२०१८ च्या जुलै महिन्यात ग्लेशियर आणि यलोस्टोन नॅशनल पार्कांना भेट दिली होती. त्यादरम्यान आमच्या विमानप्रवासात एक भयंकर प्रसंग गुदरला होता. त्या तश्या परिस्थितीतही मी प्रसंगावधान राखून फोटो काढले होते. या भयनाट्याला खरंतर मनाच्या तळाशी दाबून टाकायला हवं पण मायबोलीकर आपलेच आहेत म्हणून तो प्रसंग इथे शेअर करत आहे.
ग्लेशियर नॅशनल पार्काची भेट संपवून आम्ही कॅलिस्पेल वरून जॅकसन होलला विमानाने जायला निघालो. या छोटेखानी विमानाचा मध्येच सॉल्ट लेक सिटीला स्टॉप होता. सॉल्ट लेक सिटी वरून पुन्हा आम्ही जेव्हा उड्डाण केले तेव्हा सर्व ठीकठाकच होते. आकाश अगदी नेहमी सारखंच नॉर्मल दिसत होतं. पुढे ज्या भयानक प्रसंगाला आम्ही तोंड देणार होतो त्याचा मागमूसही कुठे नव्हता आणि म्हणूनच आमच्यापुढे काय वाढून ठेवलंय याची कल्पनाही आम्हाला आली नव्हती त्यावेळी.
चित्र क्र. १
पण विमानानं आकाशात उड्डाण केलं आणि काहीवेळातच एक एलियन यान लपूनछपून आमच्यावर पाळत ठेऊन आहे असं लक्षात आलं.
चित्र क्र. २
त्या यानानं आमच्या विमानाचा पाठलागच सुरू केला.
चित्र क्र. ३
आमच्या विमानाला ढगांमध्ये कोंडून चिरडून टाकण्याचा त्यांचा डाव आमच्या हुशार वैमानिकानं ओळखला आणि तो त्या ढगांना मागे टाकून वेगाने पुढे निघाला. मग मात्र त्या यानाला आता आमच्यापासून लपण्याची गरज वाटेना.
चित्र क्र ४
शर्थीचं युद्ध सुरू झालं. ते यान मध्येच लपे, मध्येच ढगांच्या भिंतीमागून तोंड दाखवे.
चित्र क्र ५
चित्र क्र ६
चित्र क्र ७
इथे एखाद्या सोम्यागोम्याची भितीनं गाळण उडाली असती. पण आमचा शूरवीर वैमानिक असा घाबरतोय होय! त्यांची खेळी आमच्या वैमानिकाच्या लक्षात आली. एलियन्सनी ढगांना आग लावली होती आणि त्यांना आमच्या विमानाचं गरमागरम सँडविच करायचं होतं हे स्पष्ट दिसत होतं.
चित्र क्र ८
चित्र क्र ९
पण वैमानिकानं शिताफीनं विमान त्या ढगांच्या कचाट्यातून बाहेर काढलं आणि मोकळ्या आकाशात घेऊन आला. इथे आकाशात दूरवर एक किल्ला दिसत होता. इतर कोणी असा तसा वैमानिक असता तर त्यानं लगेच त्या किल्ल्यावर विमान उतरवलं असतं. पण आमचा वैमानिक खूप हुशार असल्याने हा त्या एलियन्सचाच डाव असल्याचं त्याच्या लक्षात आलं आणि त्या किल्ल्याकडे त्याने ढुंकुनही पाहिलं नाही.
चित्र क्र १०
कोणतीही खेळी काम करत नाही असं लक्षात आल्यावर मात्र एलियन्सनी शेवटचा प्रयत्न म्हणून एक अक्राळविक्राळ अजस्त्र प्राणी आमच्यावर सोडला.
चित्र क्र ११
पण त्याचाही काही उपयोग झाला नाही कारण एव्हाना आमचं विमान त्यांच्या प्रभावक्षेत्रातून बाहेर आलं होतं.
चित्र क्र १२
फिटे अंधाराचे जाळे
झाले मोकळे आकाश. ...... (म्हणजे खरंतर अंधार पडू लागला होता त्यामुळे हे गाणं लाक्षणिक अर्थानं घ्यावे)
चित्र क्र. १३
आणि अशा तर्हेने जीवावरच्या प्रसंगातून आम्ही सुखरूप जॅकसन होलला पोहोचलो.
चित्र क्र. १४
हा लेख देखिल कित्येक वर्षे
हा लेख कित्येक वर्षे लिहायचा राहून गेला होता कारण माबोवर फोटो टाकणं जमत नव्हतं. निसर्गायणाच्या निमित्ताने लेख लिहून झाला आहे याचा आनंद आहे. यासाठी संयोजकांना धन्यवाद.
बापरे! भयंकर प्रसंग.
बापरे! भयंकर प्रसंग.
मोठ्या धीराच्या आहात तुम्ही.
या सगळ्या प्रसंगाचे इत्यंभूत वर्णन देणारे फोटो खूप आवडले. मस्त.
भारी अनुभव !
भारी अनुभव !
ते ढगांच्या सँडविचवाले फोटो मस्त आहेत
भारी अनुभव !
भारी अनुभव !
सगळे फोटो मस्त आहेत
फक्त सगळ्यांचे पाहून झाले की लगेच डिलिट करा नाहीतर एलियन्स सॅटेलाईट वरून फोटोंचा माग काढत माबोवर हल्ला करायचे .
भारी लिहीलय मजा आली वाचायला
भारी लिहीलय
मजा आली वाचायला
खास मामी टच. खूप हसले. फोटो
खास मामी टच. खूप हसले. फोटो अप्रतिम! किल्ला तर फारच
भारी! एलियन वगैरे
भारी! एलियन वगैरे
खूप आवड्ला लेख! मामी टच -
खूप आवड्ला लेख! मामी टच - अगदी
मीच बहुतेक बावळट असेन... कारण
मीच बहुतेक बावळट असेन... कारण अगदीच सावधपणे वाचायला घेतलं :कपाळावर हातः पण अगदीच नवखी नाही त्यामुळे पहिल्या परिच्छेदाच्या शेवटीच काय ते समजून चुकले
मस्त लेख!
मामी… कसले घाबरवलेस गं…
मामी… कसले घाबरवलेस गं… म्हटले काय झाले न काय नाही देव जाणे…
त्या राक्षसावर जरा दोन बाण टाकायचे होते ग पायलटाने.. त्याला सुचले नसेल इतक्या धामधुमीत, तु तरी बोलायचे.
पायलटाची दृष्ट काढलीस ना उतरल्यावर.. कसली कठिण लढाई मारुन आला पोरगा… की पोरगी.. जे असेल ते.
मजा आली वाचायला. फोटो मस्तच.
छान लिहिलंय.
छान लिहिलंय.
हाहा!
हाहा!
या जिवावरच्या प्रसंगातून सहीसलामत सुटून आल्याबद्दल अभिनंदन!
जिवावर बेतले फोटोंवर निभावले
जिवावर बेतले
फोटोंवर निभावले
मी लेख open करून ठेवला,
मी लेख open करून ठेवला, browser मध्ये. सिरियस मामला, निवांतच वाचून म्हणून.
मजेशीर लिहिलंय.
फोटो छानच सगळे.
किल्ला, सँडविच, प्राणी
मामी, मस्तच मजेशीर लिहिलं
मामी, मस्तच मजेशीर लिहिलं आहेस.
मस्त लिहिलंय, मामी!
यालाच घाबरून शेवटी जॅक्सन
यालाच घाबरून शेवटी जॅक्सन "होल" मधे शिरलात ना?