दुपारी दोनची वेळ. डोक्यावर ऊन आणि पोटात भूक मी म्हणत होती. नेहमीचा रस्ता, नेहमीचा सिग्नल. नेहमीची गर्दी, नेहमीचीच तगमग. वाहनांच्या गर्दीतूनही मला सिग्नल दिसला! उजवीकडे वळायचं होतं, हा सिग्नल सरळ जाणाऱ्यांपेक्षा आधी बंद होतो. बघतानाच तो लुकलुकला. म्हणजे उजवीकडे वळणं पाचसात सेकंदात बंद होणार. मी शहाण्या नागरिकासारखा माझ्या दुचाकीचा वेग कमी केला. रस्त्याचा न रंगवलेला मध्य पकडून त्याच्या डाव्या साईडला गाडी घेतली. आता न रंगवलेल्या एका झेब्रा क्रॉसिंगच्या जरा आधी उभं रहायचं. हा विचार वेड्यासारखाच होता.
साल 2001
रविवार संध्याकाळ, साधारण साडेपाच सहाची वेळ.
त्या दिवशी कितीतरी दिवसांनी, दररोजच्या सकाळी ६.३० ते रात्री १०- १०.३० ह्या चक्रातून निसटून, दिवसा-उजेडी क्लासच्या सगळ्या assignments संपवून बाहेर पडायला मिळालेलं. खर तर 28 नंबरची बस पकडायची CST ला जायचं आणि तिकडून घरासाठीची ट्रेन पकडायची हा शिरस्ता!
पण अंधार पडला नाहीये, घरी जायला थोडा उशीर झाला तरी चालण्यासारखे आहे… मग विचार कसला करायचा? मी आणि मैत्रीण पायीच निघालो, मध्ये चर्चगेटच्या सबवेमध्ये शेवपुरी चापू मग तिकडून चालतच CST गाठता येईल इतका साधा सरळ प्लॅन.
शाळेतून पळत-पळतच घर गाठलं. वाटेतच लागणाऱ्या 'सलमा जनरल स्टोअर्स' मधून आणलेल्या २ रुपयांच्या खास अशा मांजा ची पूडी एकदा तपासली आणि तसाच हाथ-पाय धुवायला गेलो. ५ मिनिट माझ्या माकडउड्या पहिल्या नंतर 'निदान बाबा येण्या अगोदर तरी घरी ये मेल्या' असं म्हणत ४ घास आई ने खाऊ घातले ते थेट पळालो गुड्डू च्या घरी. पोहचलो तर तिथे व्हरांड्यात खुद्द गुड्डू, विवेकया, पप्पू, मंग्या आणि अमल्या अशी पतंगी मातब्बर सरदार हजर! सरदारच ते, कारण हे लोक पतंगबाजी मध्ये मुरलेले आणि मी आपला 'Trainee'.
मला नेहमीच पंजाबी लोकांचा जगण्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन आवडतो. कधीच नशिबावर . हवाला ठेवून न जगणारे, भिक न मागता, कष्टावर अतोनात विश्वास ठेवणारे, धर्मातील सेवेसारख्या व्रताचा आयुष्याच्या प्रत्येक पायरीवर अंगीकार करणारे आणि कोणत्याही कसोटीच्या क्षणी मनासारख्या न होणाऱ्या गोष्टीला ‘ओ! कोई गल नहीं’ असं म्हणत काळजीचीच विकेट घेणारे; खाण्यापिण्यात, आदरतिथ्यात आणि वागण्यात कमालीचा मोकळेपणा राखणारे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अल्पसंख्यांक (अगदी २-३%)असूनही कधीही कुठल्या आरक्षणाची मागणी न करता स्वतःच स्थान नोकरी,व्यवसाय ते देशाचं संरक्षण करण्यापर्यंतच्या क्षेत्रात निर्माण करणारे असे ते पंजाबी!
काळी आई : सांगलीच्या 'गावभागाची' आरोग्यदूत'
आपल्या देशात कितीही तंत्रज्ञानाची प्रगती झाली, तरी जुन्या पण अर्थपूर्ण (आणि कालबाह्य) प्रथा काही पिच्छा सोडत नाहीत, अगदी २१व्या शतकातही !! काही आपल्या निसर्गाबद्दलची कृतज्ञता व्यक्त करतात, तर काही स्वतःच्या, घरातल्या 'गोकुळां'ची आर्थिक शारिरीक भरभराट व्हावी, म्हणून रचल्या असतात. महाराष्ट्रातल्या एका जिल्हयाच्या गावात अशीच एक प्रथा आहे, 'काळी आई' म्हणून!!
