गद्यलेखन

राहू या ग्रहाचे विलक्षण व्यक्तिमत्त्व.

Submitted by Sarav on 10 November, 2024 - 09:15

राहू या ग्रहाचे विलक्षण व्यक्तिमत्त्व.

एखादे निर्जन ठिकाण, जिथे दूर-दूर पर्यंत एकही घर नाही, रस्ता कच्चा आहे, ते ठिकाण एकदम सुनसान आहे, एकाकी आहे, शांत आहे, तिथे राहूचा वास आहे.

जिथे कोणतीही पिके घेता येत नाहीत, जिला बंजर जमीन, नापीक जमीन असे म्हणतात, ते स्थान राहूचे आहे.

असे झाड ज्यावर कोणतेही फूल नसते, फळे येत नाहीत एखादे फूल येते पण लगेच कोमेजते, झाडावर एकही पान नसते, ते झाड राहूचे आहे.

अर्धवट बांधलेले घर, ज्याला कोणी वाली नाही, तिथे राहूचा वास आहे.

शब्दखुणा: 

एका बागेचे अंतरग

Submitted by दत्तात्रय साळुंके on 9 November, 2024 - 02:39

बाग म्हटलं की डोळ्यात पानं फुलं तरळतात, कारंजी नाचतात. माणसं घोटाळतात, मुलं दुडदुडतात. कानात पक्षी किलबिलतात. हिरव्यागार फुलवेलीच्या कमानीखालून चालताना कोणतरी आपल्या स्वागतासाठी हा पानाफुलांचा मांडव सजवलाय असं वाटतं. बाजूनं वाहणा-या पाण्यातले गोलगोटे मनसोक्त न्हाताना पाहिले की आपल्यालाही तो खळाळ कुरवाळावासा वाटतो. फुलपाखरू होऊन फुलं चुंबाविशी वाटतात. हिरवळ पांघरावीशी वाटते. मलबारहिल सारख्या ठिकाणी वयानं मोठं झालं तरी म्हातारीच्या बुटात शिरावं वाटतं. प्राण्यांच्या आकाराच्या झाडांशी लपाछपी खेळावी वाटतं. हिरवळीवरच्या मोठ्या घड्याळाच्या काट्याला धरून गोलगोल फिरावं वाटतं.

शब्दखुणा: 

रक्तपिपासू ( श्री कथा )

Submitted by प्रथमेश काटे on 1 November, 2024 - 10:06

ती चिमुरडी आज भलतीच खुश होती. आता त्यांचा दर आठवड्याचा प्रोग्राम सुरु होणार होता. नेहमीसारखा.
‌‌ आगोटी. साधारण चार-साडे चारशे घरांचं खेडेगाव. जरा लहान असलं तरी चांगलं विकसनशील गाव होतं. बऱ्याच सुखसोयी उपलब्ध झाल्या होत्या. बऱ्याच होऊ घातल्या होत्या. अशा या गावच्या एका छोट्याशा गल्लीत राहणारी ही मुलं. सगळ्यांची घरं एकमेकांपासून थोड्याच अंतरावर होती. त्यामुळे ते एकत्रच असायचे. एकत्र शाळेत जायचे. एकत्र खेळायचे. गल्लीभर बागडायचे. आणि एकत्रच हिवाळ्यातल्या रात्री, गल्लीच्या मध्यावर असलेल्या पिंपळाच्या झाडाखाली तयार केलेल्या शेकोटीखाली जमून सखू आजीच्या गोष्टी ऐकायचे.

शब्दखुणा: 

चोरी

Submitted by मिरिंडा on 30 October, 2024 - 07:01

शेबटी काकींनि मनाचा हिय्या केला. वेगवेगळ्या आकाराच्या चार जड चांदीच्या वाट्या ओच्यात बांधल्या. नेसण घट्ट केली. कपाटाच्या किल्ल्या जागेवर ठेवल्या. मदत करणाऱ्या मुलीचे लक्ष नसल्याचे पाहून त्या पिशवी घेउन निघाल्या.

प्रांत/गाव: 

हौस

Submitted by प्रथमेश काटे on 29 October, 2024 - 08:53

ताराने लगबगीने दरवाजा उघडला. तिच्या अपेक्षेप्रमाणे दारात संतोष उभा होता. संतोष. तिचा नवरा. मूळचा गहूवर्णी रंगाचा ; पण कामानिमित्ताने उन्हातान्हात भटकावे लागत असल्यामुळे जरासा रापलेला, काळवंडलेला चेहरा, मध्यम उंची, किरकोळ शरीरयष्टी. दिवसभराच्या श्रमाने सारं शरीर घामेघुम झालेलं. चेहऱ्यावर थकवा स्पष्ट दिसत होता. पण या थकव्यातून उत्पन्न होणाऱ्या वैतागाचा मात्र त्यावर लवलेशही दिसत नव्हता. उलट तो आज खुश दिसत होता. डोळ्यांत चमक होती ओठांवर स्मित होतं.

इथे भुरटे चोर खूप आहेत..

Submitted by SharmilaR on 26 October, 2024 - 02:38

‘इथे भुरटे चोर खूप आहेत..’

अमेरिकेत अजू-कमू कडे पोहोचल्यावर दोन दिवसात आम्ही घरात सेट झालो, अन् मग नजर बाहेर वळली.

तसं पहिल्याच दिवशी मुलांनी घराभोवती फिरण्याची जागा दाखवून ठेवली होती. घर नं चुकता अगदी घराभोवतीच्या परिसरातच प्रदक्षिणा मारायची ठरवलं, तरिही छान एक किलोमीटरचा राऊंड होत होता तो. मग एक-दोन दिवस तसंच घराला प्रदक्षिणा मारत फिरलो.

घरात किचनमधलं तंत्र, म्हणजे इंडक्शन वापरणं.., डीश वॉशर लावणं..,हे जमायला लागलं. म्हणजे घाई कसलीच नव्हती, तरी मलाच तिथे पटकन स्वावलंबी व्हायचं होतं हे सगळं जमवून!

क्रोनोनॉट अरुण

Submitted by केशवकूल on 25 October, 2024 - 02:28

हा घ्या माझा पण एक रुपया!
अरुण रेडिओ वरची क्रिकेटची कॉमेंटरी ऐकण्यात अगदी रंगून गेला होता. खाली सोसायटी कंपाउंड मध्ये त्याचे मित्र गल्ली क्रिकेट खेळण्यात दंग होते. ते त्याला खेळण्यासाठी सारखे बोलावत होते. पण तो गेला नव्हता. त्याला भारत पाकिस्तान गेम मध्ये जास्त रस होता. शेवटची ओवर चालू होती. पाकिस्तान जिंकणे आता शक्यच नव्हते. हा गेम संपला की तो मित्रांच्या बरोबर खेळायला जाणार होता. इतक्यात आतून बाबा आले. आज बाबा ऑफिसला गेले नव्हते. त्यांना जबरदस्त सर्दी झाली होती. थोड अंग गरम झाल्यासारखे वाटत होते.
“ झाली की नाही तुझी मॅच?” बाबांनी थोड्या चढ्या आवाजांत विचारले.

Pages

Subscribe to RSS - गद्यलेखन