लेखन

मेघ...

Submitted by अनिकेत बालाजी येमेकर on 19 March, 2025 - 01:52

मेघ दाटले नभात सारे
हलके हलके वाही वारे
सळसळत्या त्या उन्हाळ्याने
पळ काढला आज कसा रे

थेंब बरसले भूमी वरती
रिमझिम रिमझिम नाद ते करती
कडकडाट तो नभी गुंजला
पावसाला आली भरती

झरझर झरझर झरती धारा
वेग घेऊनी आला वारा
चिंब भिजविले झाडे वेली
धुंद झाला सारा नजारा

जिकडे तिकडे गंध पसरला
मातीचा सुगंध पसरला
तरसत होती धरणी ज्याला
आज तिचा तो विरह सरला

शब्दखुणा: 

तिचं प्रेम (मी)

Submitted by Vishal Madhav Vaidya on 17 March, 2025 - 20:44

वाटलं नव्हतं की असही काही होईल,
वाटलं नव्हतं की मलाही प्रेम होईल..
1st yr मध्ये त्याला साधं बोलले पण नाही,
नव्हतं माहित की त्याच्या मनात आहे अस काही...
तो अचानक जवळ आला चाहूल न करता,
जेव्हा 1st yr लागले आमचे सरता...
प्रेम अचानक होत नसतं हे तेव्हा कळले .
जेव्हा मी त्याच्या प्रेमळ मनाकडे वळले..
तो सर्वांसाठी म्हणून मदतीचा हाथ देयचा ,
नकळत माझ्यासाठीच सर्व खास करायचा...
माझं सर्व काही एक तोच ऐकायचा,
मला राणी, लाडूबाई,चिमणी, सोनी म्हणायचा...
आवडायच मला त्याचं लाडूबाई म्हणणं,
आणि प्रेमात मला अशी गोड नावं देणं...

शब्दखुणा: 

स्वप्न माझं

Submitted by Vishal Madhav Vaidya on 17 March, 2025 - 20:26

स्वप्न माझं स्वप्नच राहिलं !
उठलो जसा पहाटे, तसं मी त्याला तुटतांना पाहिलं...
स्वप्न माझं स्वप्नच राहिलं !
घरच्या पुढे मी त्याला विखरतांना पाहिलं...
स्वप्न माझं स्वप्नच राहिलं !
समाजापुढे मी त्याला रडतांना पहिलं...
स्वप्न माझं स्वप्नच राहिलं !
जाती धर्माने मी त्याला तुडवतांना...
स्वप्न माझं स्वप्नच राहिलं !
धोलकीच्या तालावर मी त्याला डोलतांना पाहिलं...
स्वप्न माझं स्वप्नच राहिलं !
मी स्वतः त्याला जळतांना पाहिलं...
स्वप्न माझं स्वप्नच राहिलं !

शब्दखुणा: 

माझीच फक्त होशील का ?

Submitted by Vishal Madhav Vaidya on 15 March, 2025 - 21:42

या जन्मी नाही झालीस माझी,
पुढल्या जन्मी होशील का ?
नाही मिळालं प्रेम तुझं,
पुढल्या जन्मी देशील का ?
ऋण आहे खूप तुझें माझ्यावर,
फेडायला मला मिळतील का ?
या जन्मी नाही मिळाला हक्क तुझ्यावर,
पुढल्या जन्मी तो देशील का ?
चूक माझी सुधारायला,
मौका मला देशील का ?
मिठीत तुझ्या मिठीत मला,
कधी तरी गं घेशील का ?
श्वास माझा श्वासात तुझ्या,
सहवासात मला घेशील का?
कधी तरी गं दूर तू ,
भेटायला मला येशील का ?
पुढल्या जन्मी नक्की तू,
माझीच फक्त होशील का ?
पुढल्या जन्मी नक्की तू,

विषय: 

काय भुललासी वरलीया रंगा

Submitted by शिल्पा गडमडे on 14 March, 2025 - 21:37

॥१॥
देखणे ते चेहरे जे प्रांजळाचे आरसे
गोरटे वा सावळे या मोल नाही फारसे

तिच्या सवयीचे रेल्वेस्थानक.. सवयीची गर्दी.. आणि रेल्वेची वाट पाहाणारे लोकं देखील रोजचीच..
रेल्वेला यायला वेळ असल्यामुळे तिने वेळ मारण्यासाठी गर्दीकडे सभोवार नजर फिरवली, तेव्हा तिला दिसला तो चेहरा.. आणि तिला दचकायला झालं. वेगवेगळे ठिगळं जोडून जसं एखादं कापड शिवलेलं असतं तसा शिवल्यासारखा होता त्याचा चेहरा.. त्याच्या चेहऱ्याकडे पाहून तिला क्षणभर भीतीच वाटली.. तिने पटकन नजर दुसरीकडे वळवली..

त्यालाही हे जाणवले बहुतेक..

विषय: 
शब्दखुणा: 

मनाचे कवाड

Submitted by गंधकुटी on 14 March, 2025 - 10:19

मनात कधी कधी भिरभिरतात
नकोशा आठवणींच्या पाकोळ्या
दाटतो निराशेचा अंधार, त्याला
औदासीन्याच्या झिरमिळ्या

पसरते असुयेची धूळ अन
साठतात दुःखाची जळमटे
अपमानाची भावना, तिला
रागाची आणि द्वेषाची पुटे

अशा वेळी प्रयत्नपूर्वक
मनाची कवाडे तू उघड
घेरून येणाऱ्या अंधाराला
सर्व शक्तिनिशी भीड.

त्या कवाडातून येऊ देत
झळाळणारा सूर्यप्रकाश
फाकेलं बघ लक्ख प्रभा
घेऊन आशा आणि उल्हास

त्या कवाडातून येईल मग
सळसळणारा रानवारा
राग, असूया, अन द्वेषाला
नसेल मग कधीच थारा

सागरी किनारा

Submitted by अनंत s on 14 March, 2025 - 05:23

नयन रूपी सागरात तुझ्या मी अथांग बुडालो.
काल होतो माझा आज तुझाच जाहलो...

पडता सोन्याची किरणे उजळला आसमंत सारा.
ओल्या मिठीत तुझ्या आला अंगावरी शहारा..

रेतीत तुझ्या पावलांचे उमटले आज ठसे.
प्रेमात पडली लाट म्हणाली मिटवू मी कसे..

जमले ढग आकाशी आणि सुटला सुसाट वारा.
आपल्या प्रेमाची साक्ष देतो हा रेशमी किनारा...

चल भिजू दे आज आणि होऊ दे ओले चिंब.
नितळ पाण्यात बघूया दोघांचे प्रतिबिंब...

अनंत

विषय: 
प्रांत/गाव: 
शब्दखुणा: 

ऋणानुबंध

Submitted by अनंत s on 14 March, 2025 - 05:13

सुंदर ते ध्यान उभे सामोरी
गालातच हसते नजर माझ्यावरी

नाकात नथ कानात बाळी
हसता गालात पडली गालावर खळी

हातात कंगन पायात पैंजण
मोहक रूप बघता वाढले हृदयाचे स्पंदन

मोकळ्या केसांतून आली गालावर एक छटा
तिला कानामागे घेण्याचा कितीही आटापिटा

वाऱ्याची झुळूक येता दरवळला सुगंध
विसरलो मी स्वतःला आणि झालो तुझ्यात दंग

शब्दखुणा: 

Pages

Subscribe to RSS - लेखन