आज संध्याकाळी रस्त्याने चालताना आमच्या फेवरेट ' भट ' साहेबांच्या ' राज ' या ' अति भयंकर ' शिणेमातले ' आपके प्यार में, हम सवरने लगे' हे दर्दभरे गाणे कानी पडले अन् मन थेट 23 वर्षे मागे गेले.
त्यावेळी आमच्या गावात या चित्रपटासोबत एक ' अफवा ' पण रिलीज झाली होती.
जो माणूस हा चित्रपट रात्रीचा 9.30चा शो एकटा पाहील, त्याला 1 लाख रुपये इनाम मिळेल.
..... आणि
एका माणसाने रात्री तसा तो शो पाहिलाही, अन् त्याला ते 1 लाख रुपये मिळालेही, मात्र ते घ्यायला तो जिवंत नव्हता....!
आपल्या घराच्या बाहेर एका कट्ट्यावर रॉबिन आरामात सिगरेट पीत विचार करत बसला होता. आबांच्या नाटकाचे बिंग बाहेर काढल्यानंतर खरंतर त्याला समाधान वाटायला हवे होते, कारण त्याने खुनात वापरलेल्या हत्याराचा शोध लावलेला होता आणी या प्रकरणात प्रगती केली होती. पण त्याला म्हणावं तसं समाधान लाभलेलं न्हवत. आबांचा नाटकी खेळ हा फक्त मालतीबाईचे खर स्वरूप बघणे यासाठी होता. अर्थात मालतीबाईचे लोकांसोबतचे चुकीचे वागणे आणी बाहेरील बेकायदेशीर गैरप्रकरण वाढली असती तर आबांनी मालतीबाईचा जीव घ्यायला सुद्धा मागेपुढे पहिले नसते तसं आबांनी स्वतः बोलून दाखवलं होतं.
२०१२ – मी तेलुगु गाण्याच्या प्रेमात पडलो. आणि प्रवास चालू झाला.
तेलुगू सिनेमा आणि मी !
मी 2012 मध्ये माझ्या मित्राच्या – ऋषिकेशच्या(धर्माबाद, नांदेड) – तेलूगु गाण्याच्या प्रेमाने ती अवीट गोडीची गाणी ऐकू लागलो. मग ती समजून घ्यावी, म्हणून ती भाषा (अगदी त्याला ‘तेलगू’ नव्हे, तर ‘तेलूगु’ असे म्हणावे इथून) त्याच्या मित्राकडून (त्याचे मुळ गाव – काकीनाडा, आंध्र प्रदेश) शिकू लागलो. तो मुलगा तीन महिन्यांसाठी सीए कोचिंगला पुण्यात आलेला.
रॉबिन वाड्यात आल्यावर त्याने चहूकडे नजर फिरवली, संध्याकाळची वेळ असल्याने तुळशीवृंदावनापाशी उदबत्ती लावलेली होती त्याचा सुवास सगळीकडे दरवळत होता. आता या वेळी वाड्यात सगळे असतील हा अंदाज बांधूनच रॉबिनने या वेळी वाड्यात येण्याचं ठरवलं होतं. आत आलेल्या हवालदाराला गेस्टरूमच्या बाजूला उभं राहायला सांगून रॉबिन पुढे जाऊन आबांच्या खोलीकडे जाऊ लागला.
“ देशमुख मी इथे उभा आहे तुम्ही वाड्यातल्या इतर सगळ्यांना बोलावून आणा.” रॉबिन पुढे जात म्हणाला.
हॉस्पिटलमध्ये स्पिरिटचा आणी औषधांचा वास जास्तच दरवळत होता. नर्सेसची येण्याजाण्याची लगबग चालू होती. त्या त्या स्पेश्यालीटीचे डॉक्टर्स आपापल्या केबिनमध्ये आलेले होते आणी नंबरनुसार पेशंट्सना तपासत होते. अशाच एका केबिन बाहेर रॉबिन आपला नंबर येण्याची वाट पाहत बाकावर बसला होता. त्याच्या आजूबाजूला जास्त पेशंट्स न्हवते कारण डॉक्टरांची तपासायची वेळ अजून सुरु झालेली न्हवती. डॉक्टर येण्याची वेळ पाहूनच रॉबिनने तातडीने दिवसाची पहिली अपोइन्टमेंट घेतली होती. डॉक्टरांनी अजून पेशंट तपासायला सुरुवात केली न्हवती त्यामुळे रॉबिनला पटकन आत जाऊन डॉक्टरांची भेट घेता येणार होती.