लेखन

रखमा आजी.. एक अज्ञात जग...

Submitted by रुद्रदमन on 12 September, 2024 - 06:07

रखमा आजी.. एक अज्ञात जग...

मी जेव्हा अकरावी बारावी साठी KTHM नाशिक येथे होतो.. तेव्हा माझा एक रूम पार्टनर होता... ही घटना त्याने मला सांगितली होती.. गुरुनाथ पाटील त्याचे वडील.. त्यांच्या बाबतीत घडलेला हा किस्सा.. आता हा किती खरा आणि किती खोटा हा त्यांनाच माहीत..

विषय: 

अंत: अस्ति प्रारंभ: - 3 - {संयम} - {SharmilaR }

Submitted by SharmilaR on 12 September, 2024 - 01:57

अंत: अस्ति प्रारंभ: - 3 - {संयम} - {SharmilaR }

मुळात ती शांत प्रवृत्तीची!

लेकरांना अंगा खांद्यावर खेळवणारी ती. तिच्याजवळ चार घटका निवांत बसलेल्या जीवांना शांतवणारी ती. माहेरवाशीणीचं गुपित ऐकणारी अन् लेकुरवाळीची आसवं स्वत:त रिचवणारी ती.. कुशीत आलेल्याचं तन-मन निर्मळ करणारी ती..

पण.. पण.. ज्यांना तिने आंघोळी घातल्या, त्यांनीच तिला मलिन केलं. ज्यांचा ती विसावा होती, त्याच लोकांनी तिला गृहीत धरलं.. आक्रसून तिने जगायचं कसं..? जायचं तरी कुठे?

अंत: अस्ति प्रारंभ: - ३ - {व्यथा..} - {अतरंगी}"

Submitted by अतरंगी on 12 September, 2024 - 00:56

आजचा दिवसच सुंदर होता, सगळं अगदी त्याच्या मनाप्रमाणे होत होतं. सुंदर रिमझिम पाऊस, सकाळी केलेल्या पातळ भाकर्‍या, त्यासोबत पिठलं, सोबत मस्त फोडलेला कांदा, दिवसभर बागकाम, संध्याकाळी छान मऊ लुसलुशीत पोळ्या आणि कढी.... आहा स्वर्गसुख!

नेहमीप्रमाणे तो अगदी मन लावून जेवला, ताट बेसिन मधे ठेवतानाच त्याची तंद्री भंग झाली....

हात धुवायला घेतलेलं पाणी तिच्या तोंडावर फेकून तो वस्स्कन ओरडला...

" अग बंद कर की टकळी तुझी... किती कटकट करते. होईल कि सगळं नीट.
माझं डोकं खाण्यासाठी जन्म आहे का बयो? संयम असावा जरा!"

विषय: 

चकवा ~ मध्यरात्रीचा थरारक अनुभव भाग~४

Submitted by रुद्रदमन on 11 September, 2024 - 15:41

सिद्धार्थ शांतपणे माझ्या बाजूला बसले होते.आज शुभ्र सफेद सदरा आणि पायजमा त्यांना शोभून दिसत होता.. त्यांचे डोळे बंद होते.. त्यांच्या शांत आणि स्थिर मनोवृत्तीने माझ्या मनातील चलबिचल कमी झाली होती. ते मनोभावे प्रार्थना करत होते, आणि त्यांच्या त्या साधनेच्या शक्तीचा प्रभाव मला जाणवत होता. त्यांचा विश्वास आणि साधनेचे बल मला उर्जा देत होते....
सर्व विवंचना सिद्धार्थ वर सोडून, मी बाहेर निसर्गाचा आनंद लुटत ड्रायव्हिंग वर लक्ष केंद्रित केले..

विषय: 

अंत: अस्ति प्रारंभ: - १- दुर्बीण - अतरंगी

Submitted by अतरंगी on 11 September, 2024 - 11:57

नेहमीप्रमाणे तो गावातल्या मुलांसोबत म्हशी चरायला डोंगरावर घेऊन गेला होता. म्हशी चरायला सोडून तो असाच काही दिवसांपुर्वी डोंगराच्या वाटेवर सापडलेल्या दुर्बिणीशी खेळत त्यातून काय काय दिसतंय बघत होता. आजकाल त्याचा तो छंदच झाला होता.

दुर्बिणीमुळं लांबवरच्या गोष्टी पण कशा स्वतःच्या पुढ्यात असल्यासारख्या दिसायच्या…..

दुर्बिणीतून बघताना त्याला डोंगरावर अचानक काहीतरी हालल्यासारखं वाटलं. त्यानं दुर्बीण अजून झूम करून पाहिल्यावर त्याचे डोळेच विस्फारले. त्याने झटकन दुर्बीण दुसरीकडे वळवली. 

विषय: 

शशक लेखन स्पर्धा- अंत: अस्ति प्रारंभ: ३: संयम

Submitted by संयोजक on 11 September, 2024 - 02:11

नमस्कार मायबोलीकर,

दरवर्षीप्रमाणे यावर्षीही गणेशोत्सवात शशक पूर्ण करा हा आवडता उपक्रम आहेच पण यावर्षी त्यात एक ट्विस्ट आहे.

