अवांतर

चित्रावरून लिखाण - चेहेरा

Submitted by Abuva on 4 March, 2024 - 09:23
मास्क

घरी आलो. रूममध्ये आलो. नेहमीच्या सवयीनं खिडकी उघडली. गरम वाऱ्याचा झोत आत आला. शेजारच्या बागेत अजून लहान मुलांची गर्दी झाली नव्हती. लवकर आलो होतो आज. हात खिशाकडे गेला. विमानाचं तिकीट होतं. रात्रीचं. परतीचं.

विषय: 
शब्दखुणा: 

कृष्ण सखा

Submitted by काव्यधुंद on 2 March, 2024 - 22:24

कृष्ण सखा अन् कृष्ण सोबती
कृष्णच उरला अवतीभवती

बालपणी अंधार भेदला
बाळकृष्ण मज मनी भावला

निरागस हासे खोड्या करुनी
कृष्णच भरला ध्यानीमनी

गोपांमध्ये सावळवर्णी
कृष्णनाम रत माझ्या कानी

पराक्रमाची सोज्वळ मूर्ती
कृष्णरुपावर माझी भक्ती

नात्याहून कर्तव्य परायण
कृष्ण कृष्ण हे नीत पारायण

विश्र्वरुप दावूनी जगाला
महाभारते कृष्ण शोभला

प्रजेस माने कुटुंबासम
कृष्णराज्य आनंद वैभव

चुकली नाही ललाट रेषा
क्लेश पाहुनी सुटली आशा

त्यातून तरला कृष्णच उरला
कृष्ण जगी हा अशा शोभला

विषय: 

स्लॅम बूक आठवणी - शाळा कॉलेजचा शेवटचा दिवस.!

Submitted by ऋन्मेऽऽष on 2 March, 2024 - 17:58

मागच्या एका आठवड्यात लेकीच्या शाळेचा (इयत्ता चौथी) शेवटचा दिवस होता. त्यानंतर सुट्ट्या आणि परीक्षा सुरू होणार होत्या. शेवटचा दिवस म्हणजे त्या वर्षापुरते मित्रांचा निरोप घ्यायचा. म्हणून शाळेच्या गणवेषाऐवजी छान नवीन कपडे घालायला परवानगी होती. पोरगी शाळेत जाताना उत्साहात होती. परत आली ते हातात एक कागद नाचवत आली. पगाराचा चेक जसा देवासमोर ठेवतात तसे तो कागद माझ्या हातात ठेवला. कारण आपला बाप आठवणी जतन करायला त्यांचा फोटो काढून ठेवतो हे तिला माहीत आहे. आणि ईथे मुळात तो कागदच आठवणींचा होता.

विषय: 

नवा गडी

Submitted by अजिंक्यराव पाटील on 1 March, 2024 - 08:01

"हेज्यायची कटकट" करवादत तो भेलकांडत उठला. बंगालीकडचा हा नवा स्टॉक जरा जास्त पावरबाज निघाला होता त्याच्यासाठी. तरी बंगाली सांगत होता, बॉडी बारीक आहे तर जरा कमी दम मार म्हणून. पण बॉडीने काय होतंय भेंडी.. अर्ध्या शहरात आपली हवा आहे, कोन माय का लाल पण आपल्या नादाला लागत नाही. चुकून कोणी तसं वाटलं तरी आपला कोयता आणि तो... साल पण घरच्याना लै प्रॉब्लेम. पूर्वी महिन्यातून एकदा अंडी आणि पाव्हने आल्यावर चिकन खाणारे हे, आता रोज बोट्या हाणतात तेव्हा नाय दिसत का हा पैसा कुटून आला. जाउंदे भेंडी.. सकाळ सकाळ काय भोसडा उदास करायचा..

