असोंड या दापोली जवळच्या माझ्या गावाला राहायला आले आहे. इथे असले की नेमाने रोज सकाळी फिरायला बाहेर जाते. काय करणार, व्यायाम आवडत नसला तरी गावाकडची हवा सकाळी घरी झोपून राहूच देत नाही. शहरातल्या हवेचे चटके खाल्लेले असले की मगच किंमत कळते या हवेची..! असो, तर सांगायचं म्हणजे या काही आठवड्यातले पहाटेचे क्षण "अ वि स्म र णी य" आहेत..! बा सी मर्ढेकरांची "माघामधली पहाट सुंदर" खऱ्या अर्थाने इथे जगायला मिळते. किती आनंददायी असतात आत्ता सगळ्या पहाटवेळा; प्रसन्न, विविधरंगी आणि मोहक गंधाच्या..!
सचेतनांचा हुरूप शीतल, अचेतनांचा वास कोवळा
हवेत जाती मिसळून दोन्ही, पितात सारे गोड हिवाळा
"अय्या! इतकं ग्लॅमरस प्रोफेशन सोडून तू हे काय विटा, खडी आणि सिमेंट मध्ये उन्हातान्हाची उभी राहून करत असतेस?"
"....मस्त मोठमोठ्या सेलिब्रिटींना भेटायची संधी, जर्नालिझम, स्टेटस, लाखांनी पगार आणि हे काय चालू केलंस तू?"
या आणि अश्या कितीतरी टोमणेवजा प्रतिक्रिया दिवसागणिक कानावर पडायच्या माझ्या, जेव्हा मी माझा well settled journalism जॉब सोडून स्वतःचा व्यवसाय चालू करण्याचा निर्णय घेतला.
"अगं शुद्ध नंदीबैल आहे तो! कोणीही काहीही सल्ले देतं आणि हा बुगूबुगू म्हणून मान डोलावतो! इतकी छान तब्येत होती, आता पाप्याचं पितर झालंय नुसतं!
मी स्पष्ट म्हटलं त्याला, 'आता शहाणपणा पुरे! तुझ्या घुगर्या जेवल्या आहेत मी, कळलं?! पंचवीस तरी पावसाळे जास्त पाहिलेत तुझ्यापेक्षा! माझं ऐक आणि नीट खायलाप्यायला लाग!'
बघू, आता तरी उजेड पडतोय का!
माझ्या पाच शशकांना मिळून जितके प्रतिसाद नाहीत त्याहीपेक्षा जास्त प्रतिसाद त्या महामायेच्या एकमेव शशकला? प्रतिभेची पारखच नाही कुण्णाला उरलेली.
काय नाहीये माझ्या पाच शशकांत?
माझी "काम" शशक वाचून खजुराहोची मैथुनशिल्पं पेन्शनीत जातील. "क्रोध" वाचून शिवशंभू तृतीयनेत्र गॉगलवतील. "लोभ" वाचून कवडीचुंबकही लंगर उघडेल, "मोह" वाचून भस्मासूर मोहिनीअट्टम विसरेल. "मद" वाचून ट्रम्पतात्याही सर्वोदयी होतील. पण माझी गाडी मत्सराशी अडलीय कारण मला मेलीला मत्सर म्हायतीच नाय ना.
आता "मत्सर" शशक लिहिण्यासाठी इतर शशक "लिहिण्या"पूर्वी लावला तसा कौल डीपसीकला लावला
मभागौदि २०२५ - अक्षरचित्र कु. विजयालक्ष्मी. वय ८ वर्षे
क

थ

ठ
जागतिकीकरणामुळे ज्या अनेक बर्यावाईट गोष्टी झाल्या त्यातली एक म्हणजे पेहरावात आलेले साधर्म्य. आजमितीला Traaditional Day/ Ethnic Day वगळता चार वेगवेगळ्या प्रदेशांतील चार व्यक्ती जवळपास उभ्या असल्यं, तर त्या कोणकोणत्या प्रदेशांतील आहेत ते ओळखताही येणार नाही. प्रत्येक प्रदेशाच्या पोशाखांची काही वैशिष्ट्ये असतात. महाराष्ट्रात तर नुस्त्या पगड्यांचेसुद्धा अनेक प्रकार आहेत.
