पत्र
पत्र
पत्र
काही वर्षांपूर्वी मी लिहिलं होतं पत्र
तुझ्या नावाने आणि
मुद्दाम पाठवलं होतं जुन्या पत्त्यावर
मला माहिती होतं तुला नाहीच ते मिळणार
कारण तू तिथे रहात नाहीस
काळ पुढे सरकतोय
मला कळून चुकलंय नाही येणार आता उत्तर
तरी अजूनही मी पत्र पाठवत राहते
जुन्याच पत्त्यावर
कधी गेलासच चुकून तिथे
तर माझी इतकी पत्र पाहून
नक्कीच होशील निरुत्तर !
-- अभिश्रुती
मुलीला नवव्या वाढदिवसाचं पत्र: अदू इन वंडरलँड आणि अॅलेक्स पर्वाची सुरूवात
मराठी भाषा गौरव दिन - स.न. वि.वि. - कुमार१
प्रति
( दुर्मिळ झालेल्या) प्रिय टपालपेटीस
स न वि वि.
अग, किती वर्ष झालीत तुझ्याशी संपर्क संपून ! खरंच आता आठवत नाही. संपर्क तर जाऊदेच, गेल्या कित्येक वर्षांत माझ्या जाण्या-येण्याच्या रस्त्यांवरून तुझं दर्शन सुद्धा झालेले नाही. आता तुझ्या आठवणी काढायच्या तर भूतकाळात जावे लागणार.
अदूचा आठवा वाढदिवस: आनंदयात्रेची आठ वर्षं!
अदूला सातव्या वाढदिवसाचं पत्र: असंख्य प्रश्न आणि अमर्याद स्वप्नं
पत्र १
प्रिय आई व बाबा,
खरं तर आजकाल पत्र कोणी लिहित नाही, पण मला त्याशिवाय दुसरा पर्याय दिसत नाही, म्हणुन लिहितोय. तुम्ही दोघही कृपया गैरसमज करुन घेउ नका.
तसं पाहिलं तर मी मागच्याच आठवड्यात लग्नाला आलो होतो, पण कुठुन दुर्बुद्धी झाली अन लग्नाला आलो असं वाटु लागलय. नाही नाही... प्रियाच्या लग्नात माझ्या लग्नाबद्दल गोष्टी चालु होत्या, त्याबद्दल मी अजिबात नाराज नाही. पण...
वडिलांचे उत्तर
माझ्या प्रिय पिल्ला,
आम्ही काही दिवसांपूर्वी फेसबुक वरचे तुझे पत्र वाचले. अमेरिकेमध्ये स्थायिक होण्याचा तुझा निर्णय कसा योग्य आणि सर्व पिढीतील पालक घेतात त्याप्रमाणे आपल्या पुढच्या पिढीच्या हितासाठी आहे हे वाचले आणि वाचून आनंद वाटला. तुला अनेक दिवस लिहायचे मनामध्ये होते पण लिहिणे होत नव्हते. आज थोडी सर्दी आणि कसकस होती त्यामुळे घरकामातून मोकळीक होती.. विश्रांती घेताना मन मागच्या आठवणींमध्ये जात होते हीच योग्य वेळ साधून लिहीत आहे.
मुलीच्या चौथ्या वाढदिवसानिमित्त लिहिलेलं पत्र: गोष्ट आणि फगड्या
लव यू ज़िन्दगी: अदूचा तिसरा वाढदिवस!!!!
आज तू चक्क तीन वर्षांची झालीस! वाढदिवशी तू घातलेल्या पंखाप्रमाणे तुला आता खरोखर पंख फुटले आहेत! तुझा वाढदिवस तू खूप खूप एंजॉय केलास! दिवसभर 'हॅपी बर्थडे टू यू' म्हणत होतीस! गेल्या एका वर्षामध्ये तुझी झेप थक्क करणारी आहे! अलीकडे तर तू मोठ्या माणसांप्रमाणे बोलतेस! जवळ जवळ ऐकलेला प्रत्येक शब्द तुला लक्षात राहतो आणि नंतर तू अचानक तो शब्द असलेलं वाक्य बोलतेस! तुला इतके बारीक सारीक संदर्भ लक्षात राहतात! माणसं चांगले लक्षात राहतात!
Pages
