लॉस एंजलिस मधले मायबोलीकर, सगळे ठिक आहात ना? या आठवड्यातल्या तिथल्या भि़षण आगीचे वृतांत वाचताना व त्याने झालेल्या हानीचे फोटो बघताना कससच होत. बर्याच हॉलीवुड सेलीब्रीटीजची घरे बेचिराख झाली आहेत. त्या भागात राहाणार्या सगळ्यांनीच काळजी घ्या.
मी (वय वर्ष १८, पस्तीस-चाळीस वर्षांपूर्वी):
घरात पावणे दोन वर्षाचे लहान मूल आहे. जरा जास्तच द्वाड, अवखळ, ऍक्टिव्ह आहे. दार उघडले की बाहेर पळत जातो आणि उतरत्या जिन्याच्या तोंडाशी उभा राहतो. परवा त्याचा अंदाज चुकला आणि पहिल्या पायरीवर पडला. तोंडाला थोडेसे लागले पण नशिबाने गडगडत गेला नाही.
घरात सतत कोणी ना कोणी त्याच्यामागे असतेच. कधी कधी तर एकापेक्षा जास्त माणसे असतात. घर छोटे आहे आणि सामान बरेच आहे त्यामुळे इजा होण्याची भीती वाटते.
तोच रोजचा रस्ता. तोच गर्दीचा चौक. तिकडेच दुचाकी पिळत चाललो होतो. माझ्यासारखीच सकाळी कामावर निघालेली मंडळी. कुणी ऑफिसला, कुणी कॉलेजला. कुणी पॅथॉलॉजी लॅबची भली मोठी बॅग पाठीला अडकवून, कुणाच्या कुरियरवाला भली मोठी बॅग पायात घेऊन. कुणी हेल्मेट घालून, कुणी टोपी घातलेलं. कुणाचे केस वाऱ्यावर लहरताहेत, तर कुणी तोंड, डोकं सगळं बांधून चाललंय. कुणी कामाच्या युनिफॉर्ममधे, कुणी फॅशनेबल फाटक्या जीन्स मध्ये. कुणाला मी ओव्हरटेक करतोय, कुणी मला डावी घालून पुढे निघतोय. बहुतेक एकटेच, पण काही दुकटे.
एका लग्नाच्या निमित्तानं अलीकडेच नागपूरला जाणं झालं होतं. 32 वर्षांनी नागपूरला जाणं होत असल्यामुळं उत्साह वाढलेला होताच. मग बऱ्याच आधी मी पुणे-अजनी एक्सप्रेसच्या विनावातानुकुलित श्रेणीचं आरक्षण करून ठेवलं. काही दिवसांनी समजलं की, वऱ्हाडी मंडळीही माझ्याच गाडीनंच जात आहेत, पण ते वातानुकुलित श्रेणीनं जाणार होते.
(भाग २ - https://www.maayboli.com/node/86070)
रस्ता पार करून गल्लीच्या तोंडावर मी उभी होते, सुभाषकाकाचा मागोवा घेत. काका एका ओट्यावर चढला आणि त्यानं खोलीचं कुलूप उघडलं.
भाजीवाली माझ्याकडे बघत होती.
"काय, भाजी पायजे का बाई?" तिनं प्रश्न केला.
मी तंद्रीतून बाहेर आले. मान नकारार्थी हलवली.
भाजीवालीच्या शब्दांत कुतुहल होतं. "इथं कोनाकडं आलावता?" तिलाही ती विसंगती जाणवत होती.
माझ्या नजरेचा अंदाज घेत तिनं विचारलं, "कोन पायजे व्हतं?"