सॅन डिएगोतल्या कुठल्यातरी म्युझियममध्ये किंवा सायन्स सेंटरमध्ये क्यूबन गोगलगायींचे हे सुरेख शंख दिसले होते. झळाळता पिवळा रंग आणि त्यावर डार्क चॉकलेटी वळणे - बस्स इतक्या दोनच गोष्टी होत्या खरंतर पण फारच आकर्षक. फोटो काढल्याशिवाय पुढे जाऊच शकले नाही.
नॅशनल जिओच्या वेबसाईट वर या जगातल्या सर्वात सुंदर गोगलगायी असल्याचे वाचले (आणि त्यामुळेच त्या critically endangeredही आहेत). यांच्यात आणखी खूप रंग असतात. बघू पुन्हा कुठे प्रत्यक्षात बघता आल्यातर.
फॅबरकॅसल पॉलिक्रोमोज
प्रिज्माकलर व्हेरीथिन्स
100gsm पेपरवर
मांजरं म्हणजे माझा वीक पॉईंट आणि याआधी कितीही वेळा रेखाटले असले तरी प्रत्येक वेळेस मांजरांचे डोळे रेखाटणे म्हणजे एक प्रयोगच असतो. आणि आव्हानही. करड्या-पिवळ्यापासून राखाडी-निळ्या-हिरव्यांपर्यंत यांच्या इतक्या असंख्य छटा असतात की निसर्गाची कमाल वाटते.
त्यातून त्यातल्या बाहुल्या! काळी उभी सडसडीत रेघ ते एखाद्या ज्योतीसारख्या किंवा त्याच बाहुल्यांचे अंधारात गेल्यावर झालेले गोल मणी. मज्जा.
काचेसारखे चकाकणारे हे डोळे रेखाटताना पहिली काळजी घ्यावी लागते ती त्यातल्या प्रकाशबिंदूंच्या जागा लक्षात ठेवणे. त्या गेल्या की संपलंच.

माध्यमः फॅबर कॅसल कलर्ड पेन्सिल्स
normal drawing paper.
२०१४चे अखेरचे चित्र. पाइन कोन्स.
सर्व मायबोलीकरांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा!


मोनार्क जातीचे फुलपाखरु
कलर्ड पेन्सिल्स आणि सॉफ्ट पेस्टल्स.

नमस्कार लोकहो, आज बर्याच दिवसांनी पक्षी रेखाटले त्यांचं हे चित्र.
हे गोजिरवाणे पक्षी मी हवाईला पाहिले होते. चिमणीच्या आकाराएवढ्या या पक्ष्यांना जावा फिंच किंवा जावा स्पॅरोज म्हणतात.
8" x 6" Prismacolor and Faber castell pencils on 200gm2 fabriano paper
याआधीची चित्रे:
रंगीत पेन्सिल्स - कमंडलू: http://www.maayboli.com/node/47130
यावेळेस स्टेप्ससहितः
बेस कलर्सची पायरी क्र. १

साध्या पेन्सिलने पक्ष्याची आउटलाईन आणि वैशिष्ट्ये रेखाटली. मग त्यात बेस कलर्सचा पहिला लेयर दिला. आवश्यक तिथे रंग गडद केले किंवा कागदाचा भाग पांढराच (अनटच्ड) ठेवला. (उदा. डोळ्याभोवतालील भाग)
पायरी क्र. २