सामान्य माणसाच्या आगतिकतेची 'suffer' - Joker (स्पॉयलर)
माणूस जगतो म्हणजे नक्की काय? जगण्याची व्याख्या प्रत्येकाची निराळी असते, पण या जगात काही लोकांसाठी श्वास घेणे आणि रोजची भाकरी मिळवून पोट भरणे हेच जगणे असते. कुणाच्याही अध्यात मध्यात नसतानाही शांतपणे श्वास न घेऊ देणार्या आणि रोजची भाकरी ही सुखाने न मिळू देणार्या दुनियेचा आपण भाग असू तर आयुष्य कसे होते ते 'जोकर' खूप प्रभावी पणे सांगून जातो.