पुस्तक

गुप्तहेर रॉबिन आणि भूतबंगल्याचे रहस्य - भाग ४

Submitted by रुद्रसेन on 13 March, 2025 - 11:22

सकाळी रॉबिन झोपेतून उठला आणि लाडकी बाजेवर तसच आळसावलेल अंग टाकून तो उगाच पडून राहिला. हरिभाऊंच्या घराजवळच एक छोटी चूल होती त्यावर हंडा ठेवून हरिभाऊ पाणी गरम करत होते आणि खांद्यावरील पंचाने गरम हंड्याला लावून तो गरम झालेला पंचा डोक्याला लावत होते. थोडक्यातच डोक्यावरील टेंगळाला शेक देत होते. त्यांना तसं करताना पाहून रॉबिनला कालचा प्रसंग आठवला आणि हसू आवरलं नाही. हात तोंडावर धरून हरिभाऊंना ऐकू येऊ नये म्हणून खुसपुसत हसू लागला. पण त्याच्या खुसपूस करत हसण्याचा आवाज हरिभाऊंना आलाच.

विषय: 

दिठी नि:शब्द दाटे। पाऊस पाझर फुटे

Submitted by मनोज मोहिते on 24 February, 2025 - 04:47

मनोज मोहिते
पाणी वाहताना काय वाहून ते आणि पडणाऱ्या पावसाचे पाणी हाती काय देते? पाऊस पडतो, पाणी वाहते. पावसाचे पाणी वाहते राहते. ते अडते. अडखळतेही. पण मार्ग शोधून घेते. कोसळणाऱ्या पावसात मार्ग शोधता येत नाही. समोरचे नीट दिसत नाही. आतला गोंधळ संपत नाही. पावसाचे आणि पाण्याचे हे असे वागणे नेहमीचेच. त्याची सवय किती लावावी आणि त्याच्या नाद कसा सोडवावा.

विषय: 
शब्दखुणा: 

कैलास पिंगळे लिखित कादंबरी "फसकी " चा समीक्षात्मक आढावा किंवा अभ्यास

Submitted by अनुजय on 14 January, 2025 - 10:56

रायगड जिल्ह्यातील प्रसिद्ध आगरी कादंबरीकार श्री कैलास पिंगळे यांची नुकतीच प्रकाशित झालेली आणि अल्पावधीतच वाचकांच्या पसंतीस आलेली स्व.ना.ना पाटील तथा अप्पासाहेब यांनी नेतृत्व केलेल्या आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे मार्गदर्शन लाभलेल्या , ऐतिहासिक चरी शेतकरी संपावर आधारित “फसकी” ,या कादंबरीचा समिक्षात्मक आढावा:
प्रा.महेश बिऱ्हाडे अलिबाग रायगड

विषय: 
शब्दखुणा: 

शुभ्र मनाचा कागद – माझा नवीन गजलसंग्रह - लवकरच

Submitted by आनंदयात्री on 14 January, 2025 - 01:57

नमस्ते! मी नचिकेत जोशी, कधीकाळी मायबोलीवर फार अॅक्टिव होतो (माझं लेखन माझ्या प्रोफाइलमध्ये सापडेल - https://www.maayboli.com/user/1899/created).
माझी गजललेखनाची सुरुवात इथेच झाली, इतर उत्तम लिहिणाऱ्यांच्या गजल वाचून, त्यावरच्या चर्चा वाचून शिकत गेलो, त्यामुळे गजल-कवितेच्या प्रवासातल्या प्रत्येक टप्प्यावर मायबोलीची आठवण येतेच.

माझा पहिला संग्रह ‘चांदणे जागेच आहे’ २०१८ मध्ये प्रकाशित झाला. त्यानंतर आता दुसरा संग्रह ‘शुभ्र मनाचा कागद’ लवकरच येतोय. त्यासाठी ही पोस्ट.