विषय: 
शब्दखुणा: 

कोडे

Submitted by काव्यधुंद on 29 February, 2024 - 00:38

तू कोडे मनास पडलेले, तू भास अंतरी दडलेले
तू येशील म्हणता म्हणताना, मृगजळ हवेत विरलेले

तू काल सोडल्या वाटा, तू पायी रूतता काटा
गालावरती नकळत माझ्या, अश्रू दोन ओघळलेले

तू ज्योत निरांजन वाती, तू एकांतातील साथी
असून माझ्या सभोवती, माझ्यापासून दुरावलेले

तू गंध कोवळा पानी, तू कुण्या गावची राणी
स्वप्नसुंदरी राज्य मनाचे, तुझ्याच हाती गेलेले

तू कानी येता शीळ, जणू क्षणात सरला काळ
मनी आठवून साठवताना, निसटून हरवून गेलेले

तू चराचरातून विहरत, भिनलेले गीत अनावर
पूर्णत्वाला अपूर्णेतेची किनार देऊन उलगडलेले

विषय: 

चित्रावरून लिखाण : एक ( सुचविलेला) उपक्रम !

Submitted by छन्दिफन्दि on 28 February, 2024 - 15:43

मराठी भाषा गौरव दिना निमित्त officially उपक्रम सुरू झाले नसले तरी मागील वर्षातील काही उपक्रमांचे धागे वर काढले आहेत. किंवा इतरही नवे धागे काढले आहेत.

हा असाच एक धागा..

पूर्वी आल्याला शाळेत असताना एक चित्र बघून चित्र्वर्णन लिहायला येत असे. परंतु आता एखादया चित्राकडे बगून काहीतरी छानस सुचू शकत. एकाच चित्रात प्रत्येकाला काहीतरी वेग वेगळं दिसत , त्याचे / तिचे अनुभव वेगळे असतात त्यामुळे त्या चित्राकडे बघून उमटणारे तरंग ही वेग वेगळे असतात. त्यातून निरनिराळे साहित्य / साहित्यप्रकार बाहेर येऊ शकते.

विषय: 

चित्रावरून लेख : दळण

Submitted by छन्दिफन्दि on 27 February, 2024 - 01:55

झुंज मुंजु वेळ, हवेतला छान गारवा, दवात भिजलेल्या मातीत मिसळलेला प्राजक्ताचा मंद सुवास, आणि ऐकू येणारा गोड प्रेमळ स्वर..
“पहिली माझी ओवी, देवा गणरायाला …. “

विषय: 

खास फक्त मराठीत असणारे शब्द...

Submitted by छन्दिफन्दि on 27 February, 2024 - 01:25

खमंग!
शब्दातच अनुभूती !
खमंग वास असतो की चव? की दोन्ही ??
आपले खासम खास महाराष्ट्रीयन खमंग पदार्थ,
खमंग चकल्या
खमंग भाजणी
खमंग गुळपोळी
खमंग तिळगुळ
खमंग थालीपीठ
खमंग काकडी
पाणी सुटलं ना तोंडाला !
अजून कोणते खमंग पदार्थ आठवतायत तुम्हाला?
खमंगला हिंदीत किंवा इंग्लिशमध्ये काय म्हणतात , खूप आठवून पाहिलं पण नाही सुचलं .
असं वाटतं बहुदा खमंग पदार्थ फक्त मराठीच असावेत म्हणून कदाचित त्याला इतर भाषांमध्ये पर्यायी शब्दच नाही, खरं का??

विषय: 

कॉर्पोरेट अभिज्ञान

Submitted by Abuva on 25 February, 2024 - 06:18
Dalle2 generated oil painting cruise in a sunset

ओ, तुम्हाला ते बिटकॉईन माहितेय का? क्रिप्टोकरन्सी, इथेरिअम, ब्लॉकचेन वगैरे? ऐकलं असेल की! अगोदरच वैधानिक इशारा देण्यात येत आहे की कथेच्या प्रवाहात हे खाचखळगे लागणार आहेत. पण काळजी करू नका. प्रस्तुत कथालेखकाला देखील यातलं काही कळत नाही. काही न कळता तो जर कथा लिहू शकतो तर तुम्हाला जरा ठेचकाळायला, म्हंजे वाचायला काय हरकतै?

विषय: 

सावधान.. खुलं आव्हान.. कारण आता शर्यतीत मी आलोय..

Submitted by विक्रम मोहिते on 23 February, 2024 - 08:48

इथुन सुरुवात झाली http://www.maayboli.com/node/12190
इथे पान पलटलं http://www.maayboli.com/node/1275
आणि हे आमचे प्रेरणास्थान https://www.maayboli.com/node/13017

विषय: 

Pages

Subscribe to RSS - अवांतर