफेक्ट शेप मध्ये असेल, ३२ किलो कमी केलं असेल, तरीही माझ्या राणीला माझा बेस्ट द्यायचंय हे माझं स्वप्न आहे. म्हणून आता सिक्स पॅक अब्ज बनवतो आहे. माझं चेहरा चांगला आहे हे तू आधी म्हटलीच आहे. पायात ऑल रेड शूज, हातात जी शॉक आणि गळ्यात तुझ्यासाठी घेतलेले मार्शल हेडफोन... हा आता जिमचा स्टेटस सिम्बॉल आहे.
मला जगातला सगळ्यात हँडसम मुलगा बनायचं आहे म्हणजे तू माझ्यासोबत अभिमानाने चालू शकशील.
१५. या प्रवासात मला अशा काही मुलींनी मदत केली, ज्या तुझ्या आधी माझ्या आयुष्यात होत्या. त्यांच्यावर मी कधीही प्रेम केलं नाही, पण त्यांनी माझ्यावर जीवापाड केलं. ज्यांचा उल्लेख मायबोलीवर आला आहे.
१६. दीड वर्ष मी फक्त तुझ्यासाठी काढलं. तुझ्या साठी झुरलो, रडलो, पण हरलो नाही... लढत होतो.
१७. तुझा २ ऑक्टोबर चा हाय माझ्यासाठी खूप महत्वाचा होता... का? कारण माझं प्रॉमिस मी आता तोडणार नव्हतो. तू मेसेज केल्याशिवाय मी मेल करणार नाही, आणि सगळ्या जुन्या आठवणी, बेबी, अगदी अगदी सगळं जागं झालं.
१८. तुला मी रिप्लाय दिला ३ दिवसांनी. कारण मला तुला insecure फील करवायचं नव्हतं. पण तुझा रिप्लाय नाही आला. मला कळलं देखील नाही नेमकं काय झालं? कसं react करू नाही कळत नव्हतं. त्यात मला ३० ऑक्टोबर पर्यंत प्रॉमिस पूर्ण करायचं होतं.
१९. माझ्या वाढदिवसाला तुला मी फोटो पाठवले. फेसबुक वर आलो, स्नॅप वर आलो...
...पण तुझा रिप्लाय नाही आला.
२०. त्यानंतर मात्र मला पुन्हा सायकोलोजिस्त कडे जावं लागलं, तब्बल एक वर्षाने. रिजन being आता पुढे कसं जावं... कारण जुन्या आठवणी धडका मारून आता पुढे येत होत्या. मला तुझी पुन्हा काळजी वाटायला लागली होती... मला आता माझी राणी हवी होती, सो रडू बाई नाही, पण दिवाळीपासून फक्त मी तुझ्याशी बोलायचा प्रयत्न करतोय, कारण आता जे एक कारण होतं तू निघून जायचं, ते राहिलं नाही... आणि तुला जे हवं होतं, ते सगळं आहे.
२१. तुझा मेल येण्याची मी आशा सोडली, आणि म्हटलं आता पुन्हा परीक्षा सुरू, त्यात परवा तुझा मेल आला. त्यावर मी एक फक्त मैत्रीसाठी म्हणून रिप्लाय दिला...आधी मैत्री करू, मग डिसिजन घेऊ..
२२. मी काल रात्री माझ्या सायकोलोजिस्टशी सविस्तर चर्चा केली....
आता पुढे जाण्यासाठी दोनच ऑप्शन आहेत.
१. आपल्या दोघांना एक निर्णय घ्यावा लागेल. जर तुला वाटत असेल, की हो... मला पुन्हा या नात्याला एक चान्स द्यायचा आहे, तर पुन्हा सुरुवात करावी लागेल... आधीपासून... आणि तुझ्या मनात असेल तर मी अजून थांबेन. कितीही वेळ. हो मी जे जे सांगितलं आहे त्यात काहीही खोटं नाही. अगदी अगदी तसच घडेन... आय प्रॉमिस... आणि मी माझं वचन नाही तोडत. बोलायला सुरुवात करू, भेटू... समजून घेऊ एकमेकांना परत. आपण सोबत माझ्या सायकोलोजिस्त कडे जाऊ, आणि प्रॅक्टीकल विचार करू.
