मायबोलीवरचे आयडीज

Submitted by प्रथम म्हात्रे on 1 August, 2024 - 11:23

मायबोलीवर बरेच जण आपली ओळख लपवून कमेंट्स करतात, लिखाण करतात. आपली ओळख लपवण्याचे तार्किक कारण काय आहे?

माफ करा, कोणाला दुखवायचा हेतू नाही आहे, प्रामाणिक शंका आहे.

Group content visibility: 
Use group defaults

अक्षरशः अनेक कारणे असू शकतात.
एखाद्याचा बॉस मोदीभक्त असेल व तो भाजप विरोधी लिहित असेल. ( किंवा उलटही)
एखाद्या महिलेला आपले खरे नाव लिहिले तर फेबूवर लोक स्टॉक करतील अशी भिती असू शकेल.
आपली अगदी खाजगी समस्या इथे व्यक्त करताना आपले खरे नाव लिहू नये असेही एखाद्याला वाटत असेल.
सासरी जाच असलेल्या एका महिलेला इथे हक्काने मोकळे व्हावेसे वाटत असेल.

मी मायबोलीवर आलो तेव्हा विवाहीत होतो. मला बॅचलर म्हणून लिखाण करायचे होते म्हणून हा आयडी घेतला.

अर्थात ओळख लपवणे लिखाण करण्यापुरते होते. त्या काळात कोणाशी कधी वैयक्तिक गप्पा मारायला गेलो नाही. कधी मायबोली गप्पांचा धागा सुद्धा उघडला नाही. जे जे स्वताहून ओळख वाढवायला आले त्यांना खरी ओळख दिली.

मायबोलीवर मोजून चार पाच आयडी आहेत पण त्या आधी ऑर्कुट कम्युनिटी वर माझे 80+ आयडी होते. ज्या मागे वेगवेगळी कारणे होती. सारेच लिहीत बसलो तर स्वतंत्र लेखमाला होईल. त्यापेक्षा इथे नवीन होतकरू डुआयडीनी लिहिले तर वाचायला आवडेल.

ओळख लपवून म्हणजे काय? टोपण नाव घेऊन लेखन असे म्हणायचे आहे का? समजा मी माझे नाव मारुती माने असे लिहून लेखन केले तर ते नाव खरे कशावरून?

खर्‍या नावाने लिहिणारे तसे बरेच आहेत. पण पारदर्शी माहिती ठेवणारे फार थोडे. स्त्री की पुरुष,वय,रहिवास,व्यवसाय नोकरी इत्यादी व्यावहारिक माहिती. काही लोक देतात काही नाही.पारदर्शक नसण्याची अनेक कारणे असू शकतात. सुरक्षितता, खाजगीपणा, विक्षिप्तपणा, खोड्याळपणा,तटस्थपणा काहीही असू शकतात. व्यवस्थापनही या माहितीचा आग्रह धरत नाही. त्यामुळे इथे व्यक्ती ही आयडी असते.अगदी डूआयडी असली तरीही. इथे आपण डूआयडी विचारात घेतल नाहीये. ती पण शेवटी आयडीच. तो पुन्हा भन्नाट विषय आहे. काही लोक आपल्या व्यक्तिमत्वाशी सूचक अशी आयडी धारण करतात. प्रतिष्ठा, प्रतिमा या मोकळेपणात आड येत असल्याने त्यांना पुराणातल्या किंदम ऋषी सारखे मृगरुप घेउन कामक्रीडा करावी लागते.

मायबोलीवर असा धागा काढायलाही बंदी नाही आणि ओळख लपवायला किंवा जाहीर करायलाही बंदी नाही.
अशा धाग्यावर व्यक्त व्हायंच किंवा नाही, किंवा टोपण नाव घेतले म्हणून विचारांना फाट्यावर मारायचे कि नाही याचा निर्णय विवेकाने घेतला जात असेल तर त्यावरही बंदी नाही.

टोपण नावे घेण्याची असंख्य कारणे आपल्या आकलनापलिकडे असू शकतात आणि त्यातली कित्येक जेन्युईन असू शकतात.
एखाद्या व्यावसायिकाने आपली ओळख जाहीर ठेवून सामाजिक, राजकीय मते मांडली तर त्याचे ग्राहक नाराज होऊ शकतात. तसेच ज्यांना संरक्षण नाही अशांनी अन्यायाविरूद्ध दाद मागितल्यास घरात घुसून मारहाण होऊ शकते. अशा मारहाणीचे व्हिडीओज अभिमानाने सोशल मीडीयात टाकले जातात आणि त्यावर कुठलीही कारवाई होत नाही.

काही कंपन्या / संस्थांमधे सोशल मीडीयात कर्मचार्‍यांनी मते मांडायला बंदी असते. तसेच मालक-संस्था यांच्या धोरणाविरूद्ध टीका करणे हा शिस्तभंगाचा प्रकार समजला जातो. तर काही संस्था उघडपणे -गुप्तपणे विशिष्ट व्यक्ती /आंदोलने / संस्था यांना पाठिंबा देतात. अण्णांच्या आंदोलनात अनेक आयटी कंपन्या समर्थनार्थ होत्या. लॅपटॉपधारी सैनिक चौकाचौकात होते.

