२०१८ च्या जुलै महिन्यात ग्लेशियर आणि यलोस्टोन नॅशनल पार्कांना भेट दिली होती. त्यादरम्यान आमच्या विमानप्रवासात एक भयंकर प्रसंग गुदरला होता. त्या तश्या परिस्थितीतही मी प्रसंगावधान राखून फोटो काढले होते. या भयनाट्याला खरंतर मनाच्या तळाशी दाबून टाकायला हवं पण मायबोलीकर आपलेच आहेत म्हणून तो प्रसंग इथे शेअर करत आहे.
बालपण मुंबईत गेले. अर्ध्याहून अधिक आयुष्य खरे तर. जिथे जंगल म्हटले की ते सिमेंट काँक्रीटचे. ज्याच्या खिडकीत चार कुंड्या तो निसर्गप्रेमी. आमच्याकडे त्याही दोनच. एकीत आपली संस्कृती आणि परंपरा जपत लावलेली तुळस तर दुसरीत आवड जपत लावलेला गुलाब. पुढे कधीतरी अंधश्रद्धा जपत मनीप्लांट देखील आला. पण त्यापलीकडे फार काही वेगळे प्रयोग नाहीत.
चिल्का सरोवर भुवनेश्वरपासून साधारण ६० किमी. केवळ दीड तासात पोहोचतो आपण. मात्र सहसा सर्व पर्यटक चिल्का सरोवराच्या दक्षिण तटाला भेट देतात. तिथून बोटी निघतात, डॉल्फिन्स दाखवतात, बेटावर नेतात, मोतीवाले शिंपले दाखवून ते फोडून त्यातून मोती काढून दाखवतात आणि विकत घेण्याची गळ घालतात. हे आम्ही केलं आणि मग पुन्हा मागे येऊन सरोवराला वळसा घालून चिल्काच्या उत्तर किनार्यावर असलेल्या भानौपो चिलिका येथे मुक्कामाला आलो. आपल्याला अश्या नाविकतळावर जाण्याची वेळ आणि संधी मिळेलच असं नाही पण आम्हाला नशिबाने या सुंदर स्वच्छ तळावर राहता आलं.