BMM 2026: संयोजक (Convener) श्री. मोहित चिटणीस

mc.jpg बीएमएम २०२६ संयोजक (Convener) श्री. मोहित चिटणीस यांच्याशी संवाद.
याआधीच्या संमेलनांच्या तुलनेत बीएमएम २०२६ वेगळे कशामुळे ठरणार आहे?
ह्या अधिवेशनामध्ये आपल्याला उत्तर अमेरिकेचे भरपूर कार्यक्रम बघायला मिळतील.

BMM 2026: मान्यवर वक्ते डॉ. संजय उपाध्ये यांची मुलाखत

sanjayupadhye यंदाच्या बीएमएम २०२६ सिॲटल अधिवेशनात ते दोन वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रम सादर करणार आहेत.
उत्तररंग - ६ ऑगस्ट, २०२६ मस्त बिनधास्त चोवीस तास - ताणतणाव विसरून आनंदी आणि बिनधास्त आयुष्य जगण्याचा हलकाफुलका प्रवास.
मुख्य अधिवेशन- घर करा रे प्रसन्न – संवाद, समजूतदारपणा आणि प्रेमातून घर अधिक आनंदी व प्रसन्न कसे बनवावे, याचा हृदयस्पर्शी वेध.

BMM 2026 - प्रमुख वक्त्या: संवाद

medium_bmmguests.jpgबीएमएम २०२६ सिअ‍ॅटल अधिवेशनाच्या प्रमुख वक्त्या आहेत लेफ्टनंट जनरल डॉ. माधुरी कानिटकर (निवृत्त). डॉ. कानिटकर भारतीय सशस्त्र दलातील एक अत्यंत प्रतिष्ठित आणि कर्तबगार अधिकारी आहेत.डॉ. कानिटकरांशी अधिवेशनापूर्वी साधलेला हा संवाद.

काय मिळतं वाचून?

'काय मिळतं रे वाचून?'
किंवा 'कसं काय वाचत बसतो रे एवढा वेळ?'
ह्या अर्थाचे प्रश्न विचारले जातात मला कधीकधी.. म्हणून म्हटलं, जरा शोधून बघू की काय कारणं असतील

छटाकभर लेख!

large_chatakbhar-lekh.jpgतिखटाच्या मिरच्या मागितल्या तेव्हढ्या कुणाला मिळाल्या असतील ह्यावर श्रद्धाळू आस्तिकही विश्वास ठेवणार नाही. कुणी स्वस्त देऊ लागला तर “ माप बरोबर देणार ना? “ असे विचारून व्यवहारात किती मुरब्बी आहोत हे दाखवणारेही धडाभर मिरच्याचे पैसे देऊन पासरीभरच घेत आले आहेत!

दिठी

SB.jpgदिठी म्हणजे दृष्टी. ’आतां आमोद सुनास जालें’ ही अमृतानुभवा’तल्या जीवन्मुक्त-दशा-कथन या नवव्या अध्यायतली पहिली ओवी. सुवासच नाक होतो आणि स्वतःला भोगू शकतो. ध्वनीच कान होतो आणि स्वतःला ऐकू शकतो. आरसा, डोळे आणि दृष्टी एकरूप होतात. त्यांचं अद्वैत होतं. ज्याला भोगायचं आहे आणि जे भोगायचं आहे, ते दोन्ही एकरूप होतात. ज्याला जाणायचं आहे आणि जे जाणायचं आहे, ते एकरूप होतात आणि हा अमृतानुभव असतो.

BMM 2026: संवाद: सह-संयोजिका (Co-convener)

medium_Savita-More_Co-Convener_1.jpgBMM 2026 अधिवेशनाच्या सह-संयोजिका (Co-convener) श्रीमती सविता मोरे ह्यांच्याशी संवाद.

बीएमएम २०२६ अधिवेशनासाठी सिअ‍ॅटल सज्ज!

BMM2026_logo_small.png
सिॲटलमध्ये होणाऱ्या BMM 2026 स्नेहसंमेलनाची तयारी आता जोरात सुरू आहे!
“म” — मराठीतला, मातीतला, माणसातला, मनामनांतला, मायबोलीतला, मौजेतला, मनोरंजनातला, मेजवानीतला आणि मैत्रीतला!