२. जर तुला नकोच असेल हे नातं, तर प्लीज, यापुढे आपण कधीही एकमेकांना न दिसणं उत्तम. मी एकही असा मार्ग ठेवणार नाही की तू मला कॉन्टॅक्ट करू शकशील. तुलाही रिक्वेस्ट आहे की मायबोली, प्रतीलिपी सगळीकडे मला अनफॉलो कर. मी देखील तिथून निघून जाईन कायमचा. हो आता याक्षणी तू जाण्याचा त्रास होईल पुन्हा, प्रचंड... पण यापुढे मला स्वतःच आयुष्य जगायचं भान येईल. कुणा दुसऱ्या मुलीवर प्रेम करायचा प्रयत्न करेन... तू देखील प्लीज पुन्हा हाय वगेरे करू नकोस ग... कारण जीव आहेस तू माझा, तुझं येणं म्हणजे माझा जीव येणं आणि तू जाणं म्हणजे जीव जाणं.
३. जर तुला वाटत असेल, चार महिन्यांनी जर मनू सिक्स पॅक अब्ज बनवून आला, तर मला तो हवा असेल. मी जे स्वप्न बघितलं असा पुरुष मला हवा आहे पण मी चान्स चार पाच महिन्यांनीच देईन... तर स्पष्ट सांग...की हो, चार महिन्यांनी पुन्हा मला फोटो पाठव, मी विचार करेन.
४. Extra Marital Affair हा पर्याय बाद करतोय मी. कारण माझी बायको, माझी सर्वस्व फक्त तूच आहे...
एक सांगतो, या नात्याला आता एकतर शेवट असेल, नाहीतर डेफिनाईट टाईमलाईन.
...शेवटी सांगतो... अगदी कळकळून सांगतो, ज्याच्या प्रेमात तू होतीस, त्या गोष्टींच्या प्रेमात तू होतीस, अगदी अगदी सगळं तसच्या तसं आहे. किंबहुना अजून सुंदर झालं आहे. तुझी लाईफ जगातील सगळ्यात सुंदर लाईफ करण्याची धमक आहे तिथे.
मी देखील अजूनही तिथेच आहे... कारण त्याला सर्वकाही द्यायचं होतं तुला, तुला सर्वस्व द्यायचं होतं, आणि ते दिलं. अजूनही त्याने कुणाचा विचार नाही केलेला.
...तू होतीस, नव्हतीस तुझा हिरो कायम तुझ्या प्रेमात होता...
साधायचा संवाद? प्लीज करशील अनलॉक व्हॉट्स ॲप वर... शेवटचा संवाद होईल, पण मी मुक्त होईल आणि तूसुद्धा.'
त्याला आलेलं उत्तर!!!
'मी तुला आधी देखील सांगितलं आणि आताही सांगतेय, मला काहीही नकोय यातलं. तू तुझ्या आयुष्याचं डिसिजन घ्यायला मोकळा आहेस. गुड बाय अँड टेक केयर...'
अज्ञातवासीचा शेवटचा मेल!
'thank you so much, good bye and take care!'
बस. दीड वर्षाचा प्रवास आज संपला...
रीता झालोय. बस एवढच.
सुन्न झालोय. बस एवढंच...
...अचानक पाणी येतंय डोळ्यातून...
शेवटी आईच आठवली...
'मी तिची आभारी आहे. तिने आयुष्यातला सगळ्यात चांगला निर्णय घेतला... आणि तुम्ही निघा या वेडेपणातून. दिवाळीला, पाडवा, लक्ष्मीपूजन तुम्ही फक्त झोपून राहिलात... सतत मोबाईल चाळत राहिलात, वाट बघत राहिलात.
तुमची बहीण, मी आणि तुमचे वडील, सगळं सगळं करत होते, आणि तुम्ही झोपून होतात...
आपला बाप राम आहे, आजपर्यंत जी प्रतिष्ठा कमावली, सगळी तुम्ही उधळून द्यायला निघाला होता. हे आमचे संस्कार नाहीत. माझा मुलगा रावणाच्या देखील वर गेला होता. तुम्हाला प्रॉपर्टीतून बेदखल करतोय आम्ही. आता स्वतःच काय विश्व बनवायचं असेल बनवा आणि आम्हाला अभिमान वाटेल असं बना.
बस माझीही शक्ती संपली...'
शेवटी आईची देखील शक्ती संपली...
सॉरी.. पण मी कथा नाही पूर्ण करू शकणार कधीच. सॉरी पण यापुढे मला नाही जमणार इथे यायला.
सगळ्यांची माफी मागतोय... रियली सॉरी. ही वेबसाईट पुन्हा पुन्हा मला त्याचं जंजाळात ओढत राहीन. मी वेडा होइन पुन्हा..
...अज्ञातवासी संपला...
गुड बाय ऑल...
अरे बापरे.. भयानक आहे हे सगळं
अरे बापरे.. भयानक आहे हे सगळं.
काळजी घ्या
हार मानू नका
You are the winner
बऱ्याच गोष्टी माहीत नसल्याने
बऱ्याच गोष्टी माहीत नसल्याने थोडे गोंधळात पडलो.
जे कळाले ते असे.
एका विवाहित व्यक्तीच्या प्रेमात पडलात
त्या व्यक्तीलाही तुम्ही आवडत होता / आहेत.
मध्येच काहीतरी प्रॉब्लेम झाला आणि तुम्हाला आयुष्यतुन बाजूला काढले गेले. तेव्हा closure भेटला नाही किंवा तुम्हाला नीट काय ते न सांगता लटकवत ठेवल्यासारखे केलेय.
तुम्ही मात्र स्वतः मधले वैगुण्य शोधून स्वतःवर काम करत राहिलात. ती व्यक्ती दूर गेल्याने डिप्रेशन मध्ये गेलात.
निर्विवाद प्रेम केलंत. Returns मध्ये तितके मिळाले नाही.
आणि अजूनही तुम्ही आशा ठेवून होतात तरी नकारात्मक उत्तर आलेय.
भरपूर त्रासदायक असणार आहे हे सर्व.
मात्र ह्यातूनही तुम्हाला बाहेर पडावे लागेलच.
स्वतः साठी घरच्या इतर प्रेम करणाऱ्या सर्वांसाठी.
गर्तेत अडकू नका.
मोकळे झालात, नियतीने दिलेली संधी आहे ही खरंतर.
गुंत्यातून बाहेर या. खूप त्रासदायक असणार आहे तरीही बाहेर पडावे लागेल.
शुभेच्छा तुम्हाला.
ह्या आयडीने या , दुसऱ्या आयडीने या अथवा ब्रेक घ्या
जे कराल ते योग्यच.
.
अज्ञातवासी, तुम्ही
अज्ञातवासी, तुम्ही लिहिण्यातून ब्रेक घ्या काही हरकत नाही..
ज्यातून जातायं ते भयंकर आहे.. निदान आपल्या आई- वडिलांसाठी , बहिणीसाठी तरी ह्या सगळ्यातून खरंच बाहेर निघा..
जितका त्या गोष्टीचा विचार कराल तेवढे त्यात गुरफटत जालं.
राग मानू नका पण आगीशी खेळ थांबवावा असं वाटते मला.....
झकासराव, किल्ली ..+ १
मी वरील सगळ्या मतांशी सहमत.
मी वरील सगळ्या मतांशी सहमत.
Break घेणेच गरजेचे आहे.
योग्य निर्णय. काय करायचे ते
योग्य निर्णय. काय करायचे ते तुम्हाला माहीत आहे. पुढील आयुष्यासाठी खूप शुभेच्छा!
तुम्ही बोलला का तिच्याशी ?...
तुम्ही बोलला का तिच्याशी ?...
का आयुष्य वाया घालताय कोणासाठी...
