चक्रम माणसाशी कसे वागावे?

Submitted by प्रकाश घाटपांडे on 20 April, 2020 - 02:26

समाजात वावरताना आपण काही माणसांशी संपर्क किंवा संवाद शक्यतो टाळण्याचा प्रयत्न करतो. ती माणसे आपली शत्रू असतातच अशातला भाग नाही. पण ती माणसे unpredictable असतात. आपल्याला ती कसा प्रतिसाद देतील याचा आपल्याला अंदाज नसतो. मग कशाला आ बैल मुझे मार करा. उगीच स्वत:चा अपमान करुन घ्यायला कुणी सांगितलय? असा विचार त्यामागे असतो. एका अर्थाने आपण त्यांना घाबरत असतो. आपण त्यांना विक्षिप्त किंवा तर्‍हेवाईक म्हणतो. किंवा सोप्या भाषेत चक्रम म्हणतो. खर तर आपण देखील काहीबाबतीत काही वेळा चक्रमपणा करत असतो. पण तो आपल्या लक्षात येतोच अशातला भाग नाही. कधीकधी काही चक्रम माणसे आपल्याबरोबर आपल्या घरातच राहत असतात. त्यामुळे आपल्याला त्यांच्याशी मिळतेजळते घेऊन जीवन जगावयाचे असते. परंतु आपल्या घरातील व घराबाहेरील चक्रम मंडळींशी कसे वागावे आणि जमल्यास त्यांना स्वतःच्या चक्रमपणावर मात करण्यास कशा प्रकारे साहाय्य करावे, यासंबंधी आपल्याला कोणी कधी मार्गदर्शन केलेले नसते. हल्ली काही विवेकनिष्ठ उपचार पद्धतीचे सेशन्स काही मानसोपचार क्षेत्रातील संस्था घेतात. पण ते तितक सार्वत्रिक अजून नाही.
वरील अडचण विचारात घेऊन, सुविख्यात अमेरिकी मानसोपचारतज्ज्ञ व विवेकनिष्ठ मानसोपचारशास्त्राचे जनक डॉ. अल्बर्ट एलिस यांनी एक उपयुक्त पुस्तक लिहिले आहे. त्या पुस्तकाचे नाव आहे : How to Live with a "Neurotic": At Home and at Work, Revised Edition, 1975. त्या आगळ्या-वेगळ्या पुस्तकाचे मराठी रूपांतर सायकॉलॉजिस्ट कि.मो. फडके यांनी केले आहे. चक्रम माणसाशी कसे वागावे? ते अल्बर्ट एलिस च्या संपर्कात पत्रव्यवहारातून दीर्घकाळ होते.आता मानसशास्त्रात वेगाने संशोधन होत आहे. त्या विषयी लिखाण, व्हिडीओ आता अनेक लोक करु लागले आहेत. लोकांनाही सायकियाट्रिस्ट गरजेचा वाटू लागला आहे. या संबंधीत संस्थाही आता वाढू लागल्या आहेत. हे जागृतीचे लक्षण आहे. हे पुस्तक वाचून प्रदीर्घ काळ लोटला. आता माझ्या संग्रही ते नाही.
पुसतकाचे नांव- चक्रम माणसाशी कसे वागावे?
मूळ लेखक – अल्बर्ट एलिस
मराठी रुपांतर- कि.मो.फडके.
प्रकाशक – त्रिदल प्रकाशन
तृतीय आवृत्ती -1996
मूल्य -120/-

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मजेशीर आहे.मला वाटलेले चर्चेचा धागा की काय.. पण अश्या विषयावर पुस्तकही आहे Happy

अवांतर - आपणच चक्रमसारखे जगावे. आणि चक्रम माणसाशी कसे वागावे असले प्रश्न जगाला पडू द्यावे

अवांतर - आपणच चक्रमसारखे जगावे. आणि चक्रम माणसाशी कसे वागावे असले प्रश्न जगाला पडू द्यावे

Submitted by ऋन्मेऽऽष on 20 April, 2020 - 15:47>>
+1
त्या चक्रम व्यक्तीच्या वरताण चक्रमपणा आपणच करावा

अवांतर - आपणच चक्रमसारखे जगावे. आणि चक्रम माणसाशी कसे वागावे असले प्रश्न जगाला पडू द्यावे

Submitted by ऋन्मेऽऽष on 20 April, 2020 - 15:47>>
+1
त्या चक्रम व्यक्तीच्या वरताण चक्रमपणा आपणच करावा

हम्. पुस्तक ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद.
मला वाचायला आवडेल हे पुस्तक.

अवांतर - आपणच चक्रमसारखे जगावे. आणि चक्रम माणसाशी कसे वागावे असले प्रश्न जगाला पडू द्यावे>>> मग चक्रम माणसाने चक्रम माणासाशी कसे वागावे असे एखाद्या चक्रम मानसशास्त्रज्ञाला पुस्तक लिहावे लागेल. Happy

चक्रम माणूस सगळ्यांशी चक्रमपणेच वागतो. त्याला फरक पडत नसावा की समोरचा माणूस नॉर्मल आहे की चक्रम.

चक्रम माणूस सगळ्यांशी चक्रमपणेच वागतो. त्याला फरक पडत नसावा की समोरचा माणूस नॉर्मल आहे की चक्रम.

चक्रम माणूस सगळ्यांशी चक्रमपणेच वागतो. त्याला फरक पडत नसावा की समोरचा माणूस नॉर्मल आहे की चक्रम.>>> तू एक चक्रम तर मी सात चक्रम असे तो म्हणत असेल. Happy

चक्रम शेजारी, बॉस, सबोर्डीनेट , माता, पिता, भावंड, अपत्य इत्यादि, जे दीर्घकाळ नेहमीच्या संपर्कात असतात यापैकी कुणाशी चक्रमपणेच वागून समस्या सोडवली याच्या यशोगाथाही येऊ द्या.

अशा धाग्यांना काही अर्थ नाही. जेव्हा एक आयडी 'चक्रम माणूस' या नावाने येथे चक्रमपणा करत होता तेव्हा समजले कोण कसे वागले ते. आता त्यावर वेगळे काही बोलणार असतील लोक्स तर ते विनोदी दिसेल. कैच्या कै दिसेल.

चक्रमपणेच वागून समस्या सोडवली याच्या यशोगाथाही येऊ द्या.
>>>>

चक्रमपणे वागण्यातून आनंद लुटायचा असतो. सम्स्या सोडवणे वगैरे उदात्त हेतू कश्याला उगाच त्यासोबत जोडा Happy

लेखक स्वत: चक्रम आहे ( म्हणजे या धाग्याचा नाही, मूळ लेखक) अशी सुरवात या पुस्तकात केली आहे. त्यामुळे चक्रम वाचकांनाही लेखक आपल्या जातकुळीचा वाटतो व लेखक वाचक संवाद सुरस होतो.