मांजरं म्हणजे माझा वीक पॉईंट आणि याआधी कितीही वेळा रेखाटले असले तरी प्रत्येक वेळेस मांजरांचे डोळे रेखाटणे म्हणजे एक प्रयोगच असतो. आणि आव्हानही. करड्या-पिवळ्यापासून राखाडी-निळ्या-हिरव्यांपर्यंत यांच्या इतक्या असंख्य छटा असतात की निसर्गाची कमाल वाटते.
त्यातून त्यातल्या बाहुल्या! काळी उभी सडसडीत रेघ ते एखाद्या ज्योतीसारख्या किंवा त्याच बाहुल्यांचे अंधारात गेल्यावर झालेले गोल मणी. मज्जा.
काचेसारखे चकाकणारे हे डोळे रेखाटताना पहिली काळजी घ्यावी लागते ती त्यातल्या प्रकाशबिंदूंच्या जागा लक्षात ठेवणे. त्या गेल्या की संपलंच.
Paint by color करत असतानाच अजून एक नवीन ॲप वापरून बघितलं Infinite painter.
हे बऱ्यापैकी ॲपल क्या प्रो क्रिएट सारखे आहे. त्यासाठी नवीन iPad घ्यावा लागणार त्या आधी हे वापरून बघितले.
थोड्क्या खर्चात stylus मागवला आणि फोन वरच त्याचे फ्री version वापरून बघितले. प्रीमियम किंवा पेड version मध्ये खूप जास्त टूल्स आणि मदत आहे. बघु या थोडे दिवसात तेही घेईन.
वेळ मिळेल तसे बदलत नेलेले हे एक चित्र.. तस बेसिक आहे.
कॅलिफोर्नियाचा पॅसिफिक किनारा आणि लेक टाहो ह्यांचे काहीसे फ्युजन झालंय..
आमच्याकडील मनीच्या वेगवेगळ्या पोझेस कायमच मला रेखाटन करण्यासाठी खुणावत असतात...
मागे मायबोली गणेशोत्सवाच्या निमित्ताने जेव्हा ग्लास बॉटल पेंटिंग केलं, तेव्हा लक्षात आलं की कितीही कोट लावले तरी रंग ग्लास बॉटल वर तितकासा नीट बसत नाही. मग यूट्यूब वर Gesso बद्दल समजलं.
कॅनव्हास वर केलेले पारिजात - प्राजक्त ( night blooming Jasmine) चे पेंटिंग
ps- कोणी मला छानशी कविता सुचवेल का पारिजात ची??
.
(कोणत्याच कलेचे मी व्यावसायिक परिपूर्ण शिक्षण घेतलेले नाही. अगदी क्रोशा विणकामाचेही नाही. बघून बघून प्रयोग करत शिकणे ही माझी पद्धत. चित्रकलेबद्दलही हेच. त्यामुळे जे लिहितेय ते चित्रकलेची एक सामान्य प्रेक्षक म्हणूनच असेल; तज्ज्ञ म्हणून नाही. त्यातून अनेक लेख, पुस्तके वाचत बघत आले; त्यांचा जरूर मोठा प्रभाव आहे. प्रामुख्याने या विषयावर लिहिताना काहींचा आधीच उल्लेख करणे योग्य वाटते.
दादर , माटुंगा ,प्रभादेवी परिसरात असण्याऱ्या जलरंग / वॉटरकलर वर्गांबाबत माहिती हवी आहे .
माहिरा ने दादाला तो शाळेतून आल्या आल्या सांगितले मी आम्माच्या मायबोली वर ड्रॉईंग कॉम्पीटीशनमधे भाग घेतला.. मग दादा मागे कसा राहणार.. हि तीच्या दादाची प्रवेशिका...
यावर्षीच्या मायबोली गणेशोत्सवात आमची ही प्रवेशिका..
हे अजून एक चित्र.
बनारसच्या गल्ल्यामधे ( गाई, बैल, म्हशी , शेण चुकऊन) फिरण्यात मौज आहे.