गुगलवर कोणत्यातरी झाडाची माहिती शोधताना मला जागू प्राजक्ताचा निसर्गाच्या गप्पा हा धागा दिसला आणि मला मायबोलीचा शोध लागला.
२०२०, कोव्हिडमुळे लॉकडाऊन चालू होते, हाताशी वेळच वेळ होता . मी मायबोलीवरील सर्व साहित्य वाचू लागले . मोठा खजिनाच सापडला पण मायबोलीची गोडी लागली ती मात्र मायबोलीकरांच्या धमाल प्रतिसादांमुळे. ब्लॅककॅटचे तिखट आणि खोचक प्रतिसाद, मी_अनुचे प्रॅक्टिकल आणि विचारी प्रतिसाद, मानव पृथ्वीकराचे नर्मविनोदी आणि माहितीपूर्ण प्रतिसाद . पूर्वी बोकलतही छान लिहायचे पण आता ते आपले नाव सार्थक करतात.
गेला आठवडा अमेरिका खंडातल्या ३ देशांच्या स्वातंत्र्यदिनाचा… कॅनडाचा जुलै १, अमेरिकेचा जुलै ४ तर व्हेनेझुएलाचा जुलै ५ ! भारतातल्या दिवाळी फटाक्यांची मौज इथे ४ जुलै आणि ३१ डिसेंबरला फिटते. एकावर्षी आम्ही रोडट्रीपहून परत येत होतो आणि दूरवर रस्त्याच्याकडेने वेगवेगळ्या रहिवासी भागातून उडणाऱ्या शोभेच्या दारुकामाचे दर्शन होत होते. काही वर्षं नेमाने हजेरी लावून आम्ही ऑस्टिन डाऊनटाऊनमध्ये रात्रीच्यावेळी आकाशात साजरी होणारी आतिषबाजी पाहायला जायचो. मागच्यावर्षीपासून यामध्ये वेगळा बदल येऊ घातलेला आहे.
काल दैववशात एका इस्पितळात तपासण्यांसाठी जावं लागलं. ज्या विशेषज्ञाकडे आमची भेट होती त्याच्या दारासमोर ही भली मोठी लाईन होती. मग तिथेच उभं राहून मोबाईलचा खुराक चालला होता. कंटाळा आला तरी आमचा नंबर काही येईना. मग मोबाईल मधली मान वर करून आसपासचा अंदाज घेतला. बरीच मानवसदृश मंडळी होती की! समोरच दोन लिफ्टा होत्या...
पॅरिसमध्ये होत असलेल्या यंदाच्या उन्हाळी ऑलिम्पिक स्पर्धेत 206 देशांमधून आलेले 10,714 क्रीडापटू आपापले कौशल्य पणाला लावून पदक जिंकण्याचा प्रयत्न करतील. जगातील सर्वात मोठा उत्सव असलेल्या ऑलिम्पिक स्पर्धा 26 जुलै ते 11 ऑगस्टदरम्यान पार पडत आहेत. त्यामध्ये भारताचे 117 क्रीडापटू सहभागी होणार आहेत. टोकियोमधील 2020 च्या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये क्रीडापटूंनी केलेल्या चमकदार कामगिरीमुळे भारताने आजवरची सर्वाधिक पदके जिंकली होती. तशाच कामगिरीची भारतीय क्रीडापटूंकडून यंदाही पुनरावृत्ती व्हावी अशी आशा भारतीयांना आहे.
विद्यार्थी की परीक्षार्थी !
शीर्षक अगदी पाचवीच्या निबंधासारखे वाटतेय की नाही...
पण विषय त्याच वयाच्या मुलांचा आहे.