मुंबईच्या तीन प्रमाणवेळा

मुंबईत एकेकाळी तीन प्रमाणवेळा अस्तित्वात होत्या, अगदी 1955 पर्यंत या प्रमाणवेळा पाळल्या जात होत्या. हे माहीत आहे का? याबद्दल अजून माहिती वाचा या लेखात...

ओशिबाना - The Pressed Flower Art

ज्याप्रमाणे आपल्याकडे ताजी फुले-पाने वापरून रांगोळीच्या विविध रचना करतात त्याचप्रकारे वाळवलेली फुले, पाने, बिया, काटक्या वापरून विविध आकर्षक कलाकृती बनविण्याच्या कलेला ओशिबाना आर्ट म्हणतात.

दोन चंद्र

large_moon.jpg हा चंद्र म्हणजे डोळ्यांना सहज दिसणार्‍या सौंदर्यातला आनंद. तो चंद्र म्हणजे कुतूहलापोटी, जिज्ञासेपोटी, थोडं खोलात शिरून मिळवलेल्या ज्ञानातला आनंद.चंद्राची माहिती करून देणारा एक अभ्यासपूर्ण लेख.

अमेरिकेतील कृष्णवर्णीयांचा इतिहास - स्लेव्हरी ते ब्लॅक लाइव्ह्ज मॅटर चळवळ

दर वर्षी फेब्रुवारी महिना हा अमेरिकेत 'ब्लॅक हिस्टरी मंथ' म्हणून साजरा केला जातो. गेली ४०० वर्षं उत्तर अमेरिकेच्या इतिहासाचा मोठा हिस्सा असलेल्या कृष्णवर्णीयांचा इतिहास ४० वर्षांपासून वर्षातला १ महिना सर्वांसमोर येतो. या उपक्रमाची गरज का भासली, काय होता हा ४०० वर्षांचा इतिहास, अमेरिकेच्या जडणघडणीत मोठा वाटा असलेल्या लोकांचा प्रवास कसा झाला आहे याचा आढावा.

ये दुख काहे खतम नही होता बे?

bridge.jpgसध्या दुसरा लॉकडाऊनची चर्चा सुरू आहे. पण गेल्या वर्षीच्या पहिल्या लॉकडाउन दरम्यान अनेक लोकांना जे हाल सोसावे लागले त्यातून मदत मिळावी यासाठी अनेक संस्था पुढे आल्या. अमित ढोले यांची साद प्रतिष्ठान ही एक संस्था, लोकांना तयार अन्नाची पॅकेट्स वाटणे ,इथपासून सुरू केलेले काम, हळू हळू रेशन किट वाटणे, बाहेर गावच्या लोकांच्या याद्या करून , त्यांची वैद्यकीय चाचणी करून , त्यांच्या साठी गाड्या अरेंज करणे असे अनेक टप्पे घेत पुढे गेले.

’नायिका महाभारताच्या’

भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेने आयोजित केलेल्या ’नायिका महाभारताच्या’ या व्याख्यानमालेमध्ये डॉ. सुचेता परांजपे, डॉ. गौरी मोघे आणि डॉ. अरुणा ढेरे या तीन विदुषींची एकूण सहा व्याख्यानं होती. तीन शनिवार-रविवारच्या सकाळी चाललेल्या या व्याख्यानमालेविषयी थोडंसं मनोगत.

लढाई आणि स्मारक

Monument.jpgही गोष्ट आहे जगातील एका मोठ्या जैविक आक्रमणाची व त्याच्या यशस्वी निर्मूलनासाठी लढल्या गेलेल्या लढाईची. ऑस्ट्रेलियातील क्वीन्सलँड व न्यू साऊथ वेल्स या भागात घडलेली फड्या निवडुंगाच्या उपद्रवी जैविक आक्रमणाची व त्याच्या निर्मूलनाची ही यशोगाथा.

भुभु आणि माऊ बाळांच्या गंमती जमती

इथे सगळ्या भूभू आणि माऊ पालकांचे स्वागत आहे. ज्यांना व्हावं वाटतय त्यांचेही स्वागत!!
आपल्या बाळांच्या गमंती जमती, त्यांचे फोटो आणि किस्से मायबोलीकरांशी शेअर करण्यासाठी हा धागा.

