चित्रपट
जानी दुश्मन - अनेक लग्नांची एक गोष्ट (संपूर्ण)
हम आपके है कौन ही एका लग्नाची कॅसेट असेल तर जानी दुश्मन ही अनेक लग्नांची कॅसेट आहे. यात किमान ८ लग्नं आहेत. फरक इतकाच की हआहैकौ मधे एकाच लग्नात खूप गाणी वाजतात आणि इथे एकच गाणं सगळ्या लग्नांत. शिवाय हा चित्रपट स्थळकाळाच्या मर्यादा ओलांडून गेला असून यात पॅरलल युनिव्हर्सची संकल्पना पण मांडली गेली आहे. राजकुमार कोहलीला आद्य सायफाय मूव्हीमेकर असं सर्टिफिकेट मिळावं याची मी शिफारस करते.
काही सिनेमा नोंदी
१. 'April '. जॉर्जिया.
एक गायनॅकोलॉजिस्ट आहे. डिलीव्हरीच्या दरम्यान एका बाळाचा मृत्यू होतो. हॉस्पिटलकडून हिच्यावर चौकशी कमिटी बसते. या चौकशीच्या सेशन्सच्या वेळी मागं सतत घड्याळाची तणावपूर्ण टिकटिक ! ती टिकटिक काढून टाकली असती तर या सेशन्स दरम्यानचा निम्मा इंपॅक्ट कोसळला असता. ही चौकशी एका बाजूला चाललेली आहे आणि दुसऱ्या बाजूला तिचं तिचं आयुष्य चाललेलं आहे.
चित्र(वि)चित्र बकेट लिस्ट
डोळे मिटण्याआधी (जग बघून घ्यावंच्या चालीवर) आजूबाजूच्या लोकांकडून ऐकलेले, वाचलेले सिनेमे युट्यूब आणि ओटीटीच्या कृपेने बघून घ्यायचे आहेत. ( तो सर्वोत्कृष्ट किंवा कलात्मकच असला पाहीजे असं अजिबात नाही. )
आयुष्यात अमूक तमूक गाजलेला पिक्चर पाहिलाच नाही असं व्हायला नको. ( पुस्तकप्रेमी अशी यादी बनवत असतात).
त्या त्या वर्षी / दशकात गाजलेल्या सिनेमांची अशी यादी बनवायला घेऊयात. इथे काही नावे आठवतील तशी दिली आहेत. प्रतिसादात भर घालावी.
( लगेचच बघितले का अशी चौकशी करू नये. ही यादी आहे फक्त. आपण रेसिपी लिहून घेतो पण सगळ्या बनवत नाही तशी)
१. प्यासा
प्रितम आन मिलो
छावा!
बुऱ्हाणपूरच्या हल्ल्यापासून चित्रपटाची सुरुवात होते. अतिशय वेगवान असा हा चित्रपट अनेक घटनांना, मुद्द्यांना स्पर्श करत अखेर छत्रपती संभाजी महाराजांच्या पाशवी हत्येने समाप्त होतो.
क्रौर्याची परिसीमा गाठकलेला औरंगजेब त्यांना मुसलमान बनण्याची ऑफर देतो, तेव्हा अंगाखांद्यावर केलेल्या नखशिखान्त जखमा, त्या जखमांवर मीठ चोळल्यामुळे होणाऱ्या असह्य वेदना, उपटलेली नखं या अवस्थेतही संभाजी राजे त्याला जे उत्तर देतात त्याने औरंगजेब सटपटतो. संभाजी राजांचे धैर्य, पराक्रम आणि शौर्य अचंबित करून टाकते आणि चित्रपट शेवटपर्यंत तुम्हाला खुर्चीला खिळवून ठेवतो.
चित्रपटाचा शेवट तुम्हाला कसा आवडेल?
बरेचदा असे होते की एखादा चित्रपट संपल्यावर असे वाटते की याचा शेवट वेगळा असता तर जास्त आवडलं असतं.
उदाहरणार्थ - ' शोले ' चित्रपटाच्या शेवटी अमिताभ मरायला नको होता असं मला वाटतं. किंवा ' ताल ' चित्रपटाच्या शेवटी ऐश्वर्याने कोणाशीच लग्न करायला नको होतं - कितीही असलं तरी अक्षयने तिचा आणि तिच्या वडिलांचा अपमान केलेला असतोच. किंवा मग ' रंग दे बसंती ' च्या शेवटी त्यांना मारून टाकलं असं न दाखवता लोकांनी त्यांना वाचवलं असं काहीतरी दाखवायला हवं होतं.
असे अजून कित्येक पिक्चर असतील ज्यांचा शेवट वेगवेगळ्या प्रकाराने जास्त आवडला असता. तुमच्या मनात आहेत का असे काही वेगळे शेवट?
आसमान से ऊंचा
मुलाखतकार: सुजितजी चित्रपटाचे निर्माते या भूमिकेतून आमच्या वाचकांना काय सांगाल?
होम
पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव - २०२५
इथे या फेस्टिव्हलसंबंधी थोडी माहिती/अनुभव शेअर करत आहे.
एक डिस्क्लेमर म्हणजे, ही माहिती वैयक्तिक अनुभवावर आधारलेली असल्याने सगळ्यांना लागू पडेलच, असं नाही.
यासंबंधी आणखी कुणी जाणकार असतील तर यामध्ये भर घालू शकतील, किंवा सुधारणा करू शकतील.
१. यंदा हा फेस्टिवल १३ फेब्रुवारी ते २० फेब्रुवारी दरम्यान आहे. कॅंपातील आयनॉक्समध्ये, सेनापती बापट रोडवरच्या पीव्हीआर पॅव्हेलियनमध्ये आणि औंधमधल्या सिनेपोलिसमध्ये हा फेस्टिवल होणार आहे.
Pages
