Submitted by केशवकूल on 27 February, 2025 - 23:28
जडव्यागळ
असा शब्द कोशात नाहीये, सर. तुम्हाला जगड्व्याळ असे म्हणायचे आहे का?
नाही. पण असाच एक शब्द आहे. म्हणजे किचकट, गुंतागुंतीचे, समजण्यास अवघड.
त्यासाठी जडजंबाळ शब्द आहे
थँक्यू. आवडली का?
काय आवडली का?
कविता रे.
सर, मला शब्दांच्या पलीकडले काही समजत नाही.
अस म्हणजे मनात काही हलल्यासारखे वाटत नाही?
कुठलीही गोष्ट हलण्यासाठी फोर्सची गरज लागते. तसा काही फोर्स इथे दिसत नाहीये. वस्तूच्या जडत्वावर मात...
स्टॉप इट.
येस सर.
आजची बातमी वाचलीस? मला रडू आले.
शक्य आहे. काही लोक संवेदनाशील असतात.
एका नवजात सोनूलीचा मृत देह कचराकुंडीत...
कचऱ्या पासून वीजनिर्मितीची प्रक्रिया आहे...
तुला काहीच कसे वाटत नाही?
We Robots don't feel.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
छान शशक..
छान शशक..
मस्त लिहिलेय शशक शेवट तर..
मस्त लिहिलेय शशक शेवट तर..
मस्त
जमलीय.
(No subject)
कारूण्याची किनार आहे कथेला,
कारुण्याची किनार आहे कथेला, विज्ञानाच्या नक्षीकामाने लपवलेली. आवडली.
मस्त ! आवडली
मस्त ! आवडली
यात तुम्हा माणसांना
यात तुम्हा माणसांना कारुण्याची झालर वगैरे दिसली तर याद राखा.
ट्रॅफिक लाईट आणि टू व्हिलर ओळखा बरोबर कारुण्य ओळखा प्रश्न येऊ लागेल. मग भोआकफ!
ट्रॅफिक लाईट आणि टू व्हिलर
ट्रॅफिक लाईट आणि टू व्हिलर ओळखा बरोबर कारुण्य ओळखा प्रश्न येऊ लागेल.
गुड वन.
>>>>
High context कथा आहे. मला आधी
High context कथा आहे. मला आधी जरा अभ्यास करावा लागला ही नीट कळायला.
शिवाय षड्रिपु विरहित रोबोटची कथा आहे हे विशेष
मस्त, कल्पक.
मस्त, कल्पक.