पुस्तक
Gone With The Wind जेव्हा गारूड करतं...
आठवतंय तेव्हापासून या पुस्तकाचं वर्णन ’स्कार्लेट ओ’हेरा आणि र्हेट बटलरची प्रेमकथा’ असंच वाचण्यात आलं होतं. प्रेमकथा म्हटलं की आपल्या डोक्यात काही basic ठोकताळे तयार असतात. पुस्तकाची पहिली १००-१२५ पानं वाचून झाली तरी त्यातलं फारसं काही कथानकात येत नव्हतं. त्याचंही इतकं काही नाही, पण (narration ला एक छान लय असूनही) त्या शंभर-एक पानांमध्ये हळूहळू कंटाळाही यायला लागला. ५००+ पानांचं पुस्तक कसं काय पूर्ण करणार, असा प्रश्न पडायला लागला. (Kindle वर ५००+ पानांची आवृत्ती मिळाली होती.)
कोसला वगैरे ...
'हे वाच' 'हे वाच' म्हणून बर्याच जणांनी जिच्याबद्दल सांगितलंय, ती 'कोसला' वाचून डिप्रेशन वगैरे येतं काय रे ?
मी माझ्यापुरतं सांगू शकतो...
म्हणजे मी 'कोसला' पहिल्यांदा वाचली होती तेव्हा त्यातला काही काही भाग अजिबातच झेपला नव्हता,
कारण मीच तेव्हा कोवळा वगैरे होतो..
मग कधीतरी नंतर अशीच एकदा वाचली.. चमकलो...!
मग काही काळानंतर पुन्हा वाचली.. हादरलो..!
मग आणखी एकदा वाचली... मग पुन्हा एकदा वाचली... कधी मेंदूला झिणझिण्या आणत वाचली...
कधी मजा लुटत वाचली..
एकदा तर शिव्या घालत वाचली .. पण वाचली..!
The Great Game -१
(हा ग्रेट गेम पुस्तकाचा परिचय़ आहे. परिचय करुन देताना प्रत्यक्षात ग्रेट गेम म्हणजे नक्की काय होते तेही सांगण्याचा प्रयत्न केला आहे. हा शंभराहून अधिक वर्षाचा इतिहास आहे म्हणूनच दोन भागात हा पुस्तक परिचय देत आहे.)
पुस्तक : The Great Game
लेखक : Peter Hopkirk
ठेहराव..
सप्तरंगी कावळा
हॉरसशू क्रॅबस अँड शू बर्ड्स - पुस्तक परिचय
रिचर्ड बर्टन
"रिचर्ड बर्टन" एक अद्भुत अवलिया पुरुष. आपल्या पैकी अनेकांनी थोड्याफार प्रमाणात वास्को द गामा, कोलंबस, युआंग शुआंग, हरून अल रशिद या मातब्बर मंडळी बद्दल थोडाफार वाचलं किंवा काहीतरी ऐकलं असेलच. याच पठडीतील इंग्लंडमधील "रिचर्ड बर्टन" एक अद्भुत अवलिया पुरुष. विशेष म्हणजे याची महाराष्ट्राला प्रथम ओळख करून दिली ते आपले सह्याद्रीकार श्री. सदाशिव आत्माराम जोगळेकर यांनी. याच जोगळेकरांना दिलेला शब्द पाळत श्री. बाळ सामंत यांनी अनेक वर्ष प्रचंड अभ्यास तसेच देशा परदेशात ठिक ठिकाणी भेटी देऊन रिचर्ड बर्टन चे चरित्र या "शापित यक्ष" या पुस्तकात अतिशय ओघवत उत्तमरित्या रंजक शैलीत सादर केले आहे.
चक्रम माणसाशी कसे वागावे?
समाजात वावरताना आपण काही माणसांशी संपर्क किंवा संवाद शक्यतो टाळण्याचा प्रयत्न करतो. ती माणसे आपली शत्रू असतातच अशातला भाग नाही. पण ती माणसे unpredictable असतात. आपल्याला ती कसा प्रतिसाद देतील याचा आपल्याला अंदाज नसतो. मग कशाला आ बैल मुझे मार करा. उगीच स्वत:चा अपमान करुन घ्यायला कुणी सांगितलय? असा विचार त्यामागे असतो. एका अर्थाने आपण त्यांना घाबरत असतो. आपण त्यांना विक्षिप्त किंवा तर्हेवाईक म्हणतो. किंवा सोप्या भाषेत चक्रम म्हणतो. खर तर आपण देखील काहीबाबतीत काही वेळा चक्रमपणा करत असतो. पण तो आपल्या लक्षात येतोच अशातला भाग नाही. कधीकधी काही चक्रम माणसे आपल्याबरोबर आपल्या घरातच राहत असतात.
`लेखक-प्रकाशक संवाद!`
नमस्कार!
मायबोलीवर लिहिण्याची ही माझी पहिलीच वेळ आहे. माझा वरील विषयावरील चिपळूण येथे आयोजित दुसऱ्या लेखक-प्रकाशक संमेलन प्रसंगी प्रकाशित होणाऱ्या स्मरणिकेसाठी मी लिहिलेला लेख येथे देत आहे.
`लेखक प्रकाशक संवाद` या विषयावर मला चिपळूणहून लेख लिहून मागितला गेला, आणि हा विषय माझ्या अगदी हृदयाच्या जवळचा असल्याने, असे लिहिण्याचा सराव नसतानाही हा लेख लिहिला गेला.
आमची पुण्याला `मधुश्री प्रकाशन` ही प्रकाशन संस्था आहे. गेली ४३ वर्षे अगदी मनापासून साहित्य सेवा करत असताना जर मधुश्रीची कोणती ताकद असेल तर ते म्हणजे आमचे लेखक!