स्फुट

"उजाले उनकी यादों के...."

Posted
6 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
6 वर्ष ago

काही गोष्टी, आठवणी, वस्तू अक्षरश: आपलं आयुष्य घडवतात. आणि अंशी आयुष्य बनूनच राहतात.
साधारण तेरा चौदा वर्षापुर्वीची आठवण असेल. मी आणि माझी मैत्रीण एक अतिशय छोटी सदनिका भाडे तत्वावर घेऊन रहात होतो. आमच्या कडे टिव्ही नव्हता. मोबाईल तर तेव्हा फक्त बोलणे यासाठीच वापरात होता किंवा फारतर त्यावर एफ एम रेडिओ चालत असे. विरंगुळ्याचे असे साधन म्हणजे फक्त एक म्युझिक सिस्टिम होती आणि काही मोजक्या सीडीज. त्या उप्पर सतत सुरू असे ते म्हणजे आकाशवाणी पुणे केंद्र (१०१.१)

विषय: 
प्रकार: 

एक 'न'आठवण - "आई"

Posted
6 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
6 वर्ष ago

जसं प्रत्येक आईला आपलं मुल सर्वात सुंदर वाटतं, तसं बहुधा जगातल्या प्रत्येक मुलाला/मुलिला आपली आईच सर्वात सुंदर आणि सुगरण वाटत असेल. आणि त्या प्रत्येक मुलाकडे/मुलिकडे आईच्या म्हणून असंख्य आठवणी असतील. पण माझ्याकडे त्या तश्या अतिशय थोड्याच आहेत.

प्रकार: 

आयुष्यातील सौंदर्यस्थळं

Posted
7 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
7 वर्ष ago

एखादी व्यक्ती लाम्बून पाहून पाहून बरी वाटते, मग आवडायला लागते. हळू हळू तुम्हाला हे ही कळते की त्या व्यक्तीला पण तुम्ही आवडता बहुधा. कारण ही आवडण्याची प्रक्रिया रस्त्यात मुद्दाम येण्याजाण्याच्या वेळी थाम्बणे, कंपनीच्या बसने एकत्र प्रवास करणे, लिफ्ट मध्ये भेटणे यातून सुरू झालेली असते. एक दिवस कानात हेडफोन लावून आपण गाणं ऐकत असताना अचानक तो समोर येतो, मग पुन्हा कधीतरी तेच 'घुंघट की आड से...' ऐकताना त्याचाच चेहरा डोळ्यासमोर येतो. नकळत चेहऱ्यावर स्मितहास्य येते. पण तुमचे हे गुपित फक्त तुम्हालाच माहित असल्याने तुम्ही अजून खूष होता. गाणी वाढत जातात, कधी 'रुपेरी वाळूत माडांच्या बनात ये ना...

प्रकार: 

आधी भौतिक !

Posted
7 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
7 वर्ष ago

आमचे एक भौतिकशास्त्राचे प्राध्यापक होते. ते लय म्हणजे लईच भारी होते. ताडमाड भारदस्त व्यक्तिमत्व, तसलाच आवाज. छाप पाडणारे प्रकरण. दोन्हीही हातांनी वहीवर/फळ्यावर अगदी फास्टंफास्ट लिहायचे. फळ्यावर लिहिताना आपण फळ्याकडे तोंड करून लिहितो, तर हे वर्गाकडे तोंड करून उलट्या हातानेसुद्धा सरळ ओळीत फळ्यावर लिहू शकायचे. तिरके अक्षर आणि पल्लेदार फटकारे. कर्सिव्ह तर बघत र्‍हावे. त्यांच्या हाताच्या चिमटीत पेन एवढुसा दिसायचा. खडू दिसायचाच नाही.

प्रकार: 

स्वप्नी आले काही...

Posted
7 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
7 वर्ष ago

लहान-लहान म्हणून तीची कधी गंमत करावीशी वाटते, तर कधी एऽक रट्टा द्यावासा वाटतो आणि बर्‍याचदा दिलाही जातो. आईने रट्टा दिला, की "आईने वाऽऽ केलंऽऽऽऽ". "आईने वाऽऽ केलंऽऽऽऽ" करत बाबांकडे जावं. बाबांनी रट्टा दिला की आई आहेच जवळ घ्यायला. कधीकधी नुसतं ओरडलेलंही पुरतं, लगेच भोकाड पसरावं. क्षणात हसावं, क्षणात रडावं. पण रडल्यावर बर्‍याचदा पुढच्या पाच मिनिटात सगळं विसरून परत जवळ यायला बाई तयार.

