पुस्तक
हॉरसशू क्रॅबस अँड शू बर्ड्स - पुस्तक परिचय
रिचर्ड बर्टन
"रिचर्ड बर्टन" एक अद्भुत अवलिया पुरुष. आपल्या पैकी अनेकांनी थोड्याफार प्रमाणात वास्को द गामा, कोलंबस, युआंग शुआंग, हरून अल रशिद या मातब्बर मंडळी बद्दल थोडाफार वाचलं किंवा काहीतरी ऐकलं असेलच. याच पठडीतील इंग्लंडमधील "रिचर्ड बर्टन" एक अद्भुत अवलिया पुरुष. विशेष म्हणजे याची महाराष्ट्राला प्रथम ओळख करून दिली ते आपले सह्याद्रीकार श्री. सदाशिव आत्माराम जोगळेकर यांनी. याच जोगळेकरांना दिलेला शब्द पाळत श्री. बाळ सामंत यांनी अनेक वर्ष प्रचंड अभ्यास तसेच देशा परदेशात ठिक ठिकाणी भेटी देऊन रिचर्ड बर्टन चे चरित्र या "शापित यक्ष" या पुस्तकात अतिशय ओघवत उत्तमरित्या रंजक शैलीत सादर केले आहे.
चक्रम माणसाशी कसे वागावे?
समाजात वावरताना आपण काही माणसांशी संपर्क किंवा संवाद शक्यतो टाळण्याचा प्रयत्न करतो. ती माणसे आपली शत्रू असतातच अशातला भाग नाही. पण ती माणसे unpredictable असतात. आपल्याला ती कसा प्रतिसाद देतील याचा आपल्याला अंदाज नसतो. मग कशाला आ बैल मुझे मार करा. उगीच स्वत:चा अपमान करुन घ्यायला कुणी सांगितलय? असा विचार त्यामागे असतो. एका अर्थाने आपण त्यांना घाबरत असतो. आपण त्यांना विक्षिप्त किंवा तर्हेवाईक म्हणतो. किंवा सोप्या भाषेत चक्रम म्हणतो. खर तर आपण देखील काहीबाबतीत काही वेळा चक्रमपणा करत असतो. पण तो आपल्या लक्षात येतोच अशातला भाग नाही. कधीकधी काही चक्रम माणसे आपल्याबरोबर आपल्या घरातच राहत असतात.
`लेखक-प्रकाशक संवाद!`
नमस्कार!
मायबोलीवर लिहिण्याची ही माझी पहिलीच वेळ आहे. माझा वरील विषयावरील चिपळूण येथे आयोजित दुसऱ्या लेखक-प्रकाशक संमेलन प्रसंगी प्रकाशित होणाऱ्या स्मरणिकेसाठी मी लिहिलेला लेख येथे देत आहे.
`लेखक प्रकाशक संवाद` या विषयावर मला चिपळूणहून लेख लिहून मागितला गेला, आणि हा विषय माझ्या अगदी हृदयाच्या जवळचा असल्याने, असे लिहिण्याचा सराव नसतानाही हा लेख लिहिला गेला.
आमची पुण्याला `मधुश्री प्रकाशन` ही प्रकाशन संस्था आहे. गेली ४३ वर्षे अगदी मनापासून साहित्य सेवा करत असताना जर मधुश्रीची कोणती ताकद असेल तर ते म्हणजे आमचे लेखक!
’दुर्दम्य’ - गंगाधर गाडगीळ. राजकारणाच्या विद्यापीठाबद्दल!
'राजकारण' या एकूणच विषयाबद्दल काहीशी नकारात्मक आणि परकेपणाची भावना घेऊन जन्माला आलेल्या आणि बहुतांश आयुष्य़ जगलेल्या एका पिढीत आणि वर्गात आपल्यातील बर्याच जणांचा समावेश होतो. आपण ज्यांना खरोखर आदर्श ’नेता’ किंवा ’पुढारी’ म्हणून ओळखत होतो आणि अजूनही ओळखतो ते सारे आपल्या जन्माच्या कैक वर्षे आधीच निवर्तलेले होते किंवा त्यातले थोडके आपल्या बालपणीच संपून गेले. आपल्या पुढे ’राजकारण’ या क्षेत्रातला आदर्श म्हणावे असे खरे पाहता कुणीच हयात स्थितीत नव्हते.
पुस्तक परिचय - काचेपलीकडचे जग
“मायाळू धनेशाचे गुपित”: पुस्तक परिचय: लेखक - डॉ. दिलीप सावरकर.
पुस्तक: “मायाळू धनेशाचे गुपित”
पुस्तक लेखक: डॉ. राजू कसंबे.
प्रकाशक: साहित्य प्रसार केंद्र, नागपुर.
पृष्ठे: ९०.
मूल्य: रु.१२०/-
पहिली आवृत्ती: ८ नोव्हेंबर २०१८.
पुस्तक परिचय: डॉ. दिलीप सावरकर, नागपूर.
(टिप: माझ्या पुस्तकाचा डॉ. दिलीप सावरकर, नागपूर ह्यांनी लिहिलेला परिचय येथे त्यांच्या नावासहित पोस्ट करतो आहे.).
कासवांचे बेट – ‘गालापगोस’ बेटांची अद्भुत सफर
“कासवांचे बेट – ‘गालापगोस’ बेटांची अद्भुत सफर”
संवाद
आपल्या आजूबाजूला अनेक बरेवाईट प्रसंग आपण पाहत असतो. प्रत्येक गोष्टीकडे पाहताना आपले स्वतःचे असे वेगळे मत असते. अगदी छोटे छोटे प्रसंग घरातून ऑफिससाठी बाहेर पडताना रस्त्यावरती दिसणारे एखादे मरायला टेकलेले कुत्रे आपण पाहिले, तर त्यासाठी दोन मिनिट सुद्धा थांबण्यासाठी आपल्याकडे नसतात. आपण पुढे जातो परंतु कुठेतरी त्याचा विचार मनात येत राहतो. अशा अनेक घटना आपल्या आजूबाजूला घडत असतात आणि त्याचे बरेवाईट पडसाद आपल्या मनावर उमटत जातात. कधी आपलं मन निडर होत जातं . संवेदना बोथट होत जातात किंवा कधी अगदी हळवं होतं आणि दोन दोन दिवस आपण या गोष्टींचा विचार करत राहतो.
Pages
