दारु
दारु-दारु ऐसा, लागलासे ध्यास
शेवटचा श्वास, दारुसंगे
दारु-दारु ऐसे, करोनी चिंतन
ठिबक सिंचन, बसविले
फुका म्हणे नाही, पीत म्या फुकट
देतो ज्ञानामृत, लोकांआधी
बरे झाले देवा, धाडलीत दारू
संगतीला पारु, पाठवावी
काय सांगू देवा, दारुचे उपकार
स्वर्गाचेच द्वार, उघडिले
कोणी देखिली गा, स्वर्गाची वसती
दृष्टी आड सृष्टी, खरी खोटी
जाणून घ्या बापा, दारुची महती
स्वर्गच खालती, आणियेला
कृपाळू देवाने, निर्मियली व्हिस्की
अवनीवरी दु:खी, आता कोण
दयाळू देवाने, निर्मियली रम
मोक्षमार्ग सुगम, सर्वांसाठी