चित्रकाराची चौकट चर्चा
Submitted by मनोज मोहिते on 25 March, 2025 - 14:03
मभागौदि २०२५ - अक्षरचित्र कु. विजयालक्ष्मी. वय ८ वर्षे
क
थ
ठ
भूतान मधील पारो येथे ज्या ठीकाणी आम्ही राहिलो होतो तिच्या खिडकीमधून देसणारा देखावा जलरंगांमध्ये रेखाटण्याचा माझा प्रयत्न.
रंगवत जा स्वप्न.
जशी चित्र रंगवतेस तशीच,
एकचित्ताने, तन्मयतेने.
सप्तरंगात.
करड्या रंगात कधी,
आभाळ झाकोळले तरी,
अंतरंगातले रंग राहू देत
उत्फुल्ल, सोनेरी.
एखाद्या दिवशी दिसेल फक्त
काळ्या- भु-या छटांचीच नक्षी
रात्रीच्या अंधारात, दिवसा ही, कदाचित.
तरीही तुझी चित्र मात्र असावीत
तुझ्या स्वप्नांसारखीच रंगीत.
स्वच्छ सोनेरी उन्हात,
चांदण्यांच्या शान्त प्रकाशात,
अनंत निळ्या आकाशात,
गर्द, पाचूच्या हिरव्या रानात.
जिवंत ठेव ही रंगीत स्वप्न
तुझ्या खोल, गहि-या डोळ्यांच्या समुद्रात.