सरकारी - निमसरकारी - पब्लीक सेक्टर मधल्या कर्मचार्‍यांचे नियम जास्त कडक असतात.
देशासाठी काम करणार्‍या संस्था, खेळाडू यांच्यावरही बंधने असतात. तसे करार असतात.

पक्षात काम करणार्‍यांना उघडपणे पक्षातल्या चुकीच्या धोरणांना विरोध करता येत नाही.
लोकशाही फक्त नावाला असते हे ज्यांना माहिती नाही त्यांना हा भूमिका का घेत नाही, तो का बोलत नाही असे प्रश्न पडतात. मग ओळख लपवून यातले कुणी व्यक्त होत असतील तर त्या विरोधातही नावानिशी का व्यक्त होत नाही अशाही मोहिमा अधून मधून चालत असतात.

ट्रोलिंग / बुलिंग याचा विचार या पोस्ट मधे केलेला नाही. हा निषिद्ध प्रकार आहे. काही वेळेला ट्रोलिंग / बुलिंग ला उत्तर म्हणूनही ड्युआयडी घेतले जातात. मग हे न संपणारे चक्र सुरू होते. प्रत्येकाला आपल्या विचाराचे ट्रोलिंग - बुलिंग क्षम्य वाटते. इतरांचे आक्षेपार्ह वाटते.

खासगी कंपन्यांमध्ये मुलाखत होण्याआधी किंवा झाल्यानंतर उमेदवाराची फेसबुक वॉल तपासण्याची पद्धत तर केव्हापासूनच आहे व त्यावर निर्णय होण्याचे प्रमाणही कदाचित अवलंबून असेल.

मी ज्या कंपन्यात काम केले आहे त्याच्या नियम व शर्तीनुसार लिहिले आहे. फेसबुक आता आले. याहू, रेडिफ, ऑर्कुट पासून सर्क्युलर फिरत असत.

>>> मी ज्या कंपन्यात काम केले आहे त्याच्या नियम व शर्तीनुसार लिहिले आहे. फेसबुक आता आले.

नाही नाही, मी तुमच्या प्रतिसादाबद्दल नाही लिहिले. धाग्याला उद्देशून लिहिले. तुमचा प्रतिसाद आत्ता नीट वाचला.

खासगी कंपन्यांमध्ये मुलाखत होण्याआधी किंवा झाल्यानंतर उमेदवाराची फेसबुक वॉल तपासण्याची पद्धत तर केव्हापासूनच आहे व त्यावर निर्णय होण्याचे प्रमाणही कदाचित अवलंबून असेल.

>> प्रोफाईल लॉक असेल तर???

आम्ही नाही फेसबूक इंस्टा वॉल किंवा सोशल मीडिया चेक करत.
तिथून फार काही कळत नाही. कळते ते सत्य असेलच असे नसते.

इंटरव्ह्यूला बोलावत नसतील >> Lol

तुमच्या प्रतिसादाबद्दल नाही लिहिले >> ठीक आहे हो.
तुमचे सुद्धा बरोबरच आहे. हल्ली फेसबुक वगैरे अकाउंट्स चेक करून पोरगा गझला तर करत नाही ना हे चेक करत असतील Wink

फेसबुक प्रोफाइल नसेलच तर?
हाय रे इस्को सोशल life हैच नय.
आणि insta private असेल तर? किंवा तेही नसेल तर?
आता snapchat म्हणू नका...

माझ्या माहितीनुसार इथे स्पृहा जोशी आणि मुक्ता बर्वेचे आयडी आहेत, अर्थातच त्या खऱ्या नावाने इथे लिहू शकत नाहीत.

अनेक साहित्यिक पुर्वी टोपणनावाने लिहायचे पण त्यांची खरी नावे उघड असायची. काही लोक नंतर उघड करायचे. उदा. ग्रेस,केशवसुत, केशवकुमार, कुसुमाग्रज.

नवीन लिखाण नवीन आयडी असेल तर वाचक देखील मनाची पाटी कोरी ठेवून वाचतात. त्यातून लिखाणावर प्रामाणिक अभिप्राय मिळतात.

माझ्या माहितीनुसार इथे स्पृहा जोशी आणि मुक्ता बर्वेचे आयडी आहेत>>> +१११ मागे एका कार्यक्रमात दोघींना मायबोलीवरचा कुठला आयडी आवडतो असं विचारण्यात आलं होतं तेव्हा दोघी आम्हाला बोकलत आयडी आवडतो असं म्हणाल्या होत्या.

>>> बेफिकीर, तुमच्याकडे बोकलत टाईम्स येतो का ?

तुम्हाला 'बोकलत' हे क्रियापद वाटत आहे का? 'कोकलत' सारखे? तो आय डी आहे एक!

(कृपया कोणीच मला मुद्दाम अवांतर लिहायला लावू नये ही विनंती! ते मी स्वखुशीने करत असतो)