रंगीबेरंगी

मायबोली आयओएस अ‍ॅप प्रकाशीत झाले.

Posted
6 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
6 वर्ष ago

मायबोलीचे अँड्रॉईड अ‍ॅप प्रकाशीत झाल्या दिवसापासून , iOS अ‍ॅप कधी येणार अशी विचारणा सुरू होती.

आजपासून मायबोलीचे ios अ‍ॅप, अ‍ॅपल अ‍ॅपस्टोअरमधे सगळ्यांंसाठी उपलब्ध आहे.

विषय: 
प्रकार: 
शब्दखुणा: 

सत्यमेवा जयते

Posted
3 months ago
शेवटचा प्रतिसाद
3 months ago

गेल्या महिन्यात (जुलै 2024) नारळीकरांच्या वाढदिवसानिमित्त मराठी विज्ञान परिषदेने विज्ञानकथा वाचनाचा कार्यक्रम ठेवला होता. त्यात माझी एक कथा वाचण्यासाठी मला आमंत्रित केले होते. तेव्हा वाचलेल्या सत्यमेवा जयते या कथेची ही युट्युब लिंक. ही कथा एका टोप नावाने ऐसी अक्षरेमध्ये 2020 च्या दिवाळी अंकात प्रकाशित झाली होती. ही कथा माझ्या घोस्ट रायटर आणि इतर विज्ञान कथा या समकालीन प्रकाशनाच्या पुस्तकात नाही.

सत्यमेवा जयते

विषय: 
प्रकार: 

आर्थिक उदारीकरणानंतरचा महाराष्ट्रीय मध्यमवर्ग आणि विज्ञान - तंत्रज्ञान

Posted
3 months ago
शेवटचा प्रतिसाद
3 months ago

गेल्या आठवड्यात सादर झालेल्या नव्या अर्थसंकल्पात परदेशातून होणार्‍या रसायनांची बेसिक कस्टम्स ड्यूटी आधी १०% होती, ती आता १५०% झाली आहे. तीनचार दिवसांपासून याबद्दल संशोधकांच्या समूहात चर्चा सुरू झाली. काहींच्या मते ही छापण्यातली चूक आहे. पण तशी ती नसावी. गेल्या काही वर्षांत रसायनांची आयात वाढल्यामुळे ही वाढ केली, असं सरकारी अधिकार्‍यांनी म्हटल्याच्या बातम्या आज प्रसिद्ध झाल्या आहेत. या वाढीमुळे संशोधनावर विपरित परिणाम होणार आहे.

विषय: 
प्रकार: 

बोटळर वेंकटसामी आणि त्यांचे खीड्डपप्प्स्‌

Posted
11 months ago
शेवटचा प्रतिसाद
11 months ago

पिवळे पडलेले जाड, पण जीर्ण कागद. साधारण वहीच्या पानाच्या आकारचे, पण अरुंद. कधीकाळी एका बाजूनं ते जाड दोर्‍यानं एकत्र शिवले असावेत, अशा खुणा. पहिल्या पानावर बाळबोध देवनागरीत काहीतरी लिहिलंय, पण ते आता वाचता येत नाही. शाई पुसली गेली आहे. कोपर्‍यात तंजावरच्या सरस्वती महाल ग्रंथालयाचा अतिपुसट शिक्का. त्या खाली जाड, काळ्या पेनानं लिहिलंय - D. No. 2644 ; MS 2319. ’इंग्रजी जेवण्याचे जिनस करावयाची पद्धती’, हा तपशील ग्रंथालयाच्या सूचीत अधिकचा. हीच या हस्तलिखिताची ग्रंथालयातली ओळख.

विषय: 
प्रकार: 

“ युनिव्हरसीटी अ‍ॅडमिशन अफर्मेटिव्ह अ‍ॅक्शन" वर अमेरिकन सुप्रिम कोर्टाचा टाळा! योग्य निर्णय!

