Gone With The Wind जेव्हा गारूड करतं...
आठवतंय तेव्हापासून या पुस्तकाचं वर्णन ’स्कार्लेट ओ’हेरा आणि र्हेट बटलरची प्रेमकथा’ असंच वाचण्यात आलं होतं. प्रेमकथा म्हटलं की आपल्या डोक्यात काही basic ठोकताळे तयार असतात. पुस्तकाची पहिली १००-१२५ पानं वाचून झाली तरी त्यातलं फारसं काही कथानकात येत नव्हतं. त्याचंही इतकं काही नाही, पण (narration ला एक छान लय असूनही) त्या शंभर-एक पानांमध्ये हळूहळू कंटाळाही यायला लागला. ५००+ पानांचं पुस्तक कसं काय पूर्ण करणार, असा प्रश्न पडायला लागला. (Kindle वर ५००+ पानांची आवृत्ती मिळाली होती.)