झाले असे,
चार दिवसांपुर्वी शाळेतून फोन आला. तुमची मुलगी आजारी आहे. तिला घेऊन जा. सकाळी ठणठणीत होती. पण शाळेत अचानक उलट्या ताप अशी लक्षणे सुरू झाली. मुलीला घेऊन घरी आलो, घरचे औषधपाणी करून पाहिले. पण ताप उतरेना म्हणून संध्याकाळी डॉक्टरकडे नेले. त्यांनी सांगितले गॅस्ट्रो झाला आहे. म्हणे साथच आली आहे. आता गोळ्या घ्या आणि चार पाच दिवस पूर्ण आराम करा.
सहज सर्फिंगमध्ये टीव्हीवर 'मिनीमलिझम' ही नेटफ्लीक्समध्ये तयार झालेली डॉक्युमेंटरी दिसली.
त्यांच्या देशात ज्याप्रकारे चंगळवाद आणि ग्राहकतावाद वाढून आज पुन्हा मिनिमलीझम अर्थात 'तेवढ्यापुरते' ही लाट आली आहे त्या लाटेमध्ये मला भारत हा त्यांच्या पोळलेल्या तोंडाच्या उंबरठ्यावर दिसतो.
म्हणून ही डॉक्युमेंटरी पाहण्यास मी चालू केली आणि मध्ये मध्ये जेव्हा वाटेल तेव्हा त्याविषयीचे माझे विचार व्यक्त नोंदवत गेलो.
डॉक्युमेंटरी पाहत असताना मनात व्यक्त केलेल्या विचारांची मालिका म्हणजे हा लेख.
आजच्या वर्तमानपत्रात दोन बातम्या वाचल्या, पहिली उत्तर प्रदेशमधल्या गाझीपुरातील : प्रेयसीला भेटायला विरोध करतात म्हणून एका 15 वर्षीय मुलाने, दारूच्या नशेत आपल्या आई, वडील आणि मोठ्या भावाचा ते झोपले असताना खुरपीने गळा चिरून खून केला. तद्नंतर खुरपी शेतात फेकून देऊन जवळच सुरू असलेला ऑर्केस्ट्रा पाहायला गेला, आणि तेथून परत आल्यानंतर रडारड, आरडाओरड असा गोंधळ घालून गर्दी जमवून नाटक केले. धक्कादायक…
स्मरणिकेचा अंतिम ड्राफ्ट हातात पडला आणि अनेक भावना, आठवणी उचंबळून आल्या. सुरेख रुपडं, सर्वसमावेशकता, उत्तम साहित्य ह्या सगळ्याचा एक सुंदर कोलाज बघतोय ही भावना प्राबल्याने मनात आली.
साधारण दीड वर्षांपूर्वी, २०२२ च्या डिसेंबर मध्ये टीमने कामाला सुरुवात केली. त्यात वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत असणारे, सर्व वयोगटातील सभासद होते. एक दोघांचा अपवाद सोडला तर BMM साठी काम करण्याचा त्यांचा हा पहिलाच अनुभव होता. आपापल्या क्षेत्रातील अनुभवाच गाठोडं बाजूला ठेवून अगदी लहान मुलाच्या उत्साहाने सगळयांनी शिकायची तयारी दाखवली.
मृत्यू... एक अटळ सत्य. कुणाच्याही काळजात आपल्या नुसत्या चाहुलीनं कापरं भरवणारा अज्ञात जगतातला गंभीर काळाशार डोह. आजपर्यंत नजाणो कित्येक लोक या अज्ञाताच्या डोहात बुडून गेलेत. कोणी तडफडून, टाचा घासून, अंगाची लाही लाही करून घेत, कुणी रोग-व्याधींच्या हजारो यातनांनी जीर्ण झालेली शरीराची लक्तरं नाईलाजाने वागवत- दीर्घकाळ सडत राहून, तर कुणी भीषण अपघाताने आपल्याच शरीराच्या उडालेल्या ठिकऱ्या स्वतःच्या डोळ्यांनी बघत. कुणी शांत, निर्विकार निधड्या छातीने, तर कुणी काळीज विदर्ण करणाऱ्या भयासोबत.