तुम्ही छान आहात म्हणून तुम्हाला ती छान वाटत असेल. ..तिला तुमची कदरच नसेल .... time pass करतात अश्या मुली....
तुम्ही खरच छान आहात ... असेच राहा बदलू नका कोणासाठी .
खूप फिरा , खूप life एन्जॉय करा ...आणि रोज नवी गर्लफ्रेंड बनवा .एकदम सेक्सी ..
life मध्ये सगळ्या गोष्टी करा अगदी सेक्स हि.....
एक लक्ष्यात ठेवा तुमच्यामुळे तिला एव्हडे इम्पॉर्टन्स आले ..तुम्ही लक्षही नाही दिले तर ,She will be as common as other. It is because of you she become more valuable .
ऑल द बेस्ट डूड!!
ऑल द बेस्ट डूड!!
मी दीर्घकथा वाचत नसल्याने आपले लिखाण फार वाचले नाही. हा सारा सीन काय आहे हे माहीत नाही. लेख वरवर वाचला. प्रतिसाद वाचले. प्रेमप्रकरण आहे हे समजले. त्या उत्सुकतेने नंतर वाचेन सावकाश. पण हितचिंतक म्हणून लागलीच सल्ला द्यायचे कर्तव्य पार पाडतो...
ट्रस्ट मी ब्रो.. काळ हेच सर्वात मोठे औषध आहे. भले वाक्य पुस्तकी वाटले तरी हेच खरे आहे. प्रेमभंगानंतर तुम्ही काही काळासाठी थिजला तरी जग थांबत नाही, आयुष्य थांबत नाही, आणि आपल्यालाही मग त्या सोबत पुढे जावेच लागते.
जेवढे समजले त्यावरून बरेच काही रिलेट करू शकतो आणि अनुभवाने हा सल्ला देऊ शकतो की आपले प्रेम आहे पण समोरच्या व्यक्तीचे नाही, किंवा आधी होते पण आता गेले आहे तर ते स्विकारा..
त्या मुलीला जास्त महत्त्व देऊ नका असा सल्ला या केस मध्ये बरेच जण देतात. ते तुमच्या चांगल्यासाठीच देतात. पण तसे करणे सोपे किंवा शक्य नसते. आता आपण कोणाच्या प्रेमात आहोत तर आहोत. त्याला ठरवून महत्व कसे नाही द्यायचे. त्यामुळे ते जसे आहे तसे स्विकारावे.
काळ जाईल तसे त्रास कमी होतो. पण विसरू शकला नाहीत तर आपले प्रेम कायम राहणार हे स्विकारणे गरजेचे.
फक्त त्या केस मध्ये एक विश्वास कायम ठेवा, की आज ना उद्या ते प्रेम तुमच्या आयुष्यात पुन्हा येऊ शकते ही आशा जिवंत ठेवा. ते परत मिळवण्यासाठी हातपाय झाडू नका. तसे केले तर कदाचित परिस्थिती आणखी बिघडत जाईल आणि त्रासाशिवाय हाती काही लागणार नाही.
त्यापेक्षा सैल सोडून द्या ते नाते. काळ बदलला, संदर्भ बदलला, जे घडले आहे त्याची तीव्रता कमी झाली की परिस्थिती बदलून पुन्हा ते नाते जोडले जाऊ शकते हा विचार मनात कुठेतरी अश्या प्रकारे ठेवा की त्या आठवणीचा त्रास होणार नाही उलट ती आशा कायम राहिल्याने तुम्ही तुमचे इतर आयुष्य अगदी तसेच आनंदात जगू शकता जसे ती तुमच्या आयुष्यात येण्याआधी जगत होता.
शुभेच्छा आणि चिअर्स
अरे हो जाता जाता...
माझ्या मायबोली प्रोफाईलमध्ये तुम्हाला दोन वाक्ये सापडतील.
1. लेखक स्वतःला गरीबांचा शाहरूख खान आणि मध्यमवर्गीयांचा स्वप्निल जोशी समजतो !
हे इग्नोर मारा..
आणि हे दुसरे वाचा
2. In love u need to wait till you are forgiven..!
हे प्रत्येक नात्याला लागू जे प्रेमाचे आहे
मी सुद्धा लेख वाचलेले नाहीत.
मी सुद्धा लेख वाचलेले नाहीत. ऋन्मेष सारखेच मलाही वाटते ही प्रेमभंग कथा असावी. म्हणुन माझे २ सेंटस - प्रेम करणे इज सफिशिअंट इन इट्सेल्फ. आपण प्रेम केलं हेच पूर्णत्व असतं. इट नेव्हर गोज वेस्टेड. मग ते परत मिळणं न मिळणं तो सगळा व्यवहार आणि स्वार्थ आणि इगो वगैरे वगैरे होतो.
आपण प्रेम केलं हेच महत्वाचं असतं, स्वतःमध्ये पूर्ण असतं
मी सुद्धा लेख वाचलेले नाहीत.
मी सुद्धा लेख वाचलेले नाहीत. ऋन्मेष सारखेच मलाही वाटते ही प्रेमभंग कथा असावी. म्हणुन माझे २ सेंटस - प्रेम करणे इज सफिशिअंट इन इट्सेल्फ. आपण प्रेम केलं हेच पूर्णत्व असतं. इट नेव्हर गोज वेस्टेड. मग ते परत मिळणं न मिळणं तो सगळा व्यवहार आणि स्वार्थ आणि इगो वगैरे वगैरे होतो.
आपण प्रेम केलं हेच महत्वाचं असतं, स्वतःमध्ये परिपूर्ण असतं
इश्क़ ने 'ग़ालिब' निकम्मा कर
इश्क़ ने 'ग़ालिब' निकम्मा कर दिया
वर्ना हम भी आदमी थे काम के
How True.
You poor thing. Shift to
You poor thing. Shift to Dehradun do char dham Yatra. Live a wonderful blessed life. No one is worth so much suffering. Dump the woman immediately. Get a golden retriever puppy. And show her you are living your best. I don't let anyone rule my internal thoughts and processes.you are a grown adult
Take it as a learning experience and move on
अमां
अमां
No one is worth so much suffering>>>+Infinity!!
सगळा प्रतिसादच भन्नाट.
काही उपयोग होणार नाहीये कारण
'Some people,' Miss Marple added thoughtfully, 'enjoy being miserable.'
इश्क, एका व्यक्तीवर जीवापाड
इश्क, एका व्यक्तीवर जीवापाड प्रेम (हे तथ्यहीन आहे असे नाही पण प्रचंडच ओव्हरहाइप्डही आहे.) या शिवाय खूप काही करण्या सारखे आहे आयुष्यात. May be am too good for you, oh oh! म्हणा आणि आयुष्यात करण्या सारखे असीम आहे त्यावर लक्ष केंद्रित करा. प्रेमभंग, आणि ते किती का होईनात, त्याने आयुष्यात कसलीच उणीव रहात नाही.
जॉन एलिया वाचा..
जॉन एलिया वाचा..
बस, ट्रेन आणि मुलगी. कधीच
बस, ट्रेन आणि मुलगी. कधीच यांच्यामागे पळू नका. एक गेली तर दुसरी नेहमीच येईल. - Amir Khan
माफ करा, मी तुमच्या सगळ्या गोष्टी वाचत होतो, पण आतापर्यंत काही बोललो नाही. पण मला वाटतं हे खूप महत्त्वाचं आहे. आयुष्य अनमोल आहे. दहा वर्षांनंतर या सगळ्यावर हसाल. पुढे चला. आयुष्य खूप सुंदर आहे.