Posted
1 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
1 वर्ष ago

आज अमेरिकन सुप्रिम कोर्टाने अमेरिकन युनिव्हर्सीटीज मधे प्रचलित असलेला "अफर्मेटिव्ह अ‍ॅक्शन“ चा कायदा मोडीत काढला.

माझ्या मते सुप्रिम कोर्टाने हा एकदम योग्य निर्णय घेतला आहे.

या निर्णयाने सर्व हुशार चायनिज व भारतिय विद्यार्थ्यांना आता युनिव्हर्सीटी अ‍ॅडमिशन मधे योग्य न्याय मिळेल , खासकरुन हार्व्हर्ड, स्टॅनफर्ड व येल सारख्या प्रेस्टिजिअस युनिव्हर्सीटीमधली रेस बेस्ड कोटा सिस्टीम एकदाची निकालात निघेल( अशी आशा करतो!)

विषय: 
प्रकार: 

मायबोली - २६ वर्ष पूर्ण

Posted
2 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
1 वर्ष ago

आज इंग्रजी तारखेनुसार मायबोलीला २६ वर्षे पुर्ण झाली. गणेश चतुर्थीच्या दिवशी, (सप्टेंबर १६, १९९६) मायबोलीची सुरुवात झाली होती.

मायबोलीच्या २६ व्या वाढदिवसाच्या या आनंदाच्या दिवशी, सर्व मायबोलीकरांना हार्दिक शुभेच्छा!!. तुमच्या सर्वांच्या सहकार्यामुळे आणि सहभागामुळे हा प्रवास सुरु आहे आणि राहिल.

-अ‍ॅडमीन टिम

विषय: 
प्रकार: 

दिठी

Posted
3 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
3 वर्ष ago

राती म्हणोनि दिवे । पडतीं कीं लावावे ।
वांचुन सूर्यासवें । शिणणें होय ॥

म्हणोन अद्न्यान नाहीं । तेथेंचि गेलें द्न्यानही।
आतां निमिषोन्मेषा दोहीं । ठेली वाट ॥

प्रकार: 

लेखनात मुख्य चित्र/फोटो देण्यासाठी नवीन सोपी सोय

Posted
4 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
4 वर्ष ago

मायबोलीवरच्या लेखनात चित्रे/फोटो द्यायची सोय अनेक वर्षांपासून आहे. आधी तुमच्या वैयक्तीक जागेत फोटो अपलोड करायचा आणि नंतर तो लेखात चिकटवायचा. पण ही दोन टप्प्यात आहे आणि मोबाईलधारकांसाठी थोडी अडचणीची आहे.

विषय: 
प्रकार: 
शब्दखुणा: 

सामान्य माणसाच्या आगतिकतेची 'suffer' - Joker (स्पॉयलर)

Posted
5 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
5 वर्ष ago

माणूस जगतो म्हणजे नक्की काय? जगण्याची व्याख्या प्रत्येकाची निराळी असते, पण या जगात काही लोकांसाठी श्वास घेणे आणि रोजची भाकरी मिळवून पोट भरणे हेच जगणे असते. कुणाच्याही अध्यात मध्यात नसतानाही शांतपणे श्वास न घेऊ देणार्‍या आणि रोजची भाकरी ही सुखाने न मिळू देणार्‍या दुनियेचा आपण भाग असू तर आयुष्य कसे होते ते 'जोकर' खूप प्रभावी पणे सांगून जातो.

विषय: 
प्रकार: 

जुने हितगुज नाहीसे झाले?

Posted
5 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
5 वर्ष ago

गेल्या आठवड्यात सहज जुन्या हितगुज वर गेलो व तिथल्या विषयावर टिचकी मारली तर पान सापडत नाही असा मेसेज येतो. ते सगळे लिखाण डिलिट केले का?

जाणकारांनी कृपया खुलासा करावा.

विषय: 
प्रकार: 

Pages

Subscribe to RSS - blogs