
चिल्का सरोवर भुवनेश्वरपासून साधारण ६० किमी. केवळ दीड तासात पोहोचतो आपण. मात्र सहसा सर्व पर्यटक चिल्का सरोवराच्या दक्षिण तटाला भेट देतात. तिथून बोटी निघतात, डॉल्फिन्स दाखवतात, बेटावर नेतात, मोतीवाले शिंपले दाखवून ते फोडून त्यातून मोती काढून दाखवतात आणि विकत घेण्याची गळ घालतात. हे आम्ही केलं आणि मग पुन्हा मागे येऊन सरोवराला वळसा घालून चिल्काच्या उत्तर किनार्यावर असलेल्या भानौपो चिलिका येथे मुक्कामाला आलो. आपल्याला अश्या नाविकतळावर जाण्याची वेळ आणि संधी मिळेलच असं नाही पण आम्हाला नशिबाने या सुंदर स्वच्छ तळावर राहता आलं.
उत्तर किनार्यावरून पक्षी निरिक्षणासाठी अनेक गावांतून जाता येते असं समजलं होतं. आम्ही मंगलाजोडी हे गाव निवडलं कारण आंतरजालावर हे चांगलं आहे असं दिसत होतं. हिवाळ्यात चिल्कामध्ये बरेच स्थलांतरीत पक्षी येतात. ते बघण्याची उत्तम संधी मिळत होती आम्हाला. ठरवल्यानुसार ११ डिसेंबरला भल्या पहाटे सहा सव्वासहाला निघालो आणि मंगलाजोडी या गावाला पोहोचलो.
हायवेवरून गावात शिरून तेथून सरोवराच्या दिशेनं बाहेर पडून एका कच्च्या रस्त्यावरून कारनं जात राहिलो. हा एक उंचसा बांध होता. दोन्ही बाजूला पाणथळ उथळ शेतं होती. पक्षी दिसायला सुरुवात झालीच होती. रस्त्याच्या अगदी शेवटी एक तिकिट खिडकी, बाथरूमची सोय आणि एक रेस्टॉरंट होतं. तिथून जरा खाली उतरलं की १२-१५ साध्या होड्या होत्या. यात बसून आजूबाजूच्या पाणथळीत तास-दीडतास भटकायचं. होडीचा मार्ग चर काढून तयार केला असावा. तिथेही पाणी फारतर ४-५ फूट असेल . बाकी आजूबाजूची गवताळ पाणथळ जागा म्हणजे पक्ष्यांसाठी नंदनवनच
चित्र क्र. १
चित्र क्र. २
चित्र क्र. ३
चित्र क्र. ४
चित्र क्र. ५
चित्र क्र. ६
चित्र क्र. ७
चित्र क्र. ८
तिकिटं काढून त्यापैकी एकात बसलो आणि एका अद्भुतरम्य फेरफटक्याची सुरुवात झाली.
चित्र क्र. ९
शांत परिसर, लवकर आल्याने गर्दी नाही, सकाळची वेळ, होडीच्या वल्ह्यांचा काय तो आवाज आणि अर्थात पक्ष्यांचे कूजन ....... सकाळची वेळ असल्याने सगळेच पक्षी लगबगीत होते, जे शांत बसून होते ते पाण्यातल्या माश्यांवर लक्ष ठेऊन होते. अजून एक दोन होड्या होत्या. त्यात व्यावसायिक फोटोग्राफर होते. कॅमेर्यांच्या तोफा घेऊन ते होडीत ऑलमोस्ट आडवे झोपून त्या कोनातून पक्षी टिपत होते. एक दोन जरी योग्य क्षणांचे फोटो मिळाले तर दिवस सार्थकी होईल त्यांचा. पण त्यासाठी तासातासांची प्रदीर्घ प्रतीक्षा, प्रचंड संयम, सावधपणा आणि खंडीभर फारसे कामाचे नसलेले फोटो काढण्याची चिकाटी दाखवावी लागेल त्यांना.
आम्ही बालवर्गातले असल्यामुळे आमच्यावर असं काही ओझं नव्हतं. त्यामुळे हा बघ, तो बघ, इकडे बघ, तिकडे बघ असा एकमेकांना कोपरांनी ढोसत बिनआवाजाचा धुमाकूळ घातला. होडीवाला निवांत आणि संथ लयीत पुढे जात होता आणि त्याचा जोडीदार आम्हाला पक्ष्यांची नावं, माहिती देत होता. आम्ही दुर्बिणीतून कुठे बघावं सांगत होता. पक्षी डोळ्यांनी बघावा की दुर्बिणीतून निरखावा की कॅमेरात कायमचा टिपून घ्यावा कळेना. बरं सकाळच्या प्रकाशात फोटो इतके सुंदर येत होते, परीसरही नेहमीपेक्षा वेगळा असल्याने फोटो काढल्यावाचून राहवेना. हे असं लँडस्केप आपल्याला नेहमी दिसत नाही.
चित्र क्र. १०
चित्र क्र. ११
चित्र क्र. १२
चित्र क्र. १३
चित्र क्र. १४
चित्र क्र. १५
चित्र क्र. १६
चित्र क्र. १७
चित्र क्र. १८
चित्र क्र. १९
चित्र क्र. २०
चित्र क्र. २१
दीडेक तास कसा निघून गेला ते कळलंही नाही. परत येताना होडीच्या दोन्ही बाजूंना उंच गवतं होती, समोर चमचमणारं पाणी होतं, हवेत गुलाबी गारवा होता, मंद वारा, डुलणारी होडी आणि विविध पक्षी ....... आहा! काय अफलातून मैफिल जमली होती. हे क्षण भरभरून अनुभवायचे असतात आणि मग मनात साठवायचे असतात. नंतर केव्हाही कुपी उघडली की तेवढाच आनंद देतात.