मायबोली आयओएस अ‍ॅप प्रकाशीत झाले.

मायबोलीचे अँड्रॉईड अ‍ॅप प्रकाशीत झाल्या दिवसापासून , iOS अ‍ॅप कधी येणार अशी विचारणा सुरू होती.

मायबोलीचे ios अ‍ॅप, अ‍ॅपल अ‍ॅपस्टोअरमधे सगळ्यांंसाठी उपलब्ध आहे.
आयफोन आणि आय पॅड दोन्हीवरही हे अ‍ॅप चालेल.

मायबोली अँड्रॉईड अ‍ॅप प्रकाशीत झाले

२०१७ मधे मायबोलीची मोबाईल सुलभ आवृती प्रकाशीत झाल्यापासून , मोबाईलवरून मायबोलीवर येणार्‍यांची संख्या प्रकर्षाने वाढली आहे. मायबोलीचे अ‍ॅप असावे अशी सुचना बर्‍याच मायबोलीकरांकडून येत असते.
मायबोलीचे अँड्रोईड अ‍ॅप आजपासून गुगल प्ले स्टोअर मधे सर्वांसाठी उपलब्ध आहे.

२१ व्या वाढदिवसाला मायबोलीकरांची जगाला भेट : maayboli.cc

मायबोलीच्या २१ व्या वाढदिवसाच्या या आनंदाच्या दिवशी, मायबोलीकरांकडून सगळ्या जगाला आपण ही भेट अर्पण करतो आहोत. मायबोली क्रियेटीव्ह कॉमन्स www.maayboli.cc ही साईट आजपासून सुरु होते आहे. अनेक मायबोलीकर छायाचित्रकारांच्या देणगीमुळेच हा प्रकल्प उभा राहिला आहे. ही प्रकाशचित्रे प्रताधिकारमुक्त आहे आणि कुणाचीही परवानगी न देता विनामूल्य ही प्रकाशचित्रे वापरता येतील

राजकन्या आणि.....

large_fairy-tales-877250_1920.jpg अनेक परीकथा आपल्या आवडत्या होत्या आणि त्यातल्या राजकन्येसारखं होण्याचा प्रयत्न आपणही केला आहे म्हणजे अगदी प्रियांकासारखं हातावर dad's lil girl!असं गोंदवून घेतलं नाही,तरी आपण आपल्या वडिलांच्या 'आंखोंका नूर' होतोच होतो, लाडकी राजकन्या!

क्लाऊन्स विदाऊट बॉर्डर्स : निर्वासित मुलांना रिझवणारे ‘जोईज्’

मेझिंगसारखे अनेक विदूषक आपली ही दुर्मिळ पण अस्सल कला जगभरातल्या निर्वासित मुलांसमोर सादर करण्यासाठी झटत आहेत. त्यांना प्रसिद्धी नको आहे, पैसा नको आहे; निर्वासित मुलांच्या चेहर्‍यांवर हसू फुलावं इतकीच त्यांची इच्छा आहे. मेझिंगसारख्या विदूषकांना एकत्र आणलंय ‘क्लाऊन्स विदाऊट बॉर्डर (सीडब्ल्यूबी)’ या आंतरराष्ट्रीय स्वयंसेवी संघटनेने.

कांदेपोहे कार्यक्रम धमाल किस्से.

large_meeting-for-arranged-marriage.jpgकांदेपोहे कार्यक्रम, लग्नासाठी मुलांना/मुलींना भेटणे याचे धमाल किस्से. तुमचेही किस्से येऊ द्यात ! लग्नाळू असाल तर इतरांच्या अनुभवातून शिकताही येईल.

एक रहस्यमय रेल्वेस्टेशन

भारतात अनेक रहस्यं आहेत. अनेक गूढ गोष्टी आहेत.
या अशा गोष्टींचा खजिना बहुतेक पश्चिम बंगाल मधे मोठ्या प्रमाणात आहे. इथे गुप्त धनाच्या, ट्रेजर हंटच्या गोष्टी समजतील, कुठे जंगलात कुणा राजाचा पुरून ठेवलेला खजिना अशा गोष्टी तर खूप ऐकायला मिळतात.