निक्षून..

Submitted by अतितिथेमाती on 10 May, 2023 - 15:20

निक्षून..

जुळलेले ऋणानुबंध
पुन्हापुन्हा अनुभवणे नाही
आता संवाद होणे नाही

ऐल मी पैल तू
मधला साकव पुन्हा
बांधणे नाही
आता संवाद होणे नाही

समीकरण मी उत्तर तु
हे साधे गणित
पुनः पुनः सोडविणे नाही..
हा संवाद होणे नाही

माझ्या आर्त हाकेची
कधीही न मिळालेली साद तू
आता कधी हाक मारणार नाही
हा संवाद परत होणे नाही
(८मे, २०२३)

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सामो, धनवन्ती, केशवकूल, साद
सगळ्यांचे आभार.. Happy

सामो, खरंतर ही कविता? उद्वेगातून खरडल्या गेलेल्या आणि जराही ऐडिट न करता मांडलेला भावनांचा पसाराच आहे.. त्याला योग्य नावाच्या कोंदणात बसवण्याची धडपड पण करावीशी वाटली नाही.. पण नाव सुचवण्यासाठी धन्यवाद.. बदल करत आहे..