कधी कधी, एखादी व्यक्ती आपलं वैयक्तिक आयुष्य तुमच्याशी शेअर करते, आणि जर ती व्यक्ती संघर्ष करत असेल तर तुम्हाला तिच्याबद्दल सहानुभूती वाटते. हाच सहानुभूतीचा भाव हळूहळू एका भावना निर्माण करतो, आणि काहीजण त्यालाच प्रेम समजतात. स्वतःशी बोला, विचार करा की तुम्हाला खरोखरच त्या व्यक्तीवर प्रेम आहे का, की फक्त सहानुभूती आहे तिच्या समस्या सोडवण्यासाठी, तिला एक चांगलं आयुष्य देण्यासाठी, ज्या गोष्टी ती पात्र आहे त्या मिळवून देण्यासाठी…
कधी कधी आपल्याला वाटतं की आपण खूपच broad-minded आहोत. आपण दुसऱ्या व्यक्तीसाठी खूप चांगल्या गोष्टी करत आहोत असं वाटतं. वाटतं की, अरे, आपण जे काही करतोय, ते कोणीच करू शकणार नाही. पण विचार करा की खरंच त्या व्यक्तीला हे सगळं हवंय का. तुम्ही लग्न करायचं म्हणता, त्या मुलाला हातात घेण्याचं स्वप्न बघता, तुम्हाला वाटतं की हे खूप मोठं आहे. पण दुसऱ्या व्यक्तीलाही खरंच असंच वाटतं का, याचा विचार करा. असं दिसतंय की त्या व्यक्तीचं आधीच एक अपयशी लग्न झालंय. पहा की ती व्यक्ती खरंच पुन्हा लग्न करू इच्छिते का. कदाचित नाही.
कदाचित तिला फक्त तिच्या मुलावर लक्ष केंद्रित करायचं असेल. सगळ्या गोष्टींचा विचार करा. फक्त तुमच्या दृष्टिकोनातून नाही, तर त्या व्यक्तीच्या दृष्टिकोनातूनही विचार करा. कधी कधी आपल्याला वाटतं की आपण दुसऱ्या व्यक्तीला काय हवंय हे जाणतो. पण हे नेहमीच खरं नसतं. आपल्याला कधीच ठाऊक नसतं की दुसऱ्या व्यक्तीला नेमकं काय हवंय. कदाचित काहीतरी वेगळं त्यांच्यासाठी चांगलं असू शकतं.
Hope you will find a way out soon !!!
मला वाटतंय कि ही एक कथा आहे.
मला वाटतंय कि ही एक कथा आहे. Fiction, not fact. किंवा अज्ञातवासी आपल्यावर एखादा "सायकॉलॉजिकल एक्सापेरीमेंट" करत असावेत.
डेव्हिल्स अॅडव्होकेट म्हणून
डेव्हिल्स अॅडव्होकेट म्हणून सांगायचं झालं तर, जरा त्या मुलीच्या दृष्टीकोनातून विचार करा. इथे बरेच लोक ‘मूव्ह ऑन’ म्हणतायत, आणि कदाचित त्या मुलीला दोष देतायत. पण ती एक साधी मुलगी आहे. तिच्या बाजूने पाहिलं, तर कदाचित तिच्यावर समाजाचा दबाव आहे, तिच्यावर अनेक मर्यादा आहेत. तुम्हाला जे हवंय, ते ती सहज करू शकत नाही. ती दुखावली जाऊ नये म्हणून सावध आहे, कारण ती भीतीत आहे की पुन्हा तिचं मन आणि आयुष्य तुटेल. एकदा तिला वाईट अनुभव आलेला आहे, आणि ती पुन्हा त्याच मार्गावर जायला घाबरतेय.
तिला थोडा benefit of doubt द्या, तिच्या निर्णयाचा respect करा. आणि जर तिला बोलायचं नसेल, तर तुम्ही पुढे जा. खरंच, पुढे जा आणि आयुष्यात काहीतरी वेगळं शोधा. मला खात्री आहे की तुम्हाला काहीतरी नवीन मिळेल—लिहिणं असो, वर्कआउट असो, किंवा प्रवास असो. कदाचित तुमच्या आयुष्यात आधीच कोणी तरी असेल ज्याच्याकडे तुम्ही दुर्लक्ष करताय, कारण तुम्ही या गोष्टींमध्ये खूपच गुंतलेले आहात.
Praying for you to get peace !!! All the best !!!