अंतापासूनच एक नवी सुरुवात होतेच ना! तर यावर्षी एका गोष्टीचा शेवट आम्ही देणार आहोत आणि तुम्हाला त्या कथेचा पूर्वार्ध तुमच्या कल्पनाशक्तीने पूर्ण करायचा आहे, आणि तुमच्या कथेला साजेसे शीर्षक द्यायचे आहे. यावर्षी शशक हा उपक्रम नसून स्पर्धा आहे.

कथेचा शेवट खालीलप्रमाणे आहे.

"खाण्यासाठी जन्म आहे का बयो? संयम असावा जरा !"

स्पर्धेत सहभागी होण्यासाठी पुढील गोष्टी लक्षात घ्या :

विषय: 

"माझे स्थित्यंतर- अतरंगी"

Submitted by अतरंगी on 10 September, 2024 - 17:48

स्थित्यंतर !

मोठा शब्द आहे. स्थित्यंतर, परिवर्तन सगळेच मोठे जडजड शब्द. कधी कुठला वापरायचा, त्याचे नेमके अर्थ काय, त्या शब्दांच्या छटा कोणत्या? नेमका तो शब्द कोणत्या अर्थाने कुठे वापरायचा? देव जाणे.

असो.

तर गेल्या काही वर्षात स्थित्यंतर म्हणता येईल की नाही माहीत नाही, पण माझ्यात अनेक बदल मात्र नक्की झाले. काही वरवर दिसणारे काही फक्त माझे मलाच जाणवणारे.

विषय: 
शब्दखुणा: 

अंत: अस्ति प्रारंभ: - २ - शब्द - {अतरंगी}

Submitted by अतरंगी on 10 September, 2024 - 11:12

ते कायम आतुरतेने पावसाळ्याची वाट पहायचे. पावसाळ्यात त्यांना त्यांच्या आयुष्याचं सार्थक झाल्यासारखं वाटायचं. त्या धुंद वातावरणात सगळीकडे त्यांच्या पाऊलखुणा असायच्या. त्यांच्या रुपारुपात एक वेगळीच खुमारी असायची. लहानमोठा, गरीब श्रीमंत प्रत्येकजण त्यांचा अगदी सढळ हाताने वापर करायचा….. त्यांच्या प्रेमात ते न्हाऊन निघायचे.

पावसाळ्यात त्यांना भलतंच डिमांड असायचं.

पण या पावसाळ्यात त्यांचं सगळं आयुष्यच बदलून गेलं…..

त्यांच्यातलेच दोन जण आज एकमेकांकडे आपलं मन मोकळं करत होते.

“आयचा घो. या संयोजकांच्या तर xx xxxxxx xxxx”

“जुनी कढई, नवीन उपमा म्हणे”

विषय: 
शब्दखुणा: 

अंत: अस्ति प्रारंभ: - 2 - {कोरडे} - {SharmilaR }

Submitted by SharmilaR on 10 September, 2024 - 02:04

अंत: अस्ति प्रारंभ: - 2 - {कोरडे} - {SharmilaR }

कॉलेज पासूनच्या त्यांच्या मैत्रीतच त्यांना उमगलं होतं, आपल्या दोघांचीही लेखनाची आवड आहे. दोघांनीही आधी इथे तिथे थोडं फार लिहिलं होतं, पण अजून चाचपडणं चालूच होतं.

नशिबाने पुढे कामाचं ठिकाणही एकच होतं. मग दोघांनाही वाटलं आपण मिळूनच काही लिहून बघूया का? आणि मग जन्माला आलं, ते नव्या पिढीच्या भाषेतलं, तरुणाईला रुचेल असं पुस्तक. सुदैवाने ते प्रकाशितही झालं.

अंत: अस्ति प्रारंभ: - १ - वेडा - रूपाली विशे - पाटील

Submitted by रूपाली विशे - पाटील on 10 September, 2024 - 00:41

वेडा ....!

व्याकूळ नजरेने , रापलेल्या चेहऱ्याने वेडा दाही दिशांना शोधत होता ..

वेड्याचं काहीतरी हरवलं होतं ... जिवापाड जपलेलं ..!

कुठे हरवलं असेल .. ..??

कालपासून दोघांच्याही पोटात अन्नपाणी नाही ..

यावर्षी पडलेला रखरखाटी दुष्काळ .. नांदोबा कोपला म्हणे ...!

अन्नाच्या शोधात कुठे भरकटलं तर नसेल ..?

वेडं बिच्चारं ...!

चारही दिशेने उधळलेला गुलाल , नगाऱ्याचा दणदणाट , उन्हात तळपणारी धारदार चाकूची पात , शेंदूर फासलेला नांदोबा , उन्मादित जमाव ____

आणि

समोर असलेलं केविलवाणं कोकरू ...!

विषय: 

Pages

Subscribe to RSS - लेखन