अंत: अस्ति प्रारंभ: - १ - वेडा - रूपाली विशे - पाटील

Submitted by रूपाली विशे - पाटील on 10 September, 2024 - 00:41

वेडा ....!

व्याकूळ नजरेने , रापलेल्या चेहऱ्याने वेडा दाही दिशांना शोधत होता ..

वेड्याचं काहीतरी हरवलं होतं ... जिवापाड जपलेलं ..!

कुठे हरवलं असेल .. ..??

कालपासून दोघांच्याही पोटात अन्नपाणी नाही ..

यावर्षी पडलेला रखरखाटी दुष्काळ .. नांदोबा कोपला म्हणे ...!

अन्नाच्या शोधात कुठे भरकटलं तर नसेल ..?

वेडं बिच्चारं ...!

चारही दिशेने उधळलेला गुलाल , नगाऱ्याचा दणदणाट , उन्हात तळपणारी धारदार चाकूची पात , शेंदूर फासलेला नांदोबा , उन्मादित जमाव ____

आणि

समोर असलेलं केविलवाणं कोकरू ...!

त्याच्या अंगाचा थरकाप उडाला .

" मला वेडा म्हणतात , सैतानांनो , टाळकी तर तुमची नासकी आहेत .. शेंदूर फासलेल्या निर्जीव दगडाला माझ्या मुक्या , निष्पाप कोकराचं रक्त लावणार तुम्ही ...?? हरामखोरांनो, सोडणार नाही तुम्हांला ... ...!

त्याने पत्थर उचलला ..

अन्

उंच डोंगरावरचे ते दृष्य पाहून त्याने रस्त्याकडे धाव घेतली.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान जमलीय कथा
शैली नेहमीप्रमाणे उत्तमच

छान!
उधळलेला गुलाल वाचलं आणि पाल चुकचुकली.

किल्ली , आचार्य , सामो , दत्तात्रेयजी , मोक्षू , झकासराव , लावण्या खूप धन्यवाद तुम्हांला ..!

अमितव , ऋतुराज , शर्मिलाजी , अनु , मनीमोहोर ताई , ऋन्मेष , कविन तुमचेही खूप अभिनंदन ..!

प्रिय मायबोलीकर वाचकांनी त्यांचे अमूल्य मत माझ्या कथेच्या पारड्यात टाकले आणि कथेस तृतीय क्रमांक मिळवून दिला त्याबद्दल त्यांचे विशेष आभार ... लोभ असाच असू द्या ..!