माझ्या पुरते बोलायचे झाले तर
माझ्या पुरते बोलायचे झाले तर मी कोणालाही दूषण देत नाहीये. प्रेम ही कल्पना भंकस आहे. प्रेम हा सेक्स चाच शुगर कोटेड अवतार आहे. एखाद्या गुणी पण कुरूप कुब्जेवर कोणी प्रेम करेल काय? पुरुष सौंदर्यावर तर स्त्रिया पैशावर "प्रेम" करतात. Nothing Wrong. फक्त फरक समजून घ्यावा. हेमावैम.
नुकतेच एका मैत्रिणीच्या
नुकतेच एका मैत्रिणीच्या स्टेटसवर वाचले होते - detachment is happyness!
हे एका अर्थी खरेच आहे. प्रेम आणि attachment जितका आनंद देते तितकाच त्रास सुद्धा देते.
पण म्हणून त्या भीतीने तुम्ही आपले मन कुठे गरजेपेक्षा जास्त गुंतवायचे नाही असे ठरवून जगलात तर काय जगलात.
जग म्हणते प्रेम आंधळे असते.
हो असते. डोळसपणे करायला तो काही व्यवहार नाही. जेव्हा प्रेम संपुष्टात येते तेव्हा व्यवहाराची जाणीव होते. प्रॅक्टिकल विचार केले जातात. प्रेमाची व्याख्याच फाट्यावर मारून तुम्ही प्रेम करू शकत नाही.
त्यामुळे प्रेम आणि ती मुलगी विसरून जा, त्यात काही तथ्य नाही, हा सल्ला एखाद्या प्रेमात पडलेल्या व्यक्तीला खरेच काही कामाचा नाही. स्वतः प्रेमात नसलेल्या व्यक्तींना ते कधी कळणारच नाही.
कुठून झक मारली आणि प्रेम केले आणि हा त्रास ओढवून घेतला असा नकारात्मक विचार बिलकुल करू नका. त्यापेक्षा आपण केलेल्या प्रेमाचा अभिमान बाळगा. आज जे प्रेम त्रास देतेय त्यानेच तुम्हाला इतका आनंद दिलाय जो प्रेम न केलेल्या लोकांच्या कधी नशीबी नव्हता याची जाण ठेवून देवाचे आभार माना. प्रेम आणि प्रेमिका न विसरता मुव्ह ऑन करा.. ट्रस्ट मी ब्रो.. जमते हे.. तुम्हालाही जमेल.. आणि ते आयुष्य सुद्धा फार सुंदर असते
प्रेम हा सेक्स चाच शुगर कोटेड
प्रेम हा सेक्स चाच शुगर कोटेड अवतार आहे.
>>> not really …
माझ्या मते, प्रेम म्हणजे काहीच नाही तर एक सवय आहे. याचा सेक्स किंवा इतर कोणत्याही गोष्टीशी काहीही संबंध नाही. हे फक्त आवडी आणि सवयींचा भाग आहे. जर तुम्हाला एखादी व्यक्ती आवडत असेल, तिच्या सवयी आवडत असतील, तुमच्यात साम्य असेल, आणि तुम्ही एकमेकांना भेटत किंवा बोलत राहिला, तर ती एक सवय बनते. तुम्हाला त्या व्यक्तीची उणीव भासू लागते. आणि लोक या सगळ्याला प्रेम समजतात.
आता, “पहिल्या नजरेत प्रेम” म्हणजे काय? ते सौंदर्य असतं. पण बऱ्याच लोकांना ते समजत नाही, ते प्रेमात पडतात. प्रेमात पडणं म्हणजे काय? ते म्हणजे एकमेकांच्या आवडी जुळणं, आणि असं वाटणं की तुम्हाला एक साथीदार मिळाला आहे. आणि मग त्या व्यक्तीच्या अस्तित्वाची सवय लागते.
Ke ku bang on. Shaadi aise
Ke ku bang on. Shaadi aise thodi banti hai. You need to create a good kitchen. Nice pressure cooker fridge ac for bedroom to have good sex or manachya baher Prem karayala. Good quality blender high quality grocery. If she has a baby good baby care facilities. In spite of the sadness I lol at the tv laptop purchase. Are yaar mard ki tarah jio.
