अंत: अस्ति प्रारंभ: - २ - शब्द - {अतरंगी}

Submitted by अतरंगी on 10 September, 2024 - 11:12

ते कायम आतुरतेने पावसाळ्याची वाट पहायचे. पावसाळ्यात त्यांना त्यांच्या आयुष्याचं सार्थक झाल्यासारखं वाटायचं. त्या धुंद वातावरणात सगळीकडे त्यांच्या पाऊलखुणा असायच्या. त्यांच्या रुपारुपात एक वेगळीच खुमारी असायची. लहानमोठा, गरीब श्रीमंत प्रत्येकजण त्यांचा अगदी सढळ हाताने वापर करायचा….. त्यांच्या प्रेमात ते न्हाऊन निघायचे.

पावसाळ्यात त्यांना भलतंच डिमांड असायचं.

पण या पावसाळ्यात त्यांचं सगळं आयुष्यच बदलून गेलं…..

त्यांच्यातलेच दोन जण आज एकमेकांकडे आपलं मन मोकळं करत होते.

“आयचा घो. या संयोजकांच्या तर xx xxxxxx xxxx”

“जुनी कढई, नवीन उपमा म्हणे”

“ तुमच्या उपक्रमांपायी आमचं डिमांड का कमी करताय?”

यावेळेस कोणत्याच कवितेत न वापरले गेलेले ते दोघे मुसळधार पावसात होते, पण कोरडेच!

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अर्रर्र Lol
धरतीचा हिरवागार शालू आणि आलं घातलेला वाफाळता चहा crying in the corner

फुटलो Lol Lol

एकच नंबर रे!!

'ओल्या मातीचा सुवास' आणि 'अत्तराची कुपी' असावेत ते दोघे बहुदा Wink