"क्लर्क"
मनोज कुमार, रेखा, शशी कपूर, अनिता राज, प्रेम चोपडा, अशोक कुमार, सतीश शहा, दीना पाठक.
सुरूवातीला ही सगळी नावं स्क्रीनवर ओळीनं उमटतायत. बॅकग्राऊंडला "मैंss कलर्क हूॅंss" हे गाणं चाललेलंय.
मनोज संरक्षणमंत्रालयात क्लर्क आहे. प्रामाणिक आहे. वक्तशीर आहे. रोज वेळेआधी कामावर जायचं. मन लावून सिगरेटी ओढायच्या. आणि मग खऱ्या टाईमपासला हात घालायचा. असं साधारण रूटीन आहे त्याचं.
भारतात चित्रपट चालण्याची अनेक कारणे आहेत.
त्यामधे ७० च्या दशकात संवादफेक आणि संवाद लेखन या कारणाची भर पडली. तसेच भावनेला हात घालणारे / हाय व्होल्टेज ड्रामा असलेले काळजीपूर्वक लिहीलेले सीन्स यांचीही भर पडली. कित्येकदा असा सीन क्रमाक्रमाने नाट्य खुलवत नेतो, व्होल्टेज वाढतं तसं काळजाचे ठोके वाढू लागतात आणि यावर वरताण म्हणून एखादा खंग्री डायलॉग येतो (खंग्री शब्द माबोवरूनच उचलला आहे).
एकदा हॉस्टेल वर दोन मुलं रात्री उशिरा आली. सीनियर पोरांनी विचारलं उशीर का झाला?"
त्यातला एक जण म्हणाला "शोले बघायला गेलो होतो"
पुन्हा सीनीयरने विचारलं "का ?"
दुसरा मुलगा म्हणाला " अजून पाहिलेला नाही म्हणून गेलो होतो"
तर त्या सीनीयरने उठाबशा काढायला लावल्या.
म्हणाला " शोले किती वेळा पाहिला एव्हढंच सांगायचं होतं. अजून पाहिला नाही हे सांगायला लाज वाटत नाही का ?"
तात्पर्य शोले हा असा सिनेमा आहे कि कधीही बघा, कुठूनही बघा, त्यात गुंतून जातो आपण.
असे अन्य काही हिंदी, इंग्लीश, मराठी सिनेमे असतील तर लिहा.
राकेश रोशनने पुत्रप्रेमापोटी कोई मिल गया हा चित्रपट बनवला. हा चित्रपट साय फाय आहे असा दावा त्याने ठोकल्याने आणि अन्य कुणी तसा प्रयत्नही केलेला नसल्याने तसेच कुणाला त्यात इंटरेस्ट नसल्याने आणि त्याच्या दाव्यावर कुणालाही आक्षेप नसल्याने दोन गोष्टी झाल्या.
१. कोई मिल गया हा साय फाय चित्रपट आहे हा दावा बिनविरोध निवडून आला.
२. हा चित्रपट भारतातला पहिलाच साय फाय चित्रपट आहे आणि तो बनवल्याचा बहुमान राकेश रोशनला मिळाला.
सुभेदार पाहिला. आजकाल जवळपास सर्वच चित्रपट तांत्रिकदृष्ट्या खूपच पुढे गेलेले आहेत. ती बाजू सांभाळणारे जे कोणी तंत्रज्ञ, कलाकार इत्यादी आहेत त्यांना मानलेच पाहिजे. सिनेमॅटोग्राफर, कला दिग्दर्शक, स्पेशल इफेक्ट तंत्रज्ञ, एडिटिंग करणारे इत्यादी सर्वांनी या चित्रपटात खूप मेहनत घेऊन एक भव्यदिव्य चित्रपट साकारला आहे. आजकाल सेट्स तर सगळे एकदम चकाचक फाईव्ह स्टार असतात. नितीन देसाईंच्या काळात भव्यदिव्य आणि त्याचसोबत बारकावे टिपणाऱ्या कलादिग्दर्शनाचा पायंडा पडला आहे. मानलेच पाहिजे. यासाठी हा चित्रपट नक्कीच पाहण्यासारखा आहे. विशेषतः मध्यंतरानंतरचा चित्रपट.
गदर + सनी पाजी
बस ! ही दोनच नावं पुरेशी होती पब्लीकला थेटरमधे खेचून आणण्यासाठी. आणि पब्लिक पण मिरवणुकीने आलं.
हिंदी फिल्म इंडस्ट्रीचा खरा खुरा अॅक्शनस्टार सनी भरात असताना सगळे त्याच्या पुढं किरकोळ वाटत होते. डोनाल्ड ट्रंप म्हणालेच होते
सनी पाजी अंगार है, बाकि सब भंगार है !
तुमच्या मते बॉलीवूड, टॉलीवूड, मॉलीवूड, कॉलीवूड मधल?/ मधली बेस्ट डान्सर कोण ?
आजवरचं भारतीय चिसृष्टीतल बेस्ट कोरीओग्राफ केलेलं आयटम सोंग कुठलं ?
श्रीदेवी यांच्या साठाव्या वाढदिवसानिमित्त गुगलने डुडल बनवून त्यांचा वाढदिवस साजरा केला आहे. गुगलने डुडल बनवण्याचा बहुमान थोड्याच व्यक्तींना मिळतो. त्यात श्रीदेवीचा समावेश व्हावा ही भारतीय चित्रपट रसिकांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला नसता तर त्यांची सेकंड इनिंग अजूनही चालू असती. अनेक दमदार भूमिका आपल्याला पहायला मिळाल्या असत्या.
श्रीदेवी यांना आदरांजली !
त्यांच्यामागे एक पती श्री बोनी कपूर, कन्या जानवी कपूर आणि दोन दीर अनु. अनिल कपूर आणि संजय कपूर आहेत.
कधीकधी आपण एखादा व्यावसायिक दृष्ट्या फ्लॉप झालेला चित्रपट पाहतो आणि वाटतं, अरेच्चा इतका फ्लॉप होण्याईतकं काय वाईट होतं या पिक्चरमध्ये? चांगलाच होता की!
अशा चित्रपटांबद्दल इथे लिहा.
मला दिल से ठीक वाटला होता.
अपेक्षेप्रमाणे सनी देओलच्या गदर २ ने अॅडव्हान्स बुकींगलाच नवीन रेकॉर्ड बनवले.
कोणत्याही हिंदी चित्रपटासाठी, कोणत्याही एका सिंगल भारतीय भाषेतल्या चित्रपटाने अॅडव्हान्स बुकींगला सर्वाधिक कमाई करत काल दिवस अखेर रु. १७.७३ कोटी रूपये कमावले.
ओ माय गॉड हा दुसरा चित्रपट गदर सोबत रिलीज झाला आहे. त्याने अॅडव्हान्स बुकींगला ४ कोटी रूपये कमावले.
रजनीकांतच्या जेलर ने तमिळ आणि तेलगू मिळून १८.५ कोटी रूपये अॅडव्हान्स बुकींगमधे कमावले. त्याच्या हिंदी डब्ड प्रिंटने कमी व्यवसाय केला.