चित्र क्र. २२
मस्त अनुभव एकदम व त्याबरोबरच
मस्त अनुभव एकदम व त्याबरोबरच लिखाण व फोटोही. मंगलाजोडी छान आहे असं ऐकून आहे, केव्हा योग येतोय बघायचं.
Wow! काय मस्त अनुभव! छान
Wow! काय मस्त अनुभव! छान साद्यंत माहिती दिली आहेस. बोटीत सोबत गाइड्सही असतात का?
)
(तिकिटावर 'कामाशिवाय आवाज करू नये' वगैरे सूचनाही असतात का?
इथे Cape Mayला गेलो होतो मागे स्थलांतरित पक्षी दर्शनासाठी. ऑडबनचं हेडक्वार्टर्स आहे तिथे. आम्ही घेतली नव्हती, पण बहुतेक गाइडेड टूर्सही असायच्या. आता माहीत नाही.
फोटोही मस्त - फोटोंबरोबर त्यातल्या पक्ष्यांची नावंही दे की.
हो. होडीवाला माहीती देतो.
हो. होडीवाला माहीती देतो. लिहीलंय लेखात.
नावं लक्षात नाहीत म्हणून सुरवातीलाच तिथे येणार्या पक्ष्यांची चित्रासकट लावलेली यादी दिली आहे फोटोतून. जोड्या लावा.
>>> होडीवाला माहीती देतो.
>>> होडीवाला माहीती देतो. लिहीलंय लेखात.
हो, खरंच की!
स्वाती, तुझ्या सुचनेनुसार
स्वाती, तुझ्या सुचनेनुसार नावं लिहायचा प्रयत्न करते. पण मी या विषयातील तज्ज्ञ नाही त्यामुळे बोर्डावरची चित्रं बघून नाव शोधणार आहे.
इतरही कोणास माहित असेल तर जरूर नावं सांगा.
मस्त अनुभव, लेखन आणि फोटो ही
मस्त अनुभव, लेखन आणि फोटो ही मामी.
मला चित्र१२ मधला खंड्या ओळखता
मला चित्र१२ मधला खंड्या ओळखता आला, आणि बाकी निरनिराळे बगळे. - बाकी जोड्या सावकाशीने लावेन.
मस्त दिसतंय हे ठिकाण!
मस्त दिसतंय हे ठिकाण! फ्लोरिडा एवरग्लेड्स ची आठवण आली मला! तिथे पण बोट राइड घेतली तेव्हा खूप सुंदर पक्षी दिसले होते.
मस्त!
मस्त!
नावं लक्षात नाहीत म्हणून सुरवातीलाच तिथे येणार्या पक्ष्यांची चित्रासकट लावलेली यादी दिली आहे फोटोतून. जोड्या लावा. > मी तर म्हणालेलेच, सुरूवातीचा बोर्डवरचे पक्षी बघितल्यावर परत बोटीत बसून तेच बघायला वेळ कशाला वाया घालवलात.? आता परत जोड्या लावण्यात वेळ घालवायचा!
पुढच्या वेळी जाऊन असंच करू.
चित्र क्र. १० >> डावी कडून
चित्र क्र. १० >> डावी कडून बगळा, मोर शराटी, काळ्या डोक्याचा शराटी आणि तलवार बदक
चित्र क्र. ११ >> थापट्या बदक
चित्र क्र. १३ >> नदी सुरय
चित्र क्र. १४ आणि १५ >> चक्रवाक
चित्र क्र. १८ आणि १९ >> उघड्या चोचीचा करकोचा
चित्र क्र. २० >> शेकाट्या
चित्र क्र. २१ >> जांभळी पाणकोंबडी
वाह वाह. धन्यवाद इंद्रा
वाह वाह. धन्यवाद इंद्रा
14, 15 ना चक्रवाक म्हणतात हे माहीत नव्हते. जोडीने फिरत होते हे. 5-6 जोड्या दिसल्या. चांगलेच मोठे होते. इंग्लिशमधे कुठलंसं बदक म्हणतात वाटतं. शोधलं - Ruddy shelduck ज्याला भारतात Brahminy duck असंही म्हणतात.
मस्त लिहीले आहेस मामी
मस्त लिहीले आहेस मामी
जायला हवे इथे असे वाटून गेले
आहाहा मामी, मस्तच भटकंती
आहाहा मामी, मस्तच भटकंती घडवलीस.
मेजवानी!!
मेजवानी!!
नशीबवान आहेस, मामी! फोटोंसाठी खूप खूप धन्यवाद.
मामी, मस्तच.
मामी, मस्तच.
पुरी पासून खूप जवळ आहे, पण कॉन्फरन्स असल्यामुळे इच्छा असून जाता आले नाही.
खूप मस्त अनुभव आणि फोटो.
इंद्रा, नावासाठी धन्यवाद.
चक्रवाक म्हणतात हे माहीत नव्हते. जोडीने फिरत होते हे. 5-6 जोड्या दिसल्या.>>>>> हो जोडीनेच फिरतात. प्रेमाचे आणि विरहाचे प्रतिक म्हणून साहित्यात खूप उल्लेख आहे.
मस्त अनुभव आणि फोटो मस्तच !
मस्त अनुभव आणि फोटो मस्तच !
सचित्र सुंदर छान अनुभव कथन
सचित्र सुंदर छान अनुभव कथन
छान वर्णन आणि सुंदर स्थळ,
छान वर्णन आणि सुंदर स्थळ, फोटो.
इन्द्रधनुष्य माहिती करता धन्यवाद.
धन्यवाद, इंद्रधनुष्य!
धन्यवाद, इंद्रधनुष्य!
मस्त! फोटो ही छान!
मस्त! फोटो ही छान!