'हे वाच' 'हे वाच' म्हणून बर्याच जणांनी जिच्याबद्दल सांगितलंय, ती 'कोसला' वाचून डिप्रेशन वगैरे येतं काय रे ?
मी माझ्यापुरतं सांगू शकतो...
म्हणजे मी 'कोसला' पहिल्यांदा वाचली होती तेव्हा त्यातला काही काही भाग अजिबातच झेपला नव्हता,
कारण मीच तेव्हा कोवळा वगैरे होतो..
मग कधीतरी नंतर अशीच एकदा वाचली.. चमकलो...!
मग काही काळानंतर पुन्हा वाचली.. हादरलो..!
मग आणखी एकदा वाचली... मग पुन्हा एकदा वाचली... कधी मेंदूला झिणझिण्या आणत वाचली...
कधी मजा लुटत वाचली..
एकदा तर शिव्या घालत वाचली .. पण वाचली..!
अजूनही अधूनमधून मी, मदतीच्या आशेनं म्हण किंवा स्वत:चीच चेष्टा करायचा मूड आल्यावर म्हण, 'कोसला'कडे जातो सवडीनं..
तरीही ह्या 'सिनीकल' पांडुरंग सांगवीकरचा पूर्ण कंटाळा आलाय किंवा त्याच्याशी आता पूर्ण ओळख झालीय, असा काही दावा करू शकत नाही.
जसजसा मूड असेल तसतसा 'कोसला' चाळायला सुरूवात करतो अधूनमधून...
बर्याच पानांवर बर्याच वेळा हमखास गुदगुल्या होतात..
काही ठिकाणी खोलवरचं सुखही होतं..
तर काही काही वेळेस असं होतं, की सांगवीकरचे काही
दुधारी प्रश्र्न, काही विधानं अक्षरशः जीव कोंदवून टाकतात... अंगावर येतात..
उदाहरणार्थ त्यातला काही भाग, विशेषतः
बुद्ध-लेण्यांसंदर्भातला आणि कादंबरीच्या शेवटाकडे,
सांगवीकर आणि गिरीधरचे काही संवाद आहेत, ते मला फारच 'हाँटींग' वाटलेले आहेत.. म्हणजे भोवंडायला झालेलं आहे कधी कधी.. आणि मी स्कीप करून टाकलं आहे ते..
किंवा कधी उलटही होतं, म्हणजे कोपच्यात अडकल्यासारखं वाटायला लागलेलं असतं,
आणि मी मधूनच कुठूनतरी 'कोसला' वाचायला सुरूवात केलेली असते आणि मूड आपोआप निवळत गेलेला असतो...
हीच खरंतर 'कोसला'ची जादू किंवा स्ट्रेंथ आहे...
किंवा वीकनेसही म्हण हवं तर...की 'कोसला' सगळ्यांसाठी सेमच असेल, असं काही नाही..
किंवा एकाच माणसालासुद्धा, सर्वकाळ सेमच फिलींग देईल, अशीही काही गॅरेंटी नाही...
कारण असं पहा की शेवटी तो एक 'कोश' आहे..
कोशात जाण्याचेही काही दिवस असतात..
कोशातच राहण्याचेही काही दिवस असतात..
वेगवेगळ्या मार्गांनी त्या कोशात शिरून बघायचेही काही दिवस असतात... आणि त्यातून सूर मारून बाहेर पडायला एखादी सुंदर फट सापडते का, ह्याचा शोध घेत राहण्याचेही काही दिवस असतात..
कोशाचं काय..! आणि दिवसांचं काय..! येत जात राहतात.. तो काई विषय नाही.
पण माझं हे 'कोसला'बरोबरचं लव्ह-हेट रिलेशनशिप
अजूनतरी चालू आहे ... आणि मी ते एंजॉयही करतो..!
तर मुद्दा असा की.. वरच्या प्रश्नानं दचकून जाऊन जर 'कोसला' साईडींगला टाकलीस, तर एका फार चांगल्या
पुस्तकाला मुकशील..!
अर्थात तसा काही फारसा पडत नाही म्हणा..!
कारण 'कोसला'कारांच्याच शब्दांत सारांश सांगायचा तर..
"आपापली वर्षं पुढे अचूक शिल्लक असतातच..
ती वगैरे काही कमावता येत नाहीत...तेव्हा गमावली वगैरे म्हणणं उदाहरणार्थ इतकं बरोबर नाही...किंवा वर्षं अत्यंत वाया गेली, असं म्हणणं उदाहरणार्थ चूक आहे...म्हणजे बरोबरच.."
मनापासून लिहिलं आहे, आवडले!
मनापासून लिहिलं आहे, आवडले!
छान लिहिलंय.. आवडलं..
छान लिहिलंय.. आवडलं..
हीच खरंतर 'कोसला'ची जादू किंवा स्ट्रेंथ आहे...
किंवा वीकनेसही म्हण हवं तर...की 'कोसला' सगळ्यांसाठी सेमच असेल, असं काही नाही..
किंवा एकाच माणसालासुद्धा, सर्वकाळ सेमच फिलींग देईल, अशीही काही गॅरेंटी नाही...>>>अगदी अगदी..
वैगेरे वैगेरे शिवाय लेख अपूर्ण राहिला असता... हे ही तितकंच खरं..
धन्यवाद टवणे सर.. :-)... _/\_
धन्यवाद टवणे सर..
... _/\_
@मन्या.. धन्यवाद
@मन्या.. धन्यवाद
लेख सुंदर लिहिलाय, आवडला.
लेख सुंदर लिहिलाय, आवडला.
पण कोसला तितकीशी आवडली नव्हती, शेवटी तर कंटाळा आला. पूर्ण वाचायचीच म्हणून नेट लावून संपवली एकदाची.
भारी लिहिले आहे.
भारी लिहिले आहे.
@ साधना .. @ जव्हेरगंज ..
@ साधना .. @ जव्हेरगंज .. धन्यवाद..
पण माझं हे 'कोसला'बरोबरचं
पण माझं हे 'कोसला'बरोबरचं लव्ह-हेट रिलेशनशिप
अजूनतरी चालू आहे ... आणि मी ते एंजॉयही करतो..! >>
+१
Kosla mi hi vachliay..
Kosla mi hi vachliay.. pahilyanda kahich kalale nahi.. punha ekda 10 varshanantar vachali tevha.. chhan vaatali..
https://www.maayboli.com/node
https://www.maayboli.com/node/17147
पण कोसला तितकीशी आवडली नव्हती
पण कोसला तितकीशी आवडली नव्हती, शेवटी तर कंटाळा आला. पूर्ण वाचायचीच म्हणून नेट लावून संपवली एकदाची.
>>>> +१