साक्षात समुद्रमंथनातून निघालेल्या चौदा रत्नांपैकी एक - पारिजात वृक्ष. साहजिकच इंद्राने तो त्याच्या बागेत लावला. पुढे नारदमुनींनी त्याचे रसभरीत वर्णन केल्यावर रुक्मिणीला त्या फुलांचा मोह झाला. त्यावर कृष्णाने तिला ती फुले आणून दिली परंतु सवतीमत्सराने सत्यभामेला देखील त्या फुलांचा मोह झाला. मग सत्यभामेने "हा स्वर्गीय वृक्ष मला माझ्या बागेत हवाच" असा हट्ट धरला. आता झाली का पंचाईत? मोठा कठीण प्रश्न. शेवटी स्त्रीहट्टच तो, पण कृष्णाने एक युक्ती केली. पारिजातकाचे झाड त्याने सत्यभामेच्या अंगणात असे लावले की त्याच्या फांद्या रुक्मिणीच्या अंगणात वाकत होत्या. सडा पडायचा तो रुक्मिणीच्या अंगणात.
सर्वपित्रीची रात्र
गावकुसाबाहेर तीन पिंपळामधल्या जागेत माझ्या तरस कातड्याच्या आसनासमोरचं धगधगतं, वखवखलेलं आहुतीकुंड.
शेवटच्या आहुतीच्यावेळी महामांत्रिकानं लालभडक पट्टीनं डोळे झाकलेयत माझे.
ही महाआहुती ..कारण ती अर्भकाची.
याचे आई बाप काय करतील बाळ बळी गेल्याचं कळल्यावर?
आता असल्या वांझोट्या विचारांना थारा नाही. अन्यथा गुप्तधनाची संधी कायमची जाईल.
महामांत्रिकानं दिलेली सुरी अर्भकदेहात भोसकली अन् तिचं ज्वालार्पण तर केलं एकदाचं..
आता फक्त एक महिना..पुढच्या अमावस्येला धनवर्षाव.....
मनुष्य हा समाजशील प्राणी आहे. संवाद साधणे, स्वतःचे विचार, भावना, संवेदना व्यक्त करणे हा त्याचा स्वभावआहे ; ती त्याची गरजही आहे. भाषा हे एक संवादाचे व व्यक्त होण्याचे एक महत्त्वाचे माध्यम आहे. भाषा ही जशी शब्दांची असते तशीच चित्रांची, संगीताची, नृत्याची, वेगवेगळ्या कलांची सुद्धा असते.
आपल्या सर्वांना जोडणारी भाषा मराठी ! मराठी लेखन व वाचन हा आपणा सर्वांच्या जिव्हाळ्याचा विषय! मग ते लेखन गोष्ट असो, लेख असो, कविता असो किंवा चारोळी असो.
मभागौदि २०२५ च्या निमित्ताने घेऊन आलो आहोत एक खास खेळ, ‘चित्रांची भाषांतरे'
मराठी - आपली मातृभाषा, आपली मायमराठी!
ह्या भाषेशी आपली पहिली ओळख अर्थातच बोलण्याऐकण्यातून होते; पण ती खरी वृद्धिंगत होते वाचनातून.
मराठी साहित्याला सृजनशीलतेचा व विविधतेचा मोठा वारसा लाभलेला आहे. अनेक साहित्यिकांच्या पुस्तकांमधून तो जोपासला आहे.
आपल्या सर्वांच्या संग्रही मराठी भाषेतील पुस्तके असतीलच. चला, या मराठी भाषा गौरव दिना निमित्त त्यांची छायाचित्रे / प्रकाशचित्रे इथे आणू या.