प्रकार: 

आज दिवाली

Posted
8 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
8 वर्ष ago

आज नरक चतुर्दशी दिवालीचा एक पवित्र दिवस आजच्या दिवसाची सुंदर सुरुवात दिवालीच्या अभ्यंग स्नानाने

मुली बरोबर खेळण नेहेमीसारख झाल तोरण पूजा सार सार पवित्र झाल
पण .... आई बाबा गेल्या नंतर मृत्यु इतक्या लवकर घरात प्रवेश करेल अस वाटल न्हवत पण तो आला ऐन दिवालीच्या दिवशी आला आणि आमच्या एकाक्ष बोक्याला घेउन गेला त्याला आताच मूठ माती देऊन आलो त्याच्या देहाच सोन झाल. पण आमच्या पणत्या विझल्या
हे मात्र फार वेगळ झाल खर सांगायच तर खुप खुप वाईट झाल.

विषय: 
प्रकार: 

सायकलीचं आणि अनवानी पावलांच जग!!!!

Posted
8 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
8 वर्ष ago

ज्या काळात, ज्या घरात, ज्या गावात, आणि ज्या कुटुंबात मी जन्मलो तिथे कैक माणसे, बाया, मुले, मुली पायी चालताना दिसायची. बायका नदीवर कपडे धुवायला जात तेंव्हा त्या अनवानी पावलांनी करकर निघत आणि सात आठ माणसांच ओलचिंब धुण घेऊन घरी येत असतं. नदीची वाट चढउतारांची असे. अगदी पावसाळी दिवसात सुद्धा ह्या बायका अनवानी पायांनीच जात. उलट, चप्पल घालून नदीवर जाणं म्हणजे पाय मोडून घेणं असे. कारण, पाय शेवाळी जागेवरुन घसरलाचं तर अनवानी पायांनी जितक्या लवकर सावरता येतं तितक्या लवकर वाहणा घातलेल्या पायांनी सावरता येत नाही.

विषय: 
प्रकार: 

जागा

Posted
8 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
8 वर्ष ago

काल दिवसभर पायपिट करुन मी संध्याकाळी सात वाजता घरी जायला निघालो तर ती वेळ म्हणजे पीक आवर्सची होती. ट्रेन खच्चून भरलेली होती. इतक्या गर्दीतही मला बसायला जागा मिळाली म्हणून मला फार हायसे वाटत होते. अजून दोन मिनिटात मला पेंग येईल असे वाटत होते पण समोर एक भारतिय जोडपे नुकतेच शिरले आणि त्यांच्यासोबत त्यांच्या दोन लहान मुली होत्या. एक प्रॅममधे बसून बडबड करत होती तर दुसरी सुस्त वाटत होती. तिने जांभळा लेग ईन्स घातला होता आणि त्यावर प्रिन्टेट कुरता होता. ती खूप गोड दिसत होती. तिला जागा देऊ की नको देऊ ह्या मन:स्थित असताना एक दोन ट्रेन स्टेशन निघून गेले. मग मी उठलो आणि त्या मुलीला जागा दिली.

विषय: 
प्रकार: 

क्यालिग्राफीचा - पहिला प्रयत्न

Posted
9 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
9 वर्ष ago

आई गं!!! जांभळा रंग एकूणच मला अत्यंत अत्यंत प्रिय. त्यात तो जर शाईचा असेल. त्याची नीप छान असेल आणि तो गळत ओघळत नसेल तर आणखीच मजा!!!

माझी ताई जितकी सुंदर रांगोळी काढायचा ना तितकीच सुंदर ती कशिदा काढण्यात, शेणानी घर सारवण्यात, आणि खास म्हणजे लिहिण्यात हुशार! मी चवथ्या वर्गात असताना ती दहावीला होती. तिच्या समोर तिच्या मैत्रिणीची रसायन शास्त्राची वही होती आणि बहिण तिच्या वहीतून आपल्या वहीत काहीतरी समीकरण लिहित होती. ते समीकरण बघून मला इतके नवल वाटले की मला रसायन शास्त्र हा विषय कधी येतो कधी नाही असे झाले होते.

विषय: 
प्रकार: 

डायलॉगबाजी...

Posted
9 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
8 वर्ष ago

मागच्या आठवड्यात एके दिवशी घरी गेल्या-गेल्या लेक मिठी मारून म्हणाली,

'बाबा, सोमवारी मला 'कल्मिनेटींग अ‍ॅक्ट'चे डायलॉग मिळणार आहेत !!!!!'

कल्मिनेटींग अ‍ॅक्ट म्हणजे यांच्या नवीन शाळेत बसवलेली छोटी छोटी नाटके किंवा पथनाट्ये.

मागच्या वेळेस "बाई मलाही डायलॉग देतील देतील" म्हणून खेळाच्या शेवटच्या दिवसापर्यंत वाट पाहिली. अगदी अ‍ॅमेलिया बेडेलिया नाही तरी रस्त्यावरची चिन्हे किंवा आग लागल्यावरच्या सूचनांचे कथन तरी मिळेल! पण शेवटच्या दिवसापर्यंत लागलेली आशा धुळीला मिळालेली. मग भाग घेतलेल्या वर्गमित्रांच्या गप्पांमध्ये सामिल होण्यावाचून हाती काही शिल्लक नव्हते.

प्रकार: 

Pages

Subscribe to RSS - स्फुट