एखाद्या गुणी पण कुरूप
एखाद्या गुणी पण कुरूप कुब्जेवर कोणी प्रेम करेल काय?
>>>
करतात..
आणि तेव्हा तुम्ही लोकच त्याला समजवायला जातात, काय पाहिलेस हिच्यात म्हणून
Make her a good cave and
Make her a good cave and enjoy. Yeh nahi toh some better will come along. Ooperwale ki baag hai khilti rahti hai
Thanks अमा.
Thanks अमा.
प्रेम हा सेक्स चाच शुगर कोटेड
प्रेम हा सेक्स चाच शुगर कोटेड अवतार आहे.>
सहमत. आणि त्यात वाईट चूक नाहीये, की त्याला कमी सुद्धा लेखायचे नाहीये.
आपले ज्या व्यक्तीसोबत ईश्क - निस्सीम प्रेम जडले आहे, ती व्यक्ती प्रत्यक्षात आपण समजत होतो त्या जेंडरची नाहीच आहे (किंवा आपल्याला अपेक्षित असलेल्या सेक्स ओरिएंटेशनची नाहीये) असे पुढे जाऊन कळले तर? (मुद्दाम कोणी खेळ केला नाहीये, आपण ईश्काच्या धुंदीत होतो आणि पुढे केव्हातरी अचानक खुलासा झाला असे समजावे.)
झाले ते विसरून खंत न बाळगता व नशिबाला किंवा त्या व्यक्तीला दूषण न देता दुसरा जोडीदार शोधावा.
प्रेम हा सेक्सचाच शुगर कोटेड
प्रेम हा सेक्सचाच शुगर कोटेड अवतार आहे.
>>>
बिलकुल नाही.
प्रेम नसलेल्या व्यक्तीसोबत सेक्स आणि प्रेम असलेल्या व्यक्ती सोबत सेक्स असे दोन्ही अनुभव घेतल्याशिवाय तुम्हाला हा फरक समजणार नाही.
अश्या सेक्स मध्ये सुद्धा चार कॉम्बिनेशन असतात.
1. तुमचे प्रेम आहे आणि समोरच्या व्यक्तीचे सुद्धा प्रेम आहे.
2. तुमचे प्रेम आहे पण समोरच्या व्यक्तीचे नाही.
3. तुमचे प्रेम नाही पण समोरच्या व्यक्तीचे आहे.
4. तुमचे सुद्धा प्रेम नाही आणि समोरच्या व्यक्तीचे सुद्धा नाही.
यातले 1, 3, 4 मी अनुभवले आहे.
Case 1 असेल तर क्या बात!
Case 3 सुद्धा आपल्याला आवडते कारण समोरून पॅशन असते, ते जाणवते, आणि सेक्स करताना सुखावते.
Case 4 एकदाच अनुभवले आहे. ते फार बोरिंग प्रकरण असते. पुन्हा कधी त्या वाट्याला गेलो नाही.
पण त्यावरून हे सांगू शकतो की प्रेमाशिवाय सेक्स जर इतके बोरिंग असेल तर प्रेम आणि सेक्स हे एकमेकांचे अवतार कसे असू शकतील. दोन्हीत फरक आहे.
प्रेम नसलेल्या व्यक्तीसोबत
प्रेम नसलेल्या व्यक्तीसोबत सेक्स आणि प्रेम असलेल्या व्यक्ती सोबत सेक्स असे दोन्ही अनुभव घेतल्याशिवाय तुम्हाला हा फरक समजणार नाही.>>>व्वा!
गल्लत होतेय, प्रेम म्हणजे
गल्लत होतेय, प्रेम म्हणजे शुगर कोटेड सेक्स..
that does not mean sex is love!
वरच्या चार केसेस समजल्या आणि
वरच्या चार केसेस समजल्या आणि मान्य झाल्या तर विषय संपला.
सर, मी लॉगआउट!
सर, मी लॉगआउट!
Pages