मनोज मोहिते
कलानिर्मितीची प्रक्रिया ही तशी देखणी नसते. पण त्यात सौंदर्य असते. देखणी या अर्थाने की, कला पूर्ण रूप आकार घेते तेव्हा ती सुटीसुटी असते. तिच्याभोवती अस्ताव्यस्तपणा असतो. तिच्यात अस्ताव्यस्तपणा असतो. कलावंत अस्ताव्यस्त असतो. अस्ताव्यस्तपणा फारसा कुणाला आवडत नाही. देखणेपणा हवाहवासा असतो. पण, या अस्ताव्यस्ततेचा अर्थ ज्याला पुरेसा ठाऊक असतो, यातले सौंदर्य जो शोधतो, तो त्यात रमतो. न ठाऊक, तो कलेत रमण्यापासून वंचित राहण्याचा धोका उद्भवतो.
मनोज मोहिते
चित्रकार चित्रात मनस्वी रंगत असला तरी, चित्र काढून झाल्यावर त्याला भानावर यावे लागते. हे भान म्हणजे कलात्मक ट्रान्समधून वस्तुस्थितीत्मक भवतालात येणे. ही सद्यस्थिती त्याच्या चित्राच्या पुढच्या प्रक्रियेसाठी गरजेची असते. त्या दिवशी हे प्रकर्षाने जाणवले.
खूप दिवसानंतर ती आज माहेरी आली होती. तिच्या माहेरी रंगकाम करायला काढलं होतं त्यामुळे बरंचसं सामान माळ्यावरून खाली आलं होतं. दरवर्षी ती माहेरी आली आणि हाताशी जरा वेळ लागला ती दोन गोष्टींना आवर्जून वेळ देत असे. एक म्हणजे जुना फोटो अल्बम आणि दुसरा म्हणजे तिचा कोलाज बॉक्स. यावेळेस तर तिचा बॉक्स सामानाच्या ढिगाऱ्यात समोरच विराजमान झाला होता. तिच्या अनेक जुन्या वस्तूंपैकी तिचा बॉक्सवर विशेष जीव होता. बॉक्सवरच्या कोलाजसाठी तिने कुठूनकुठून रंगीत पुरवण्या गोळा केल्या होत्या. त्याकाळी रंगीत पुरवण्या सहजासहजी उपलब्ध नसत.
मनोज मोहिते
ओडिसी नृत्याला ‘ओडिसी नृत्य’ हे नाव फार आधी नाही, मागच्या शतकातल्या साठच्या दशकात मिळाले, अशी मध्ये माहिती वाचली आणि आश्चर्य वाटले. कथक, भरतनाट्यम् आदी शास्त्रीय नृत्यांना हजार-दोन हजार वर्षांचा इतिहास असताना ओडिसीला हे नाव या अलीकडच्या काळात असेकसे मिळाले, हे ते आश्चर्य!
हीच अमुची प्रार्थना अन् हेच अमुचे मागणे
माणसाने माणसाशी माणसासम वागणे…
बाहेर टीव्हीच्या कुठल्यातरी चॅनेलवर गाणं सुरू होतं.
एक थकलेला दिवस, तिच्या थकलेल्या खांद्यावरुन घेऊन ती निघाली.
नेहमीचाच रस्ता तिला लांब वाटत होता. डोकं जड झाल्यासारखं, पायात त्राण नसल्यासारखं वाटत होतं. मानगुटीला बसलेल्या वैतागाला घेऊन तिने प्रयत्नपूर्वक झपाझप पावलं टाकायला सुरुवात केली.
तेवढ्यात तिच्या कानावर शीळ पडली. तिने आवाजाच्या दिशेने पाहिलं तर समोर सायकलवरून एक मुलगी तिच्या दिशेने येत होती. थंडीपासून बचाव करण्यासाठी गळ्यात स्कार्फ, डोक्यावर टोपी होती. आपल्याच तालात मस्त शीळ वाजवत सायकल चालवत होती. तिच्या निळसर डोळ्यातून, चेहऱ्यावरून आनंद झळकत होता.
मनोज मोहिते
‘एलए फिल’चा वर्षभरापूर्वीचा एक व्हिडीओ आहे, त्यांच्या यूट्युब चॅनलवर. ‘द फायरबर्ड’च्या तालमीचा. हा आठ मिनिटे तीन सेकंदांचा व्हिडीओ बघणे म्हणजे ट्रीट आहे. असे अनेक व्हिडीओ इंटरनेटवर आहेत, गुस्तावोच्या तालमीचे. नेमक्या या व्हिडीओविषयी थांबलो यासाठी की, ‘एलए फिल’मध्ये गुस्तावो चीफ कण्डक्टर आहे.
मनोज मोहिते
पाणी वाहताना काय वाहून ते आणि पडणाऱ्या पावसाचे पाणी हाती काय देते? पाऊस पडतो, पाणी वाहते. पावसाचे पाणी वाहते राहते. ते अडते. अडखळतेही. पण मार्ग शोधून घेते. कोसळणाऱ्या पावसात मार्ग शोधता येत नाही. समोरचे नीट दिसत नाही. आतला गोंधळ संपत नाही. पावसाचे आणि पाण्याचे हे असे वागणे नेहमीचेच. त्याची सवय किती लावावी आणि त्याच्या नाद कसा सोडवावा.
एक्सचेंज- भाग १
काम करता करता केबिनमध्ये अंधारल्यासारखं वाटल्यामुळे ती थांबली. समोरच्या लॅपटॉपवरून नजर वळवून तिने खिडकीबाहेर बघितलं. सूर्य मावळतीला आला होता, आजूबाजूच्या उंच इमारतीच्या ऑफिसात लाईटचा उजेड, तर इमारतीच्या काचांवर मावळत्या सूर्याच्या छटा उमटल्या होत्या. क्षणभर त्या दृशात हरवून गेली.
पण क्षणभरच..
तिने नजर पुन्हा लॅपटॉपकडे वळवली, इनबॉक्समधल्या न वाचलेल्या ईमेल्स, दिवसभर मीटिंगच्या गडबडीत बाजूला पडलेली ‘टू-डू लिस्ट’ तिला एका झटक्यात वास्तवात घेऊन आले.