कोलंबिया युनिव्हर्सिटी आणि येल मेडिकल स्कूलचे पदवीधर आणि मियामीतील मानसशास्त्राच्या संस्थेचे अध्यक्ष असलेले डॉ. ब्रायन वाईस अतिशय तणावात असलेल्या व अस्थिर अशा कॅथरीन ह्या तरुणीवर मानसोपचार करतात. तिला होणार्या त्रासाचं मूळ तिच्या जीवनातल्याच काही अनुभवांमध्ये असावं असं मानून ते तिला बोलतं करतात. तिने अधिक बोलतं व्हावं आणि हलकं व्हावं म्हणून ते तिला ट्रान्समध्ये नेतात आणि तिच्या आठवणी सांगायला सांगतात. कॅथरीन तिचे अनुभव- आठवणी सांगत जाते. थेरपीचे काही सेशन्स होऊनही तिची अस्थिरता थांबत नाही. म्हणून डॉ. वाईस तिला आणखी लहानपणीचे अनुभव विचारतात.
कशाला त्या सायकियाट्रिस्टच्या डोंबल्यावर पैसे घालायचे? घडा घडा बोलावं. धडाधडा काम करावीत. रिकाम मन सैतानाचे घर. रिकामटेकडेपणातून हे नसते उद्योग सुचतात. तो काय सांगणार? आम्ही जे सांगतो तेच ना! मित्रमंडळींशी, घरच्यांशी शेअर करा, बोला. कामात गुंतवून घ्या! पण फी देउन हेच ऐकल की बरं वाटत. आम्ही सांगितलं तर त्याची किंमत नाही. प्रत्येक गोष्टीवर शंका घेत बसले की मग नस्ते आजार मागे लागतात. हे होतय ते होतयं. लवंग खाल्ली कि उष्णता होती आन वेलची खाल्ली की सर्दी होते. आम्ही बघा! जातो का उठसुट डॉक्टर कडे? आपली रोगप्रतिकार शक्ती असतेच ना! एकदा औषध गोळ्या मागे लागल्या कि घेत बसा आयुष्यभर.
मध्यंतरी सा या मानसोपचार या क्षेत्रात काम करणार्या संस्थेच्या मिटिंगला हितचिंतक या नात्याने गेलो होतो. डॉ अनिल वर्तकांशी फोन व ईमेलवर भेटलो होतो पण प्रत्यक्ष भेट झाली नव्हती. मिटिंग मधे stigma towards mental illness हा विषय होता. आंतरजालावर वर मानसिक आरोग्य या विषयावर असलेल्या चर्चांची माहिती मी तिथे दिली. खर्या नावाने तिथे वावरत नसल्याने लोक तिथे मोकळे होतात. अनेकांना व्यक्त व्हायचे असते पण लोक काय म्हणतील? या भीतीपोटी ते व्यक्त होत नाहीत व मनात गोष्टी तशाच राहतात. वर्षानुवर्षे त्या तशाच राहतात. आपण मनातल्या त्रासदायक गोष्टी जर मोकळेपणा बोललो तर समोरची व्यक्ती आपल्याला कमकुवत समजेल का?
मागील भाग वाचण्यासाठी कृपया खालील दुव्यावर जावे ही विनंती.
https://www.maayboli.com/node/78761
धनबादच्या आधी वेटर पुन्हा जेवणाची ऑर्डर विचारायला आलेला होता.
मामीने बरंच काही सोबत आणलेलं. तेव्हां जेवणाची ऑर्डर दिली नाही.
रात्री साडेनऊ वाजता धनबाद आलं. मला थोडंसं खाली उतरावंसं वाटत होतं. पण मामीने अजिबात उतरू दिलं नाही. मी प्रचंड वैतागले. आई पण असंच करते, मामीही तशीच. पण मामीला तसंच सोडून मी खाली उतरून पाय मोकळे केले. सिग्नल बदलतानाच पुन्हा येऊन बसले. मामी हाका मारत होती. खूप धास्तावली होती.
आपल्या साऱ्या निर्णयांत, कृतीत आपल्या मनात आपला स्वत:शीच जो संवाद सतत सुरू असतो त्याचा मोठा वाटा असतो. भीतीच्या बाबतीत या आतल्या संवादाचे येणारे आवाज हे सहसा “आज नकोच, नंतर बघू”, “बापरे मला कसं जमेल” “असं झालं तर!” अश्या स्वरुपाचे असतात, हे आपण गेल्या भागात पाहिलं. भीतीचे वेगवेगळे प्रकार [फोबिया (विशिष्ट गोष्टीची किंवा परिस्थितीची भीती), Generalised Anxiety Disorder (जी ए डी किंवा प्रत्येक गोष्टीची धास्ती), हेल्थ anxiety (आरोग्याबद्दलची, आजारांची भीती), सोशल anxiety (समूहामध्ये वावरण्याची भीती), पॅनिक डिसऑर्डर (भीतीचा तीव्र झटका)] यांच्याबद्दलही गेल्या भागात थोडक्यात पाहिलं .
संवाद म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर दोन जणांचं एकमेकांशी चालणारं संभाषण येतं. पण खरं तर आपला सर्वाधिक संवाद हा आपल्या स्वतःशीच सुरू असतो. आपल्या मनात येणारे विचार हाही या संवादाचाच एक भाग झाला. कधी हा संवाद विचारांच्या रूपात असतो, कधी भावनेच्या, पण तो बहुतेक सारा वेळ सुरूच असतो खरा!
मी मायबोलीवर आहे बरीच वर्षे पण वाचनमात्र आहे. पण लिहिले नाही कधी. इथे काही चांगले सल्ले दिले जातात हे वाचून आहे. सध्या एका खूप कठीण मानसिक अवस्थेतून जात आहे. त्यासंबंधी share करण्यासाठी हा आयडी/धागा काढला आहे व अनुभवींच्या मार्गदर्शनाची खूप गरज आहे.
नंदिनीची डायरी - तेव्हा आता पुढे