चक्र (भाग ३ - अंतिम)
(भाग २: https://www.maayboli.com/node/84975)
कोजागिरीचा आठवडा होता. उलुपीच्या फ्लॅटच्या टेरेसवर चांदणं पडलं होतं. आजुबाजूला जवळ एवढी उंच बिल्डिंग नसल्यानं एक सुकून होता. समोर अर्जुन आणि उलुपी बसले होते. हातात कॉफीचे मग होते.
(भाग २: https://www.maayboli.com/node/84975)
कोजागिरीचा आठवडा होता. उलुपीच्या फ्लॅटच्या टेरेसवर चांदणं पडलं होतं. आजुबाजूला जवळ एवढी उंच बिल्डिंग नसल्यानं एक सुकून होता. समोर अर्जुन आणि उलुपी बसले होते. हातात कॉफीचे मग होते.
मी घर शोधत होतो. का, ती स्टोरी नंतर कधी तरी! ब्रोकरनं संध्याकाळची वेळ दिली होती.
"खरं बोलू? बुरा मत मानना"
"बोला ना. आम्हाला तुमचा फीडबॅक हवाच आहे."
"कुत्रं विचारणार नाही या यूआयला."
या अचानक झालेल्या हल्ल्यानं चित्रांगदा एकदम बॅकफूटला गेली. "काय?...”
"पण का? आम्ही स्टॅन्डर्ड्स फॉलो केली आहेत." मीटिंगला जमलेल्या टीमकडे बघत तिनं करणला प्रतिप्रश्न केला.
"असतील, पण मार्केटला स्टॅन्डर्ड हवं आहे असं कोणी सांगितलं?"
"सांगायला कशाला पाहिजे? जे वापरायला सोपं ते चांगलं. सगळ्यांना हा यूआय ओळखीचा आहे. त्यामुळे सगळ्यांना सोयिस्कर पडणार, हे आंधळासुद्धा सांगेल."
त्या जागतिक धक्क्यानंतर जीवन हळूहळू मूळपदावर येऊ लागलं होतं. पण व्हिसाचा एवढा प्रॉब्लेम झाला होता, की या कॉन्फरन्सला कोणी पुण्याहून येऊ शकेल असं वाटत नव्हतं. नव्हे, येणार नव्हतंच. इतर वेळी यूएस आणि ऑनसाइटचा जप करत फुरफुरणारे सगळे घोडे शर्यतीतून बाहेर पडले होते! ती दहशतच इतकी बसली होती म्हणा ना! म्हणजे कामाचं मेन लोड आता यूएसमधल्या टीमवर येणार होतं. खरं तर ही न्यूयॉर्कमधली कॉन्फरन्स होणार की नाही इथपासून शंका होती. पण टाईम्स स्क्वेअर मधली नववर्षाची पूर्वसंध्या नेहमीच्या उत्साहात पार पडणार अशी चिन्हं दिसू लागली होती. म्हणजे परिस्थिती निवळते आहे असं चित्र होतं.
"उलुपी येतेय इथे", चित्रांगदा उत्साहानं म्हणाली.
"कधीऽ? तुला कसं कळलं?" अर्जुनोवाच.
"कावळ्या, डोकं वापर रे जरा! उदयननं सांगितलं, दुसरं कोण सांगणार? आज सकाळी त्याला इमेल आली आहे पुण्यातून."
"पण मग उलुपीनं का नाही मेल केली?"
"करेल रे... बरं, मी काय विचार करत होते, आपण तिघांसाठी एक अपार्टमेंट शोधायचं का?"
"तिघं?"
"हो, तिघं मिळून राहू. एक गाडी लीझ करू. पुढच्या आठवड्यात माझं ड्रायव्हिंग लायसन्स येतंय."
"अं, चालेल."