मांजरं म्हणजे माझा वीक पॉईंट आणि याआधी कितीही वेळा रेखाटले असले तरी प्रत्येक वेळेस मांजरांचे डोळे रेखाटणे म्हणजे एक प्रयोगच असतो. आणि आव्हानही. करड्या-पिवळ्यापासून राखाडी-निळ्या-हिरव्यांपर्यंत यांच्या इतक्या असंख्य छटा असतात की निसर्गाची कमाल वाटते.
त्यातून त्यातल्या बाहुल्या! काळी उभी सडसडीत रेघ ते एखाद्या ज्योतीसारख्या किंवा त्याच बाहुल्यांचे अंधारात गेल्यावर झालेले गोल मणी. मज्जा.
काचेसारखे चकाकणारे हे डोळे रेखाटताना पहिली काळजी घ्यावी लागते ती त्यातल्या प्रकाशबिंदूंच्या जागा लक्षात ठेवणे. त्या गेल्या की संपलंच.
सध्या येथे अनेकांची पेंटींग्ज दिसत आहेत. माझाही हा लहानसा प्रयत्न.
माझ्या आजोळी असलेल्या एका पडक्या वाड्याचा दर्शनी भाग.![ECF8AC79-451A-4CB3-9058-0DCC3F26C58B.jpeg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u32743/ECF8AC79-451A-4CB3-9058-0DCC3F26C58B.jpeg)
परवा पाषाण तलावाकडे गेलो होतो. येताना रस्त्यात दिसलेले हे वापरात नसलेले घर.
![C814429C-11F5-4717-9DCC-35BB7961FC25.jpeg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u32743/C814429C-11F5-4717-9DCC-35BB7961FC25.jpeg)
पर्पल्/ब्ल्यू आयरीस
माध्यमः कलर्ड पेन्सिल्स
फॅबर कॅसल पेन्सिल्स. नवनीतचे युवा स्केचबुक. मस्त आहे.
![Sunbird over banana blossom 33kb.jpg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u340/Sunbird%20over%20banana%20blossom%2033kb.jpg)
केळफुलावरील सूर्यपक्षी (Sunbird over banana blossom)
"बर्ड्ज - अ व्हिजुअल गाईड" मधून
7" x 10", माध्यमः ग्रॅफाईट पेन्सिल, कलरलेस ब्लेंडर, कॅम्लिन प्रीमीयम, प्रिझमाकलर आणि Staedtler watercolor pencils (पाणी न वापरता :))
याआधीची चित्रे:
रंगीत पेन्सिल्स - कॉमन किंगफिशर अर्थात खंड्या: http://www.maayboli.com/node/35872
रंगीत पेन्सिल्स - द ग्रेट ग्रे आऊलः http://www.maayboli.com/node/34728
![Robin30kb.jpg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u340/Robin30kb.jpg)
"रॉबिन"
नेचर सिरीजचं 'बर्ड्ज' म्हणून एक पुस्तक आहे आमच्याकडे. त्यातला हा रॉबिन (की रॉबीन?) पक्षी.