पुस्तक ओळख - Diffusion of Innovations

Submitted by सामो on 3 January, 2025 - 08:15

- अन्यत्र पूर्वप्रकाशित-
हे अतिशय आवडलेले पुस्तक असून, जर येत्या काही दिवसात परत चाळलं तर हाच लेख संपादित करीन किंवा निदान कमेन्टसमध्ये वाचलेल्या अजुन काही केसेस लिहीन.
---------------------------------------------------------------------------

विषय: 

वेश्याव्यवसाय

Submitted by प्रकाश घाटपांडे on 2 December, 2024 - 08:36
वेश्याव्यवसाय

वेश्याव्यवसाय
मध्यंतरी अमृता फडणवीस यांनी एक सनसनाटी विधान केले. माध्यमांनी त्याला चटपटीत प्रसिद्धी ही दिली होती.

शब्दखुणा: 

कुब्र

Submitted by संप्रति१ on 21 September, 2024 - 23:27

IMG_20240915_104919~3.jpg

'कुब्र.'

'कुब्र' म्हणजे निबिड, अनाघ्रात अरण्य. हे पुस्तक अशा अरण्याचं आहे. काळवेळाचे साखळदंड विसरून, दीर्घ काळ अरण्यात राहून, निर्भार रेंगाळून झाल्यावर मनात जे समृद्ध अरण्य कायमचं वस्तीला येतं, हे त्यावर लिहिलेलं पुस्तक आहे.

विषय: 
शब्दखुणा: 

डॉ. ब्रायन वाईस ह्यांचं पुस्तक!

Submitted by मार्गी on 23 April, 2024 - 11:55

कोलंबिया युनिव्हर्सिटी आणि येल मेडिकल स्कूलचे पदवीधर आणि मियामीतील मानसशास्त्राच्या संस्थेचे अध्यक्ष असलेले डॉ. ब्रायन वाईस अतिशय तणावात असलेल्या व अस्थिर अशा कॅथरीन ह्या तरुणीवर मानसोपचार करतात. तिला होणार्‍या त्रासाचं मूळ तिच्या जीवनातल्याच काही अनुभवांमध्ये असावं असं मानून ते तिला बोलतं करतात. तिने अधिक बोलतं व्हावं आणि हलकं व्हावं म्हणून ते तिला ट्रान्समध्ये नेतात आणि तिच्या आठवणी सांगायला सांगतात. कॅथरीन तिचे अनुभव- आठवणी सांगत जाते. थेरपीचे काही सेशन्स होऊनही तिची अस्थिरता थांबत नाही. म्हणून डॉ. वाईस तिला आणखी लहानपणीचे अनुभव विचारतात.

पॉलीअनाची कथा

Submitted by केशवकूल on 16 April, 2024 - 23:44

मित्रांनो मी अलीकडेच एक कथा वाचली. ती मला एव्हढी भावली की वाटलं कि ह्या कथेची माबोकरांना ओळख करून द्यावी. म्हणून हा लेख,
१९१३ साली अमेरिकन लेखिका एलेनोर पोर्टर ह्यांनी “पॉलीअनाची कथा” नावाची कादंबरी लिहिली. ही पॉलीअना नावाच्या तेरा वर्षाच्या अनाथ बालिकेची आणि तिच्या “शाश्वत आनंदा”च्या खेळाची कथा आहे. ह्या कथेने जनमानसाची एव्हढी पकड घेतली की अमेरिकेत ठिकठीकाणी ह्या कथेत सांगितलेल्या तत्वज्ञानावर आधारित “आनंदी क्लब” सुरु झाले. ह्या क्लबातून पॉलीअना चा सुप्रसिद्ध खेळ खेळला जाऊ लागला.

विषय: 

काही वाचननोंदी

Submitted by संप्रति१ on 31 March, 2024 - 14:48

१. आधी माझ्याकडे पेंडींग पुस्तकं नसायची. लायब्ररीतून आणायचो, वाचून झाली की परत दुसरी आणायचो.‌ पण मग हळूहळू हावरटासारखा स्टॉक करायच्या मागं लागलो. दिसलं, चांगलं वाटलं की आणायचं. वाट बघायला नको, हक्काचं आपल्याजवळ असलं की हवं तेव्हा वाचू शकतो, हे समर्थन.‌

Pages

Subscribe to RSS - पुस्तक