सोशल मीडियावर ट्रोलिंग हा विषय गेल्या काही दिवसांत आणि काही वर्षांत खूपच चर्चेचा बनला आहे. कोणत्याही लेखकासाठी किंवा सर्जनशील व्यक्तीसाठी सोशल मीडिया एक महत्त्वपूर्ण प्लॅटफॉर्म ठरतो, कारण त्यावरून तो लोकांशी जोडला जातो, त्याच्या कामाची दखल घेतली जाते आणि प्रतिक्रियाही मिळतात. मात्र, या प्लॅटफॉर्मसोबत ट्रोलिंगचं विळखा घेणारं स्वरूपही येतं, जे अनेक वेळा व्यक्तीला मानसिक तणावात टाकतं.
आजकाल मायबोलीकर वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करतात, काही सहजगत्या तर काही गंभीरपणे विचार करण्यास लावणाऱ्या. असाच एक धागा ( मराठी चित्रपट) वाचताना लक्षात आलं की काही महिला काही मराठी पुरुष अभिनेत्याच्या सिनेमातील शॉवर सीनबद्दल चर्चा करत होत्या, आणि त्याबद्दल अधिक पाहण्याची इच्छा व्यक्त करत होत्या. त्याच धाग्यावर पुढे एका पुरुषानेही अशा प्रकारच्या दृश्यांबद्दल टिप्पणी केली होती- की हा अमुक अमुक चित्रपट मधे अजून एक सिन आहे त्या अभिनेत्याच्या अंघोळीचा… मनात सहज प्रश्न आला—ही कामुकता (sexualization) आहे का? आणि जर आहे, तर ती फक्त महिलांबद्दल बोलली गेल्यावरच कामुकतेची व्याख्या होते का?
प्रतिभेची व्याख्या करता येत नाही.
सृजनशील व्यक्तीला 'कसं सुचतं हो तुम्हाला' हा एक प्रश्न अनेकदा विचारला जातो. जगातला बहुधा सर्वात कठीण प्रश्न असेल हा. कारण त्याला उत्तरच नाही. अनुभव हे उत्तर नाही, शिक्षण हे उत्तर नाही, सराव हे उत्तर नाही, कौशल्य हे उत्तर नाही. ही उत्तरं खरी किंवा पुरेशी असती तर 'क्रिएटिव्ह ब्लॉक'सारखा शब्दप्रयोगच अस्तित्वात आला नसता. या सार्यांनी कलाकृतीला झळाळी आणता येईल, पण सृजनाच्या रोपट्याची मुळं मात्र गीतेतल्या अश्वत्थ वृक्षासारखी कुठेतरी गगनापारच असतात.
कल्पना करा, तुम्ही कॅरिबियन समुद्राच्या रम्य किनाऱ्यावर आहात. निळाशार पाणी, गोडसर वाऱ्याची झुळूक, आणि पांढर्या वाळूत पसरलेलं स्वर्गसुख… पण या नंदनवनात एक भयंकर गुन्हा घडतो. हाच आहे ‘डेथ इन पॅराडाईस’, एक असा मर्डर मिस्टरी शो जो तुम्हाला त्याच्या प्रत्येक कोपर्यात दडलेल्या रहस्याने थक्क करतो.
सेंट मेरी – एक काल्पनिक कॅरिबियन बेट. इथं प्रत्येकजण आनंदात, मस्तीत जगत असतो… पण त्या शांततेत अचानकपणे एक खून होतो. आणि मग सुरू होतो गूढ सोडवण्याचा खेळ! ब्रिटिश डिटेक्टिव्ह इन्स्पेक्टर (DI) इथं पोहोचतो, एका अनोळखी ठिकाणी, अनोळखी संस्कृतीत. त्याचं काम एकच – गुन्हेगाराला शोधून काढणं!
ही फक्त एक series नाही, ती एक experience आहे.
जसं वॉल्टर म्हणतो, “Say my name”—जर तुम्ही हे पाहिलं नाही, तर तुम्ही खरं thrill चुकवत आहात!
माझ्या शाहरुख, आमिर, सलमान, अजय आणि अक्षय या पाच दिग्गज अभिनेत्यांवर लिहिलेल्या लेखाला प्रचंड प्रतिसाद मिळाला. परंतु त्याचबरोबर लोकांनी एकजूट आवाज उठवला की “मिथुन चक्रवर्ती यांच्यावरही लिहा!” तुमच्या या आग्रहाला मान देत आज हा लेख लिहित आहे.
मिथुन चक्रवर्ती हे केवळ एक अभिनेता नाहीत, तर ते हिंदी सिनेमाच्या इतिहासात एक अशी प्रतिकात्मक व्यक्ति आहेत ज्यांनी “कॉमन मॅन”ला हिरो बनवलं. सत्तरच्या दशकात, जिथे अमिताभ बच्चन यांचं “अँग्री यंग मॅन” प्रतिक प्रस्थापित झालं होतं, तिथे मिथुन यांनी स्वतःचं एक वेगळं स्थान निर्माण केलं.
मराठी भाषा प्रेम गीत
--
खुलणाऱ्या हास्याचे रंग मराठी
शब्दांच्या किमयेचे अंग मराठी
आंब्याच्या झाडाचा चीक मराठी
मिरचीच्या ठेच्यावर मीठ मराठी
आईच्या पदराची ऊब मराठी
बापाच्या मायेचे रूप मराठी
शाळेच्या घंटेचा नाद मराठी
मित्रांशी होणारे वाद मराठी
प्रेमाच्या चिट्ठीचा रंग मराठी
स्वप्नाळू डोळ्यांचा ढंग मराठी
रुणझुणत्या चालीचा डौल मराठी
लवलवत्या डोळ्यांचा कौल मराठी
जगण्याची चौतर्फा जाण मराठी
झटणाऱ्या हातांची खाण मराठी
दमलेल्या श्रमिकाचा घाम मराठी
उरलेल्या सगळ्यांचा राम मराठी
मागच्या मोसैक धाग्यानंतर अजून काही छोटे मोसैक बनवून झाले. काहींना ग्राउट केलं, काही अजून तसेच आहेत. इथे त्यांचे फोटो राहून गेले होते.
अगदी व्यवस्थित पूर्ण झालेल्या मोसैक पैकी हे एक.