दुःस्वप्न
Submitted by Abuva on 30 March, 2024 - 09:33
अर्जुन मीटिंग संपवून परतला तेंव्हा उदयन आणि चित्रांगदा केबिनमध्ये होते. ते लंच करून परत आले होते. या मीटिंगमध्ये अडकल्यानं अर्जुनचा लंच बुडला होता. पण टेबलावरच त्याचं सॅन्डविच दिसत होतं. धापकन खुर्चीत सांडत अर्जुन म्हणाला, "च्यायला, संपता संपत नाहीत यांच्या कटकटी. हे असंच हवं अन् तसंच हवं." तो लॅपटॉप उघडत होता. "का विचारलं तर एकाला धड कारण देता येत नाही. मग साठमारी. तुझं खरं का माझं खरं... झाला तुमचं लंच?"
विषय:
शब्दखुणा: