संवाद
निक्षून..
निक्षून..
जुळलेले ऋणानुबंध
पुन्हापुन्हा अनुभवणे नाही
आता संवाद होणे नाही
ऐल मी पैल तू
मधला साकव पुन्हा
बांधणे नाही
आता संवाद होणे नाही
समीकरण मी उत्तर तु
हे साधे गणित
पुनः पुनः सोडविणे नाही..
हा संवाद होणे नाही
माझ्या आर्त हाकेची
कधीही न मिळालेली साद तू
आता कधी हाक मारणार नाही
हा संवाद परत होणे नाही
(८मे, २०२३)
एक चहा वाफाळलेला
एक चहा वाफाळलेला
लघुकथा
.........................................
"आज चहा दिवस आहे, फेसबुकवर post होती कुणाचीतरी"
"What rubbish!"
"अरे खरं सांगतेय "
"प्रश्न तुझ्या सांगण्याचा नाही "
"मग? तुला नेहमीच माझ्या सांगण्यावर शंका असते, किंवा सरळ दुर्लक्ष करतोस. तेच कोणा मित्राने सांगितलं तर तासभर त्याविषयावर बोलत राहशील. मी सांगितलं तर त्या ध्वनीलहरी सोयीस्करपणे कानाच्या बाहेरून परततील "
"अगं तसं नाही काही, एक मिनिट, तुला खरंच असं वाटतं?"
"वाटायला कशाला हवंय, सत्य आहे ते, #fact, you know "
"बरं ते सोड,चहाचं काय म्हणत होतीस?"
संवाद कथा : फरगेट इट व्हॉट एव्हर
निकी आणि निरु लव मॅरेज च्या टप्यावरलं जोडपं, लिव्ह इन, लग्न या कात्रीत सापडलेलं आणि त्यात टिपिकल गॉसिप ने होणारं नुकसान हा या संवादाचा विषय आहे.
निकी:शरीरासारख्या भावना सडपातळ नसतात ना राव! हो मला तुझ्याबद्दल बरंच काहीं भरीव आणि जाडजूड वाटत राहतं. यार मला तुझ्यासाठी स्पेशल काहीं करायला आवडेल
निरु: खाण्यासाठी?
निकी: ऑकोर्स रे,
निरु: तेव्हढ्याने आयुष्य भरत नाही बाई.. एकत्र राहायचं म्हणत्येस का लग्न करायचं आहे तुला?
निकी: आ आ हा, लग्न हाच तो भरीव भारी शब्द बाबू..मला कोटीनेनंतल कुकिंग करायला आवडेल, यार पण कपडे तू प्रेस करशील ना...
अल्कोहोल डिपेंडेन्सीबद्दल मदत हवीय
मित्रहो! एक मदत हवीय.
अल्कोहोल डिपेंडेन्सीबद्दल
आधी अल्कोहोल डिपेंडेन्सी म्हणजे काय हे थोडं स्पष्ट करतो.हा खालील मेसेज व्हॉटसअॅपवरुन मिळाला आहे.लेखक कोण आहेत ते माहित नाही.पण अल्कोहोल डिपेंडेन्सी म्हणजे काय ते त्यांनी व्यवस्थित समजावून सांगितले आहे.
अल्कोहोल डिपेन्डन्सी
अल्कोहोल डिपेन्डन्सीचे ४ महत्त्वाचे पैलू आहेत. दारू पिण्याचे समाधान, सतत दारूचा विचार, दारू न मिळाल्यावर अस्वस्थता, दारू पिण्यात वा ती मिळविण्यासाठी भरपूर वेळ घालवणे व दारूच्या अंमलात राहणे तसेच इतर जबाबदार्यांकडे दुर्लक्ष करणे, याला अल्कोहोल डिपेन्डन्सी म्हणतात.
संवाद (भाग २)
आपल्या साऱ्या निर्णयांत, कृतीत आपल्या मनात आपला स्वत:शीच जो संवाद सतत सुरू असतो त्याचा मोठा वाटा असतो. भीतीच्या बाबतीत या आतल्या संवादाचे येणारे आवाज हे सहसा “आज नकोच, नंतर बघू”, “बापरे मला कसं जमेल” “असं झालं तर!” अश्या स्वरुपाचे असतात, हे आपण गेल्या भागात पाहिलं. भीतीचे वेगवेगळे प्रकार [फोबिया (विशिष्ट गोष्टीची किंवा परिस्थितीची भीती), Generalised Anxiety Disorder (जी ए डी किंवा प्रत्येक गोष्टीची धास्ती), हेल्थ anxiety (आरोग्याबद्दलची, आजारांची भीती), सोशल anxiety (समूहामध्ये वावरण्याची भीती), पॅनिक डिसऑर्डर (भीतीचा तीव्र झटका)] यांच्याबद्दलही गेल्या भागात थोडक्यात पाहिलं .
तो आणि ती... दोघेही मी
रुप जरी तुझे गोजिरवाणे
त्याला गंध कुठे आहे
पाठमोरीच एकदा वळ मागे
आरश्यात सोबती कोण आहे?
सोबती आज इथे
कोण मागतो आहे
आयुष्य तर फक्त
दोन क्षणांचे आहे
जग तूही दोन क्षण
काय गैर आहे
विसरु नकोस, त्यांत
एक क्षण माझाही आहे
ऋण एका क्षणाचे
तुझ्यावर ही आहे
फेडण्या ते ऋण
सख्या! जन्म पुढचा आहे
हॅरी पॉटरच्या भाषेतलं पत्र!
शब्देविण संवादु
" तिला काहीं सांगायचंय " या नाटकाचा टी वी वरचा प्रोमो पाहिलाय?
" यश, माझ्याशी बोलना," आपली तेजू म्हणते.
" असं बोल म्हंटल्यावर काय बोलणार, सुचायला हवं ना काहीतरी…" अस्ताद उत्तरतो.
" जोडीदाराशी काय बोलावं हे सुचायची गरज पडली, की समजावं संवाद संपत चाललाय.." तेजश्री म्हणते.